महत्वाच्या बातम्या
-
तेज बहादूर यादव यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने बीएफएस’चे निलंबित जवान तेज बहादूर यादव यांची याचिका फेटाळली आहे. वाराणसीतील महाआघाडीचे उमेदवार तेज बहादूर यादव यांची उमेदवारी रद्द झाली होती. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने सांगितले, आम्हाला या प्रकरणाची दखल घेण्यासाठी याचिकेत काही तथ्य आहे असे वाटत नाही. तर, तेज बहादूर यांचे वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले,’ ते निवडणुकीला कोणत्याही प्रकारे आव्हान देत नाही आहेत. आमचे म्हणणे केवळ इतकेच आहे की, त्यांची उमेदवारी गैरपद्धतीने रद्द करण्यात आली आहे त्यामुळे १९ मेची निवडणूक लढण्याची परवानगी त्यांना देण्यात यावी. तसेच उमेदवारी रद्द झाल्यानंतर आम्हाला स्पष्टीकरण देण्यासाठी योग्य संधी देण्यात आली नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
6 वर्षांपूर्वी -
भाजप तोंडघशी! राहुल गांधींच्या नागरिकत्त्व वादावरील याचिका सुप्रीम कोर्टाकडून रद्द
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नागरिकत्त्व वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. युनायटेड हिंदू फ्रंट आणि हिंदू महासभेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सिजेआय रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका रद्द केली आहे. कोणत्याही परदेशी कंपनीत नागरिकत्त्व ब्रिटीश असल्याचे नमूद असल्यास व्यक्तीचे नागरिकत्त्व ब्रिटीश असेलच असे नाही, असे सांगत न्यायालयाने हिंदू महासभेला इतर पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र इतर पुरावे सादर करण्यात न आल्याने न्यायालयाने ही याचिका रद्द केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपविरोधी पक्षांची जुळवाजुळव चर्चा सुरू, चंद्राबाबू नायडू व राहुल गांधी भेट
लोकसभेच्या एकूण २७२ जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार नाहीत आणि त्यामुळे भाजपाला इतर लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस आणि मित्रपक्ष निकालाआधी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. टीडीपीचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची यासंदर्भात भेट घेतली. त्यानंतर, त्यानंतर ते लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकात्याच्या दिशेने रवाना झाले.
6 वर्षांपूर्वी -
मोदींना जोरदार चपराक देण्याची इच्छा, ममता-मोदी वर्ड वॉर
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीतील ‘वर्ड वॉर’ जरा जास्तच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शाब्दीक चकमक काही थांबता थांबेना. जय श्रीरामच्या घोषणेवरून मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ममता म्हणाल्या म्हणाल्या, ‘मोदी हे दुर्योधन आणि रावनाचा अवतार आहेत’. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते, असंही त्या पुढे म्हणाल्या.
6 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक औरंगजेब: संजय निरुपम
मोदींचा मतदारसंघ वाराणसीमध्ये कॉरिडोरच्या नावाखाली शेकडो मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसै आकारण्यात येत आहे. औरंगजेब काशीच्या गल्लीबोळात अत्याचार करण्यासाठी उतरला होता. हिंदूची मंदिरे तोडली जात होती तेव्हा हिंदू लोकांनी विरोध केला होता. जे काम औरंगजेब करु शकला नाही ते काम आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत अशी खरमरीत टीका काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय निरुपम यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
6 वर्षांपूर्वी -
बिहार: पाचव्या टप्यातील मतदानावेळी हॉटेलमध्ये आढळल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स
सोमवारी बिहारमध्ये ५व्या टप्प्यासाठी मतदान सुरु असताना मुझफ्फरपूर येथील एका हॉटेलमध्ये २ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. विशेष म्हणजे हे हॉटेल मतदान केंद्रापासून अगदी जवळच्या अंतरावर होतं. हॉटेलमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याची माहिती मिळताच अनेक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. सविस्तर वृत्तानुसार, सेक्टर मॅजिस्ट्रेट अवदेश कुमार यांच्याकडे मुझफ्फरपूर येथील ४ ईव्हीएम मशीन्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परिसरातील एखादं ईव्हीएम मशीन खराब झाल्यास बॅकअप म्हणजे अतिरिक्त मशीन्स ठेवण्यात आल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम मशीन बाबतची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
EVM संदर्भात विरोधीपक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आपल्या याचिकेमध्ये ५० टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. पण, सुप्रीम कोर्टाने विरोधकांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. EVM मध्ये घोळ असल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला होता. त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होत असून ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण, सुप्रीम कोर्टाने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे, यामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांना जोरदार धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मतमोजणीवेळी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची पडताळणी होणार का यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
मतमोजणी करताना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात यावी, या देशभरातील विरोधकांच्या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. काँग्रेस, टीडीपीसह देशातील तब्बल २१ प्रमुख विरोधी पक्षांनी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅटमधल्या ५० टक्के पावत्या ईव्हीएमसोबत पडताळून पाहिल्या जाव्यात असे आदेश कोर्टाने निवडणूक आयोगला द्यावेत, अशी विरोधकांची मागणी आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाला मित्रपक्षांच्या मदतीशिवाय सत्ता मिळणं कठीण?
यंदा भारतीय जनता पक्षाला मागील निवडणुकीप्रमाणे स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे संकेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी दिले आहेत. यंदा केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची गरज भासू शकते, असं माधव म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केल्याने भाजपच्या गोटात धाकधूक वाढल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा मतदान पाचवा टप्पा;आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील एकूण ५१ जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात ६७४ उमेदवारांचे भवितव्य मतदार निश्चित करणार आहेत. अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रायबरेलीमधून सोनिया गांधी, लखनऊमधून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अशी बडे नेतेमंडळी रिंगणात आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आम्ही या प्रकाराशी सहमत नाही. केजरीवालांच्या सुरक्षेत उणीव राहता कामा नये: शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखामधून आपचे सर्वेसर्वा आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘किती थपडा खाल?’ या मथळ्याखाली आज सामनामधून उद्धव ठाकरे यांनी नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. ‘नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात.
6 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये मतदानादरम्यान समाज कंटकांनी EVM फोडलं, मतदान प्रक्रिया खंडित
देशात लोकसभेच्या ५व्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बिहारमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं आहे. बिहारमध्ये ५व्या टप्प्यातील मतदानादरम्यान ईव्हीएम फोडण्याची घटना समोर आली आहे. सारण लोकसभा मतदारसंघात हा धाकायदायक प्रकार घडला आहे. हाती माहितीनुसार, सारण लोकसभा निवडणुकींतर्गत सोनपूर विधानसभेच्या नयागावातील १३१ नंबर मतदान केंद्रावर ही ईव्हीएम मशिन फोडल्यानं एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी खंडित करण्यात आली होती. या प्रकरणी रणजित पासवान याला अटक करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानपदात मला रस नाही, मोदीच पुन्हा यापदी विराजमान होतील : गडकरी
पंतप्रधानपदात मला अजिबात रस नाही, त्यामुळे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच या पदाचे उमेदवार आहेत आणि यंदाही तेच पंतप्रधान होतील, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. काल भोपाळ येथे एका प्रचार कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधी नवऱ्याचं कमी, माझ्याच नावाचा जास्त जप करतायत : स्मृती इराणी
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांना मागील ५ वर्षात माझं नाव माहिती नव्हतं.परंतु, आता ते सातत्याने माझ्या नावाचा जप करीत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि अमेठीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधींना टोला लगावला आहे. अमेठीत प्रसार माध्यमांशी त्या बोलत होत्या.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या काळातच नव्हे तर यूपीएच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले: निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून सर्जिकल स्ट्राइकवरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर २०१६ मध्ये म्हणजे मोदींच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. त्याप्रमाणे लष्करानं यापूर्वीदेखील सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक केल्याचं हुडा यांनी म्हटलं. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात ६ सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्याबद्दल प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला हुडा यांनी उत्तर दिलं.
6 वर्षांपूर्वी -
आज सात राज्यांमधील प्रचाराच्या तोफा थंडावणार
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज शनिवारी संध्याकाळी थंडावणार आहेत. ६ मे रोजी युपी, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या ६ प्रमुख राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ७ राज्यांमधील ५१ मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान यामध्ये उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांचा समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राईक भारतीय लष्करानं केला, मोदींनी नव्हे: राहुल गांधी
वायुदलाने केलेला सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला नसून तो भारतीय लष्करानं केलं आहे. नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारनं केल्याचं सांगत लष्कराचा अपमान करत आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
बेरोजगारीचा दर वाढून ८.४ टक्क्यांवर, देश भविष्यात बेरोजगारांची भूमी होतो कि काय?
एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर पूर्वीपेक्षा वाढून ८.४ टक्क्यांवर गेला आहे. ऑक्टोबर २०१६ नंतरचा हा सर्वोच्च बेरोजगारी दर ठरला आहे. मार्चमध्ये बरोजगारीचा दर ६.७ टक्के होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
6 वर्षांपूर्वी -
५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी होणार? न्यायालयात लवकरच सुनावणी
लोकसभा निवडणुकीदरम्यान २१ विरोधी पक्षांनी ईव्हीएमसंदर्भात केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी या याचिकाद्वारे केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिन्सबद्दल शंका उपस्थित केली. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी थेट मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाहीर पत्रकार परिषद घेतली होती.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणा: मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज बाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या तब्बल २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. निवडणूक आयोगाने एका शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाने ज्या एकमेव शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे त्यांचं नाव इस्तारी सुन्नम नरसईया असं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS