महत्वाच्या बातम्या
-
७व्या टप्प्यातील मतदान पूर्ण; थोड्याच वेळात जाहीर होणार एक्झिट पोल
लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या आणि ७व्या टप्प्यातील मतदान संध्याकाळी ६ वाजता अधिकृतपणे पूर्ण झाले असून संध्याकाळी ६:३० वाजता एक्झिट पोलचा अंदाज जाहीर होणार आहे. २३ मे रोजीच्या मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
५०० रुपये देऊन भाजपने बोटावर बळजबरी शाई लावली व मतदान करु नये सांगितलं
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे ७व्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांकडून आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. परंतु, युपीच्या चंदौली लोकसभा क्षेत्रातून एक अतिशय धक्कादायक वृत्त आहे. येथे मतदानाच्या एक दिवस आधीच मतदारांच्या बोटावर जबरदस्तीने शाई लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
केदारनाथला ध्यानसाधनेवेळी फोटोग्राफर व कॅमेरामन? ऐसा पंतप्रधान पुन्हा होणे नाही!
नरेंद्र मोदी कालच्या पत्रकार परिषदेवरून झालेल्या टीकेतून बाहेर येत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर पुन्हा जोरदार टीका करण्यात येत आहे. कारण केदारनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी दर्शन घेत ध्यानसाधना सुद्धा केली. त्यांच्या या ध्यानसाधनेची समाज माध्यमांमध्ये जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
आजवर मोदी व शहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी केली तर बिघडले कुठे? राज ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. मात्र आजवर या दोघांनी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतरांसोबत दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर त्यात बिघडले कुठे? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून अमित शहा पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबू-शरद पवार भेट! दीड तास चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या ७व्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या मतदान पार पडणार आहे. यादरम्यान नवं सरकार बनविण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या जोरदार हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी’चे सर्वेसेवा चंदबाबू नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
6 वर्षांपूर्वी -
वर्ल्ड कपचं थीम सॉंग ऐकलंत?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या ३० मेपासून सुरू होत आहे. त्यामुळे सध्या जगभरात क्रिकेटची जादू दिसत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंप्रमाणेच चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC)ने शुक्रवारी समाज माध्यमांवरून वर्ल्ड कपचं थीम सॉंग शेअर केलं आहे. ‘Stand By’ असे या गाण्याचे बोल असून Rudimental या बँडने हे गाणं गायलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
चुनावी जुमला! मतदान जवळपास संपण्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यातील २,००० रुपये परत घेतले?
लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून केवळ ७व्या टप्प्याचे मतदान उरले आहे. मात्र त्यानंतर हळुवारपणे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेले २,००० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडू लागले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप पसरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
परीक्षा आली! 'देवा मला पास कर' तशी 'त्यांची' आजची अवस्था?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि त्याचे थेट प्रक्षेपण देशभरातील वृत्त वाहिन्यांवर होईल याची देखील दक्षता घेतल्याचे पाहायला मिळाले. मोदींनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विशेष पूजा केली. यानंतर मोदी केदारनाथमध्ये ध्यान करणार आहेत. मोदींचा उत्तराखंड दौरा दोन दिवसांचा आहे. यानंतर ते सोमवारी (१९ मे) बद्रिनाथला जातील.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पत्रकार परिषदेत ‘मौन की बात’! राज ठाकरेंचं ट्विट
नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. परंतु त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मोदींना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी उत्तरं दिली. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच विरोधकांनी मोदींवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. आमच्या देशाचा पंतप्रधान पत्रकारांना सामोरा जायला घाबरतो, अशी टीका महिन्याभरापूर्वी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मोदींवर नेमक्या शब्दांत शरसंधान साधलं.
6 वर्षांपूर्वी -
प्रचारात 'ये मोदी हैं, जवाब जरूर देगा' आणि पत्रकारपरिषदेत 'अध्यक्षजी जवाब देंगे'!
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताना दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींनी प्रसार माध्यमांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. या पत्रकार परिषदेत मोदींसोबत अमित शहा आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र जर पत्रकार परिषदेत मोदींना प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरच द्यायची नव्हती तर त्यांनी येथे हजेरी तरी का लावली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांना जी धमक वाघिणीने दाखवली, ती धमक वाघ हयातीत दाखवणार नाही?
सध्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराअंती पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असले तरी, ममता बॅनर्जींच्या बेधडकपणाची चर्चा देशभर रंगली आहे. अमित शहांच्या प्रचार रॅलीनंतर पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. संपूर्ण भाजपने पश्चिम बंगालमधील वातावरण शेवटच्या टप्प्यात दूषित करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केला जो ममता बॅनर्जी यांनी धर्याने परतवून लावला.
6 वर्षांपूर्वी -
एनडीए सरकार जाणं महत्वाचं; पंतप्रधान इतर पक्षाचा होण्यास आमची हरकत नाही: काँग्रेस
लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यातील प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने निवडणुकीनंतरची आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर पुढील सरकारचे नेतृत्व काँग्रेस करेल. परंतु युपीएच्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसच्या बाजूने सहमती नसेल तर दुसऱ्या कोणत्या पक्षाचा पंतप्रधान बनू देणार नाही, अशी भूमिका काँग्रेस घेणार नसल्याचं यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
प.बंगालमधील घटनाक्रम हा ममतांना लक्ष करण्यासाठीच: मायावती
पश्चिम बंगालमध्ये काल घडलेला प्रकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लोकसभा निवडणुकीत लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता हे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीचा असा प्रचार धोकादायक आणि फार अन्यायकारक आहे. अशाप्रकारचं राजकारण पंतप्रधानपदाला न शोभणारं असल्याचा आरोप बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी, शहांना निवडणूक आयोग शरण: काँग्रेसचा थेट आरोप
कोलकाता येथे मंगळवारी अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी आणि जाळपोळ झाली. दरम्यान, या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या एकतर्फी भूमिकेवरून काँग्रेसने मुख्य निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर अक्षरशः शरणागती पत्करली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारावर एक दिवस आधीच बंदी घालण्याचा निर्णय हा पूर्णपणे घटनाविरोधीत आहे, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोलकात्यातील घटनेला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार: संजय राऊत
पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेली परिस्थिती लोकशाहीसाठी दुर्दैव घटना असून कोलकात्यातील या घटनेला पश्चिम बंगालमधील ममता दीदींचे सरकार जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राड्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
जर तिथे सीआरपीएफ नसती तर मला बाहेर निघताच आलं नसतं: अमित शहा
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यासागर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. मंगळवारी झालेल्या शाह यांच्या रोड शो दरम्यानच्या हिंसाचाराची माहिती देण्यासाठी दिल्लीत घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पराभव डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा जळफळाट होत असल्याची टीकाही यावेळी अमित शहा यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहांविरोधात कोणी प्रदर्शन करायचं नाही म्हणजे ते देव आहेत काय? ममता बॅनर्जी
काल पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यावेळी प्रसार माध्यमांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की अमित शहा म्हणजे परमेश्वर आहेत काय की त्यांच्याविरोधात कोणी प्रदर्शन देखील करू शकत नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
माझी एकच जात आहे ती म्हणजे 'गरिबी' : नरेंद्र मोदी
मी कधी सुद्धा देशातील गरिबांचे पैसे लुटण्याचं पाप केलं नाही, आमच्यासाठी गरिबांचे रक्षण करणं हेच संपूर्ण जीवन आहे. जे दुख गरीब सहन करतात ते दुखं मी स्वत: सहन केलं आहे. मी गरिबांचे दुखं दूर करण्यासाठी जगतो. माझी फक्त एक जात आहे आणि ती म्हणजे गरिबी. त्यामुळे या गरिबीपासून मुक्त होण्याचा संकल्प आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचा वाराणसी गलिच्छतेच्या निच्चांकावर, २९व्या क्रमांकावरून ७०व्या क्रमांकावर घसरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता मोहिमे’चा नारा दिला असला तरी, स्वतःचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात मात्र वेगळे आणि अत्यंत भयाण चित्र पाहायला मिळते आहे. वाराणसी असंख्य मंदिरे आणि छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांनी भरलेले शहर आहे. मंदिरांच्या अवतीभोवतीचा परिसर आणि अरुंद गल्ल्यांमधील कचरा वाराणसीसारख्या सांस्कृतिक वारसा असलेल्या शहराला गालबोट लावतो. या वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात वाराणसीची ७०व्या क्रमांकावर घसरण झालेली असून मागील वर्षी वाराणसी २९व्या क्रमांकावर होते.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओकॉन बँक कर्ज घोटाळा: ईडीकडून चंदा कोचर यांची ८ तास कसून चौकशी
बँक कर्ज घोटाळा प्रकरणी आयसीआयसीआयच्या बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची सोमवारी तब्बल ८ तासांहून अधिक काळ अंमलबजावणी संचालनालयाने कसून चौकशी केली. त्याच्याविरोधातील बँक कर्जघोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ते ईडीसमोर उपस्थित झाले होते. सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झालेल्या कोचर दाम्पत्यांनी सुटका रात्री ८च्या सुमारास करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS