महत्वाच्या बातम्या
-
तेलंगणा: मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज बाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या तब्बल २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. निवडणूक आयोगाने एका शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाने ज्या एकमेव शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे त्यांचं नाव इस्तारी सुन्नम नरसईया असं आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘फनी’ चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्यावर थडकलं! लाखोंचे स्थलांतर
सर्वाधिक घातक असे ‘फनी’ चक्रीवादळ आज सकाळी नऊच्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ताशी १७५ किलोमीटरच्या वेगाने ‘फनी’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले असून अकरा नंतर फनीचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ओडिशासह आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना ‘फनी’चा फटका बसण्याचा अंदाज आहे. गृहमंत्रालयाकडून १९३८ हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. पुरी आणि भुवनेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात बिहारच्या १९ जागांवर महागठबंधन आघाडीवर
लोकसभा निवडणुकीत भाजपचं भविष्य उत्तर भारतात मिळणाऱ्या यशावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशसोबतच बिहार मधील यश भाजपसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्याअनुषंगाने भाजपने बिहारमध्ये जातीय समीकरणाच्या आधारे एक अंतर्गत सर्वेक्षण केलं असून, त्यानुसार भाजपापेक्षा महागठबंधंन जातीय समीकरणांच्या बाबतीत बिहारमधील तब्बल १९ जागांवर आघाडीवर दिसत असून महागठबंधनमधील प्रमुख घटक पक्ष जातीय निहाय मतं स्वतःकडे आकर्षित करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अमरिकेचे परराष्ट्र सेक्रेटरी पॉम्पीओ यांच्या मसूद अझहर विषयक ट्विटने मोदी तोंडघशी
अमेरिकेचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी अध्यक्ष माईक पॉम्पीओ यांनी मसूद अझहर विषयक एक ट्विट केल्याने नरेंद्र मोदी तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे. भारतात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि विशेष करून मोदी ‘जैश ए मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहर याला आमच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय दहशदवादी घोषित केल्याच्या बाता मारून, प्रचारात स्वतःची पाट थोपटून घेत असल्याचे काल पासून पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
आता बोलून टाका! उरी, पुलवामा व गडचिरोलीतील घटनेला पण नेहरू जबाबदार: नेटिझन्स
उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी झालेल्या कुंभमेळ्याच्या उत्तम व्यवस्थापनाचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९५४ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला उजाळा देत त्याचे खापर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर फोडले. मोदी प्रचारात मूळ मुद्दे सोडून प्रत्येक विषयात नेहरू आणि गांधी घराण्याला ओढत असल्याने आता नेटकरी देखील संतापल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील कोणत्याही नकारात्मक गोष्टीला केवळ नेहरूच जवाबदार असतात, त्यामुळे देशात घडलेल्या उरी, पुलवामा आणि गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यामागे देखील नेहरूंचा हात असून तेच या गंभीर घटना जवाबदार असल्याची उपहासात्मक टीका सध्या समाज माध्यमांवरील नेटकरी करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराचा दावा नेपाळ सैन्यानं फेटाळला, ती पावलं हिममानवाची नव्हे, तर जंगली अस्वलाची
लोक कथांमधील ‘येती’ या रहस्यमय हिममानवाच्या पाऊलखुणा नेपाळमधील मकालु बेसकॅम्पच्या परिसरात आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला, त्यानंतर आता नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्यानं भारतीय लष्कराचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. तसेच ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी सोमवारी रात्री हा दावा करणारे ट्विट केले आणि त्यासोबत बर्फात उमटलेल्या ‘येती’च्या पाऊलखुणांची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदींनी दहशतवाद्यांचं समर्थन करत लष्कराला शिव्या दिल्या: भाजप नेते गिरीराज सिंह
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुज्जफरपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एक धक्कादायक विधान केलं आहे. कारण त्यांनी यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावेळी ते म्हणाले की, ‘मोदींनी दहशतवाद्यांचं समर्थन करत लष्कराला शिव्या देण्याचं काम केलं आहे’. त्यांच्या या विधानाने मोठी उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
संतापजनक: कर्जमाफीमुळे शेतकरी सुस्तावतात; भाजप हरियाणाचे मुख्यमंत्री
एखाद्याला मोफत देण्याची सवय लावली, की मग ती व्यक्ती आळशी होते, अशा शब्दांत त्यांनी कर्ममाफीवर भाष्य केलं. ‘हरियाणातल्या शेतकरी समुदायाला त्यांच्या पुढील आर्थिक संकटं संपवायची आहे. एकदा लोकांना फुकटात काही मिळायची सवय लागल्यावर ते सुस्तावतात. ते इथून तिथून कर्ज घेऊ लागतात. ते आर्थिक नियोजन करत नाहीत. या प्रकारची योजना अनेक राज्यांमध्ये यशस्वी होऊ शकते. कारण तिथली परिस्थिती तशी आहे. परंतु हरियाणात ही योजना यशस्वी होऊ शकत नाही,’ असं खट्टर म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
गोध्रा हत्याकांडाप्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ला हे भाजपाच षडयंत्र: गुजरातचे माजी मुख्यमंत्री
गुजरातमधील बहुचर्चित गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच जम्मू काश्मीरमधील पुलवामातला सीआरपीएफच्या जवानांवरील भ्याड दहशतवादी हल्लादेखील भारतीय जनता पक्षाच्या कारस्थानाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांनी केला आहे. पुलवामातल्या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीची नोंद गुजरातमध्ये करण्यात आली होती, असा दुसरा दावादेखील त्यांनी केला. गोध्रा हत्याकांडदेखील भारतीय जनता पक्षाच मोठं षडयंत्र होतं. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून दहशतवादाचा आधार घेतला जातो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
भाजपानं २२०-२३० जागा जिंकल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत: सुब्रमण्यम स्वामी
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं भाकीत केलं आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत २२०-२३० जागा जिंकल्यास नरेंद्र मोदी कदाचित पुढचे पंतप्रधान होणार नाहीत, असं सूचक विधान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सध्याचं भाजपच्या नैत्रुत्वतही बदल केले जातील, असा थेट दावाही स्वामींनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
भारतातील अनेक महत्वाच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच कुख्यात दहशदवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
वाराणसी: जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिलेले बीएसएफ’चे बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली आहे. यामुळे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या गोटातही खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, परंतु उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदी यांनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
भाजपचं बारामती जिंकण्याच्या दाव्यांचं रहस्य ईव्हीएम तर नाही ना? शरद पवार
बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं बारामतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यंदा बारामती जिंकणारच असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा व्यक्त केला. याबद्दल भाष्य करताना ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ईव्हीएमविषयी अनेक शंका उपस्थित केल्या.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात निवडणूक संपताच भाजप-सेना सरकारकडून घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ
लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य व्यक्तीला सरकारनं जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे, असं वृत्त द हिंदू बिझनेस लाइननं प्रसिद्ध केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
श्रीलंकेत बुरखाबंदी; राज्यात निवडणूक संपताच छोट्या भावाची पुन्हा मोठ्या भावावर टीका
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपताच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा प्रचारादरम्यान मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागून, सभेच्या ठिकाणी केवळ मोदींचा सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा थेट सवाल उपस्थित करतानाच भारतात देखील बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकांसाठी वाट्टेल ते? करकरे शहीदच पण पोलीस अधिकारी म्हणून चुकीचे: सुमित्रा महाजन
भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाने निर्माण झालेला वाद संपलेला नसताना आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील शहीद हेमंत करकरेंविषयी धक्कादायक भाष्य केले आहे. २६/११ हेमंत करकरे शहीद झाले. मात्र महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख या पदावर काम करताना त्यांची भूमिका अत्यंत चुकीचीच होती, असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःच्या पक्षाचा तिखट हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते याचा पुन्हा प्रत्यय आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेलची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्याची केंद्राची विनंती; लोकसभा निवडणुकांमुळे?
सुप्रीम कोर्टाने राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबाबत १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी आज होणार आहे. परंतु ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारने केली आहे. याबाबतचे पत्र संबंधित पक्षकारांनाही देण्याची परवानगी न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिली. परंतु सुनावणी पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही.
6 वर्षांपूर्वी -
वाराणसी: सपा-बसपाची मोठी खेळी, मोदींविरोधात बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या महाआघाडीने मोठी खेळी खेळली आहे. सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना थेट बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. दरम्यान, आज तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु, नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी, अजय राय आणि तेज बहादूर असा तिरंगी मुकाबला होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
तशी बातमी छापणे हा निव्वळ खोडसाळपणा आहे: शरद पवार
आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पेडर रोडवरील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं. त्यांनी काल केलेल्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. त्यांनी म्हटलं होतं, ‘जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं नाही आणि विरोधकांचं सरकार आलं तर पंतप्रधानपदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे पंतप्रधानपदासाठी प्रमुख दावेदार असतील’, तसेच त्यांनी चौथ्या क्रमांकावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचंही नाव घेतलं.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा | महाराष्ट्रनामा न्यूज
लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण ९ राज्यांतील ७१ मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १७ जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी १३-१३ जागा, पश्चिम बंगालमधील ८ जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील ६-६ जागा, बिहारमधील ५ जागा, झारखंडतील ३ जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे टीएमसीचे कार्यकर्ते आणि सुरक्षा दलामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या कारच्या काचा फोडल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC