महत्वाच्या बातम्या
-
व्हिडिओकॉन बँक कर्ज घोटाळा: ईडीकडून चंदा कोचर यांची ८ तास कसून चौकशी
बँक कर्ज घोटाळा प्रकरणी आयसीआयसीआयच्या बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची सोमवारी तब्बल ८ तासांहून अधिक काळ अंमलबजावणी संचालनालयाने कसून चौकशी केली. त्याच्याविरोधातील बँक कर्जघोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ते ईडीसमोर उपस्थित झाले होते. सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झालेल्या कोचर दाम्पत्यांनी सुटका रात्री ८च्या सुमारास करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: ‘ती’ मुलाखत फिक्स होती ? मोदींवर गंभीर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, या मुलाखतीत बालाकोट एअरस्ट्राइकबाबत आणि १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेरा तसेच ई-मेलच्या वापराबाबत केलेल्या विधानांवरुन पंतप्रधानांवर मोठ्या प्रमाणात टीका होत करण्यात येते आहे. परंतु, या संपूर्ण मुलाखतीचं कथानक आधीच तयार होतं आणि त्यातील प्रश्न देखील ठरवून विचारण्यात आले, असा थेट आणि गंभीर आरोप मोदींवर काँग्रेस आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर व्हिडिओ द्वारे मुलाखत आधीच फिक्स करण्याचे आरोप होत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भारतात डिजिटल कॅमेरा आला १९९० मध्ये व ई-मेलचा वापर १९९५; पण मोदींनी १९८८ मध्ये?
सर्वात पहिल्यांदा ईमेल कधी वापरलं होतं? सर्वात पहिला ईमेलचा वापर कोणी केला होता? सध्या हे प्रश्न समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात विचारले जात आहे. प्रत्येकाला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, १९८७-८८ च्या दरम्यान मी डिजिटल कॅमेरामध्ये पहिल्यांदा फोटो काढला. पंतप्रधान मोदींच्या या दाव्यावर समाज माध्यमांत लोक देखील हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण या दाव्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे.
6 वर्षांपूर्वी -
नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता: कमल हसन
स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होतं अस विधान प्रसिद्ध अभिनेत्यापासून तामिळ्नाडूनचा नेता झालेल्या कमल हसन यांनी केलं आहे. तामिळनाडू येथील हसन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेता कमल हसन यांनी हे खळबळजनक विधान केलं आहे. अर्वाकुरची येथील जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा नेते मोदींकडे जातात तेव्हा त्या नेत्यांच्या बायका सुद्धा घाबरतात: मायावती
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापूर्वी नेत्यांमधील जोरदार शाब्दिक चकमकी वैयक्तिक पातळीच्या सर्व मर्यादा ओलांडत आहेत. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलवर बलात्कार प्रकरणावरून बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावतींना लक्ष्य केल्यानंतर आता मायावतींनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जळजळीत टीका केली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खासकरून विवाहीत महिला त्यांचे पती मोदींकडे गेल्यावर हा विचार करून घाबरतात. कदाचित नरेंद्र मोदी आपल्या पत्नीप्रमाणेच आम्हालाही आपल्या पतीपासून वेगळे करणार नाहीत ना, अशी भीती त्यांना वाटते अशी जळजळीत टीका मायावती यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
#IPL २०१९: मुंबई इंडियन्सची चेन्नईवर मात; जेतेपदावर चौथ्यांदा नाव कोरले
भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलचे चौथ्यांदा जेतेपद पटकावले. मुंबईने चेन्नईपुढे विजयासाठी एकूण १५० धावांचे आव्हान ठेवले होते. वॉटसनचा अपवाद वगळता एकाही चेन्नईच्या फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावता आले. मुंबईने अखेरच्या चेंडूवर फक्त एका धावेने रोमहर्षक विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.
6 वर्षांपूर्वी -
पुरावा! 'डिवायडर इन चीफ'चे लेखक आतिष यांचं स्वतः राम माधव यांनी कौतुक केलं होतं
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. परंतु यावेळी नरेंद्र मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘टाइम’ने थेट दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप मोदींसंदर्भात लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी प्रसिद्ध केला होता.
6 वर्षांपूर्वी -
सामान्यांचे प्रश्न घेऊन निवडणूक लढलो, आता जनता जो निर्णय देईल तो मान्य असेल: राहुल गांधी
सामान्य जनतेशी निगडीत असलेले महत्वाचे प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक आणि सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी प्रसार माध्यमांना दिली. नवी दिल्लीतील औरंगजेब लेन येथील शाळेत मताधिकार बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा मतदान: प. बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या
लोकसभा निवडणुकीच्या ६व्या टप्प्यासाठी आज पश्चिम बंगालमधील ८ जागांवर मतदान सुरू आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्यापूर्वीच हिंसाचाराची घटना घडली आहे. आज मतदानापूर्वी प. बंगालमध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा तर एका टीएमसी कार्यकर्त्याचा मृतदेह आढळूनने खळबळ उडाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
७ राज्यातील ५९ मतदारसंघात दुपारी २ वाजेपर्यंत सुमारे ३९.८५ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी आज ७ राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही ६वी फेरी असून बिहार, झारखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, युपी, पश्चिम बंगाल अशा एकूण ७ राज्यांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये ९७९ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
फेकणाऱ्याने फेकत जावे अन ऐकणाऱ्याने ऐकत जावे! एअरस्ट्राइक'वरून मोदींची ढगाळ फेका फेकी?
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीवरुन देशभरातील विरोधक मोठ्या प्रमाणात त्यांची जोरदार खिल्ली उडवत आहे. बालाकोट हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत मोदींनी या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं असून त्यांच्या विधानावरुन विरोधकांनी मोदींना थेट लक्ष्य करत त्यांची खिल्ली उडवली आहे. ‘हल्ल्या आधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तद्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला मी दिला होता’ अशाप्रकारचं विधान मोदींनी केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना व्हायचयं उपपंतप्रधान?
लोकसभा निकालानंतर देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजप व्यतिरिक्त तयार झालेल्या महायुतीला पाठिंबा देण्यासाठी आपण तयार असल्याचा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. परंतु त्यासाठी केसीआर यांनी उपपंतप्रधानपदाची अट घातली असून त्यासाठी हालचाल सुरू केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजकारणात उशिरा सक्रिय होणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक: प्रियांका गांधी
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय राजकारणात एण्ट्री केली आहे. त्यांच्या एण्ट्रीने उत्तर प्रदेशच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होणार, याबाबत आता जोरदार चर्चाही यापूर्वीच सुरू झाली आहे. आता प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवेशाच्या ‘टायमिंग’वर भाष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचे कुटुंब असते तर तेही सहलीला गेले असते: आनंद शर्मा
राजीव गांधी यांनी जे केले तेच कोणत्याही पंतप्रधानाने केले असते. पण सध्याच्या पंतप्रधानांना कुटुंबच नाही. ते असते तर तर मोदीही तिथे गेले असते. आता ते एकटेच जातात कारण त्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संबंध नाही आणि त्यांना कुटुंबाबद्दल आदरही नाही, अशी खोचक टीका काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर राहुल गांधींचे स्पष्टीकरण, त्यांनी माफी मागायला हवी
साल १९८४ साली दिल्लीत झालेली शीख दंगलीप्रकरणी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शीख समुदायात संताप निर्माण झाला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. शीख समुदायाने दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घराबाहेर आंदोलन करत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली.
6 वर्षांपूर्वी -
सेल्फ डिफेन्सचे धडे घेताघेता शिवसेनाच अक्षयच्या डिफेन्समध्ये, त्याची कॅनडीयन नागरिकत्व तांत्रिक बाब
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर भाष्य करतानाच अभिनेता अक्षय कुमारचे नागरिकत्वाच्या मुद्दावरुनही समर्थन केले आहे. अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी आहे. त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा विषय ही एक तांत्रिक बाब आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप कार्यकर्त्यांचे स्टंट! रॉबर्ट वाड्रा मुंबादेवीच्या दर्शनासाठी आले तिथेही मोदींच्या नावाने घोषणा
भारतीय जनता पक्षाच्या उतावळ्या कार्यकर्त्यांचं आजदेखील पुन्हा दर्शन झालं. एखादी गोष्ट कोणत्या ठिकाणी करावी याचं देखील त्यांना भान नसतं असाच काहीसा प्रकार आज घडला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं मतदान देखील पार पडलं आहे. मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आज मुंबईतील सुप्रसिद्ध मुंबादेवीचे दर्शन घेतले. परंतु वाड्रा दर्शनानंतर परतत असताना मंदिराच्या आवारातील काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. यावेळी प्रसार माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी राजकीय विषयावर बोलण्यास नकार दिला.
6 वर्षांपूर्वी -
राफेल प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राफेल लढाऊ संदर्भातील पुनर्विचार याचिकेप्रकरणी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात सरकारने सुप्रीम कोर्टात चुकीची माहिती दिल्याच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपाचे उत्तर दिले आहे. सरकारने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयातून डिसेंबर महिन्यात दिलेल्या निर्णयात सीएजी रिपोर्ट आल्याची बाब चुकून नमूद केली होती, त्यामुळे राफेल कराराला मिळालेल्या क्लीन चीटवर काही फरक पडत नाही.
6 वर्षांपूर्वी -
अयोध्या वाद: सर्वोच्च न्यालयाच्या मध्यस्थांच्या समितीला ३ महिन्यांची मुदतवाढ
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणाची शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून या सुनावणीत न्यायालयाने मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद या प्रकरणात सौहार्दपूर्ण समेट होण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी मध्यस्थांची समिती नेमण्यात आली होती. दरम्यान या समितीने सहा मे रोजी आपला अहवाल सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशात दुफळी निर्माण करणारे मोदी भारतातील प्रमुख नेते; टाइम’च्या कव्हरस्टोरीत मोदींबद्दल उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले आहेत. परंतु यावेळी नरेंद्र मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘टाइम’ने थेट दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता असा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप मोदींसंदर्भात लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा