महत्वाच्या बातम्या
-
'त्या' मुलाखतीत राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नांना मोदींकडून बगल
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवत नसलेल्या राज ठाकरे यांना आपल्या आगळ्यावेगळ्या प्रचारशैलीद्वारे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना अक्षरशः हैराण करून सोडल्याचे दिसले. त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे राज्यातील संपूर्ण भाजप पक्ष आणि मंत्री काँग्रेस – राष्ट्रवादीला विसरून एकट्या राज ठाकरेंवर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबू, ममता किंवा मायावती पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार: शरद पवार
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या ३ टप्प्यांतील मतदान झाले असून उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार कोण असतील याबाबत शक्यता वर्तविली आहे. ते म्हणाले, जर नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात एनडीए स्पष्ट बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी राहिलं तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार असतील. तसेच यात चौथ्या क्रमांकावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे नावही त्यांनी घेतले. शनिवारी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे राहुल गांधींनीच अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर कोणतीही चर्चा निरर्थक ठरते असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
राज यांचा दावा सत्यात तर भाजप तोंडघशी, देशात बेरोजगारी २ वर्षांच्या उच्चांकावर: CMIE अहवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारची अनेक गुपित भर सभेत उघड केली होती. त्यातील सर्वात महत्वाचा दावा म्हणजे नोटबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी आणि बंद पडलेले उदयोग. दरम्यान, काल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हणत नोटबंदीच समर्थन करताना त्याचे कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याचं म्हटलं होतं. मात्र सीएमआयई अर्थात सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’द्वारे अधिकृतरीत्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून राज ठाकरे सत्यात उतरले आहेत तर आशिष शेलार आणि संपूर्ण भाजप तोंडघशी पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गौतम गंभीरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
दिल्लीतील भाजपचे उमेदवार गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतम गंभीरच्या विरोधात दुसरी तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. गौतम गंभीरच्या विरोधात दोन वेळा मतदान यादीत नाव असल्याच्या मुद्द्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनतर त्यांच्यावर परवानगी न घेता प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शेलारांना माहीत नसावं, भाजपचे प्रवक्ते वेरिफाइड अकाऊंटवरून असे फेक व्हिडिओ शेअर करतात
मुंबई : आज मुंबईमध्ये आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या व्हीडीओ आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी जे काही दाखवलं त्यातील अनेक गोष्टी या हास्यास्पद होत्या. मुळात वेरिफाइड अकाउंट कोणाला मिळत याचे फेसबुक व ट्विटरने काही नियम आखले आहेत आणि अकाउंट वेरिफाइड करण्यासाठी संबंधिताला पुरावे देखील द्यावे लागतात. मुळात सामान्य वापरकर्त्याला फेसबुक किंवा ट्विटर अकाउंट वेरीफाईड करता येत नाही. अगदी अनेक पत्रकार, समाज सेवक आणि सामाजिक संस्था देखील आज अन वेरिफाइड अकाउंट वापरतात. त्यात मागील वर्षभरापासून फेसबुक व ट्विटरने भारतात अकाउंट वेरीफाईड करण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आयपीएल २०१९: मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय
आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत चेन्नई-मुंबई या २ बलाढ्य संघातील लढतीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने काढलेल्या अर्धशतकाच्या जोरावर आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याने मुंबईने चेन्नईवर ४६ धावांनी सहज विजय मिळवला. धोनीच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानी पोहोचला असून ‘प्ले-ऑफ्स’ फेरीसाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल सहा तासांच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाचा सर्व्हर सुरु
एअर इंडियाचे तांत्रिक बाबी सांभाळणारे ‘सिता सर्व्हर’ डाऊन झाल्याने देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाली होती. तब्बल सहा तासांच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाचा सर्व्हर सुरु झाला आहे. त्यामुळे विमानतळांवर अडकून राहिलेल्या प्रवाशांनी अखेर निश्वास सोडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
वाराणसीत माजी लष्कर व निमलष्कराचे जवान मोदींविरोधात प्रचार करणार
वाराणसीत शंभरहून अधिक निवृत्त आणि निलंबित लष्कर आणि निमलष्कराच्या जवानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराला दुर्बळ करत असून भष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचं जवानांचं म्हणणं आहे. हे सर्व जवान वाराणसीमधील मडुआ डीह येथे वास्तव्यास थांबले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरेंची वाराणसीत उपस्थिती
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, रामविलास पासवान, अतुल बरुआ यांच्यासहित इतर सहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आजसुद्धा असेच विराट शक्तिप्रदर्शन होणार आहे. आज कोतवाल बाबा काळ भैरवाचे दर्शन घेऊन पुन्हा जयघोषाच्या मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोदी जाणार आहेत. त्यावेळी सम्राट मोदींचे मांडलीक असणारे राजे त्यांच्यासोबत अदबीने उभे राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
चलनात २५ पैशांचं नाणंच नाही, मग मोदींच्या आई आजही त्यांना सव्वा रुपया देतात कुठून?
नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमारने अराजकीय मुलाखत घेतली खरी, मात्र ती मुलाखत फिल्मी असल्याचं आता समोर येतं आहे आणि त्याला तास ठोस पुरवा देखील मिळत आहे आणि तो देखील मोदींच्याच तोंडून असं म्हणावं लागेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षय कुमारने घेतलेली मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय. अनेकांनी या मुलाखतीवर टीका केली तर अनेक जण मोदींची स्तुती करण्यात व्यस्त आहेत. या मुलाखतीत मोदींच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबी समोर आल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आपल्या आईविषयी देखील अनेक गोष्टी या मुलाखतीत सांगितल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय यांना उमेदवारी
पूर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वारणसीमधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे. काँग्रेसने वाराणसीतून प्रियंका गांधी यांना नाही तर अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ निवडणुकांमध्ये मोदींविरोधात अजय राय रिंगणात उतरले होते.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: आतंकवाद हा त्याग, तपस्या व बलिदानाचं प्रतीक आहे: मध्य प्रदेश भाजप अध्यक्ष
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नेतेमंडळी भाषणादरम्यान गरळ ओकत आहेत. त्यात भाजपने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे, कारण हिदुत्वच्या नावाने भाजपाची नेतेमंडळी धक्कादायक विधानं करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसाच काहीसा प्रकार भाजपचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष राकेश सिंह यांच्या विधानानंतर घडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज मोदींचा वाराणसीत रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर आणि वाराणसी या दोन मतदारसंघांतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. उद्या वाराणसीतून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यापूर्वी आज ६ किलोमीटरचा भव्य रोड शो करणार आहेत. रोड शो नंतर मोदी दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीत सामील होतील. त्यानंतर काशी विश्वनाथाचे दर्शन घेतील. तसेच ते पेरीस हॉटेलमध्ये वाराणसीच्या ३००० लोकांशी संवादही साधणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
नेहरु-गांधी कुटुंबीयांना लक्ष करण्यापेक्षा तुमची ५ वर्षातील कामं सांगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातील अर्ध्यापेक्षा जास्त वेळ गांधी आणि नेहरु परिवारावर टीका करण्यात घालवतात. नरेंद्र मोदींचे भाषण गांधी कुटुंबावर केंद्रीत असते. फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. परंतु, ५ वर्षात काय केलं हेच सांगत नाहीत अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीकरीमध्ये प्रियंकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. फतेहपूर सीकरीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेत प्रियंका गांधी बोलत होत्या.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीदरम्यान बातम्या निर्मितीसाठी पत्रकार अक्षय कुमार यांचे फिल्मी प्रश्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींची ही मुलाखत बॉलिवूडचा कलाकार अक्षय कुमार याने घेतली आहे. या मुलाखतीतून मोदींनी आयुष्यातले अनेक पैलू उलगडले असं म्हटलं आहे. यावेळी मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारल्याच देखील म्हटलं आहे. दरम्यान, या मुलाखतीमध्ये मोदींनी आपल्या घड्याळ घालण्याच्या सवयीबद्दलचे एक गुपित सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या मुखवट्यामागच्या खऱ्या चेहऱ्याची कल्पना नव्हती: बॉक्सर विजेंदर सिंग
बॉक्सर विजेंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली असून मुखवट्यामागे काय आहे याची कल्पना नव्हती असा टोला लगावला आहे. तत्पूर्वी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या विजेंदर सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फार चांगले संबंध होते. त्यांच्या चांगल्या संबंधांचे पुरावा देणारे अनेक फोटो समाज माध्यमांवर सहज उपलब्ध आहेत. दोघांनी अनेकवेळा एकमेकांसाठी ट्विटही केलं होतं. विजेंदर सिंग यांनी पहिल्यांदा व्यवसायिक फाइट जिंकल्यानंतर मोदींनी त्याचं कौतुक केलं होतं. पण २०१९ मध्ये चित्र बदललं असून विजेंदर सिंग यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांशी खोटं बोलले असा आरोप त्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मी मतदान केलं, पण VVPAT ची पावती दुसऱ्याच उमेदवाराच्या नावाची: आसामचे माजी डीजीपी
काल देशभरात एकूण ११७ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. २०१४ पासून मोदी सरकारच्या निवडणुकीतील यशामागे ईव्हीएम’मधील छेडछाड देखील एक मुख्य कारण असल्याचा आरोप देखील विरोधकांनी नेहमीच केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील १४ मतदारसंघांसह देशात ११७ जागांवर काटे की टक्कर होणार
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज, मंगळवारी ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. भारतीय जनता पक्षाची फाइट बऱ्याच ठिकाणी काँग्रेसप्रणित आघाडीशी तर काही ठिकाणी माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष, तसेच प्रादेशिक पक्षांशी असेल.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या सभेत विनोद-थट्टा होते, मुद्द्यांमध्ये काही दम नसतो: पियुष गोयल
महाराष्ट्रात लोकसभेच्या अनुषंगाने विविध भागांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभा होत असून याचा संपूर्ण खर्च काँग्रेस आणि अंशी[एनसीपीच्या प्रचारखर्चात टाकायला हवा, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्षांसाठी सरोगेटेड प्रचार करत आहे, अशी खरमरीत टीका देखील त्यांनी केली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका करताना महाराष्ट्रात ४० ते ४२ जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील, असा दावा देखील केला.
6 वर्षांपूर्वी -
जेट एअरवेज आणि एअर इंडिया खरेदीत रिलायन्सला रस
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने जेट एअरवेज आणि एअर इंडिया या २ बड्या नागरी विमान वाहतूक कंपन्या स्वतःच्या ताब्यात घेण्यात रस दाखविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज बुधवारी बंद पडली असून, सरकारी मालकीची एअर इंडियाही अखेरच्या घटका मोजत आहे. दोन्ही कंपन्यांचा मिळून भारतीय हवाई उड्डाण क्षेत्रात एकूण २५ टक्के बाजार हिस्सा आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा