महत्वाच्या बातम्या
-
VIDEO: हे काय? मोदींच्या हेलिकॉप्टरमधून बॉक्स उतरवून ते पटापट इनोव्हामध्ये लोड केले?
काँग्रेस पक्षाने एक व्हिडिओ सार्वजनिक करून मोदींना कोंडीत पकडून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्नाटकातील सभेसाठी मोदी एका हेलिपॅडवर उतरले आणि त्याच दरम्यान काही घडलेला घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाल्याने खळबळ माजली आहे. त्यानुसार मोदींच हेलिकॉप्टर जमिनीवर उतरताच काही क्षणात एक मोठा बॉक्स उतरविण्यात आला आणि तो काही जणांनी धावत पळत एका जवळच उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हामध्ये लोड करण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
मोदींकडून १० एप्रिल २०१५ ला राफेल कराराची घोषणा, मग ६ महिन्यांत अंबानींच्या कंपनीला करमाफी
फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल लढाऊ विमाने घेण्याचा सौदा भारत व फ्रान्स यांच्यात होत असतानाच दुसऱ्या बाजूला अनिल अंबानी यांच्या फ्रान्समध्ये व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीस तेथील सरकारने सुमारे १,२६० कोटी रुपयांचा (१४३ दशलक्ष युरो) कर माफ केल्याचे वृत्त ‘ल मॉन्द’ या अग्रगण्य फ्रेंच वृत्तपत्राने दिल्यानंतर भारतात आधीपासून सुरु असलेल्या राफेल वादास शनिवारी नवी उकळी फुटली.
6 वर्षांपूर्वी -
जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना राहुल गांधींकडून श्रद्धांजली
अमृतसरमध्ये ब्रिटिश काळात झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला आज, १३ एप्रिलला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने याठिकाणी या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वंकय्या नायडू आणि पंजाबचे राज्यपाल शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजप चक्रव्यूहात? पक्षाला देणगी देणार्या प्रत्येकाची नावे सांगा: सर्वोच्य न्यायालय
सुप्रीम कोर्टाने ‘निवडणूक रोखे’ प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशाने भारतीय जनता पक्षाला अक्षरश: घाम फुटला आहे. या रोख्यांद्वारे भारतीय जनता पक्षाने देणग्या मिळवून सर्वाधिक रक्कम पक्षाच्या तिजोरीत भरली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने देणगी देणार्या प्रत्येकाच्या नावाची यादी तयार करून ती यादी मुख्य निवडणूक आयोगाला सादर करण्यास सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूमध्ये आरएसएस'ची सत्ता येऊ देणार नाही
तामिळनाडूवर नागपूरची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सत्ता कधीही येऊ देणार नाही, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर केले. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा ठाम विश्वास देखील त्यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
हवेची दिशा? प्रत्येक बातमीवर मोदींवर समाज माध्यमातून नकारात्मक हल्लाबोल
सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी देशभर सभांचा धडाका लावला आहे. त्यात सभांमधून येणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यातून देखील अनेक बातम्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. देशभर निरनिराळ्या सर्व्हेमध्ये जरी भाजपाला पोषक वातावरण दाखवण्यात आलं असलं तरी समाज माध्यमांवर उमटणाऱ्या प्रतिक्रियांमधून वेगळेच निष्कर्ष समोर येताना दिसत आहेत. त्यासाठी आम्ही हिंदी, इंग्रजी आणि मराठी वृत्तवाहिन्यांच्या तसेच वर्तमानपत्रांमधील समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या बातम्यांचा आणि त्यावर येणाऱ्या संपूर्ण प्रतिक्रियांचा आढावा आपण घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते म्हणाले 'आता बॉम्बस्फोट होत नाहीत'; मोदींना पुलवामात काय झालं ते अजून माहित नाही?
आता बाँबस्फोट होत नाहीत. कारण दहशतवाद्यांना माहीत आहे चौकीदार त्यांना कोठुनही शोधून काढील आणि शिक्षा करेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये केले. काँग्रेस – एनसीपीच्या काळात दहशतवाद वाढला होता. देशात दररोज कुठे ना कुठे बाँबस्फोट होत होते. त्यात सामान्य लोकांचे बळी पडत होते.
6 वर्षांपूर्वी -
मतदारांचा आरोप; आम्ही बटण हत्तीचं दाबलं पण चिठ्ठी कमळाचीच बाहेर आली
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच देशातील एकूण ९१ मतदारसंघात मतदान घेण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांसह दक्षिण आणि उत्तर भारतातही ठरल्याप्रमाणे मतदानप्रकिया पार पडली. परंतु, बहुतांश ठिकाणी ईव्हीएममध्ये मोठे घोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यूपीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला BSP मतदान केल्यास, ते मत भारतीय जनता पक्षाला मिळत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर चीनच्या दुप्पट, आकडा १३६ कोटींवर
भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती १३६ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, २०१० ते २०१९ या दहा वर्षाच्या काळात १.२ टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग-न्यूज: सैन्याचा राजकीय वापर थांबवा, सैन्यदलाच्या ८ माजी प्रमुखांचं राष्ट्रपतींना पत्र
भारतीय सैन्यदलाच्या ८ माजी प्रमुखांनी राष्ट्रपतींना लेखी पत्र लिहून भारतीय लष्कराचा राजकीय वापर करण्यापासून समज द्यावी अशी विनंती केली आहे. तसेच भारतीय सैन्यदलाच्या कोणत्याही ऑपरेशनचा राजकीय फायदा घेऊ नये असे निर्देश राजकीय पक्षांना द्यावेत अशी विनंती त्या पत्रात करण्यात आल्याचे वृत्त आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडताच काही वेळाने ही माहिती बाहेर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
२००४ व २०१४ मध्ये शपथपत्रात शिक्षण पदवीधर; तर २०१९ मध्ये पदवीधर नाही?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं शिक्षण, त्यांची पदवी नेहमीच वादात आणि चर्चेचा विषय राहिली. ५ वर्षांपूर्वी इराणी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून गदारोळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपण परदेशातील येल विद्यापठातून ग्रॅज्युएट असल्याचं स्मृती यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितलं होतं. परंतु आता लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी वेगळीच माहिती दिली आहे. आपण ग्रॅज्युएशन पूर्ण न केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद करत स्वतःच्या पदवीचा वाद कायमचा संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्मृती इराणी ग्रॅज्युएट नाहीत; निवडणूक शपथपत्रातून सत्य समोर आलं
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं शिक्षण, त्यांची पदवी नेहमीच वादात आणि चर्चेचा विषय राहिली. ५ वर्षांपूर्वी इराणी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून गदारोळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपण परदेशातील येल विद्यापठातून ग्रॅज्युएट असल्याचं स्मृती यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितलं होतं. परंतु आता लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी वेगळीच माहिती दिली आहे. आपण ग्रॅज्युएशन पूर्ण न केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद करत स्वतःच्या पदवीचा वाद कायमचा संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
दणका! कार्यक्रमांमधून विशिष्ट पक्षाच्या स्कीम्स प्रमोट केल्याने झी वाहिनीवर कारवाई
मागील काही दिवसांपासून झी वाहिनीवर आचारसंहितेचे सर्व नियम पायदळी तुडवत मालिकांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रचार सुरू होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून पॉलिटीकल पार्टीच्या स्कीम्स प्रमोट करण्यात येत होत्या. यावर भारतीय निवडणूक आयोगाने आपला आक्षेप नोंदवत कडक कारवाई केली आहे. आचार संहिता लागु असताना अशा प्रकारे प्रचार करणे झी वाहिनीला महागात पडले आहे. त्यामुळे आज झी वाहिनीच्या कार्यक्रमांचे प्रसारण रात्री ८ ते १० यावेळेत बंद करण्यात आले होते. झी वाहिनीने प्रचार केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या चेहऱ्यावर दिसला लेझर लाइट; काँग्रेसला स्नायपर हल्ल्याची भीती
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक लेखी पत्र लिहिलं आहे. अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश यांनी मिळून हे पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी अमेठीत पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणी तरी तब्बल ७ वेळा हिरव्या कलरची लेझर लाइट मारली. स्नायपर हल्ल्यात अशी लेझर लाइट वापरली जात असल्याची शक्यताही काँग्रेसनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या जीविताला धोका असून, त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी २००४ मधील इतिहास विसरु नये : सोनिया गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००४ मधील इतिहास विसरु नये, अटल बिहारी वाजपेयी देखील अजिंक्य होते परंतु त्यावेळी देखील आम्हीच जिंकलो होतो. दरम्यान, २००४ मध्येही अनेक राजकीय विद्वान मंडळी आणि राजकीय विश्लेषक दावा करत होती अटलबिहारी वाजपेयी पुन्हा निवडून येतील, परंतु त्यांचा दावा फोल ठरला आणि जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिलं होतं अशी आठवण करुन देत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभे दरम्यान यूपीत फटका बसू नये म्हणून अल्पेश ठाकोर यांचा भाजपप्रवेश लांबणीवर?
आज ११ एप्रिल म्हणजेच गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवारी अल्पेश ठाकोरने राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा झटका दिला. गुजरातमधील ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून परिचित असलेले अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली असली तरी त्यांच्या समर्थकांनी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूक २०१९; देशभरात ९१ मतदारसंघांत आज मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील अठरा राज्ये आणि २ केंद्र शासित प्रदेशांतील तब्बल ९१ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडणार आहे. त्यात विदर्भातील दहा पैकी सात मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व पूर्व तयारी केली आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५,००० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ११,००० सुरक्षा दल सज्ज ठेवण्यात आली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राफेल प्रकरण गुप्ततेच्या कारणास्तव गुंडाळण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
राफेल लढाऊ विमाने खरेदीच्या व्यवहारात ‘क्लीन चिट’ देण्याच्या आधीच्या निकालाचा फेरविचार करण्याचा विषय गुणवत्तेवर सुनावणी घेऊ नये आणि राष्ट्रीय सुरक्षा व गोपनीयतेच्या मुद्द्यांवर गुंडाळून टाकावा, ही विनंती अमान्य करून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार दणका दिला.
6 वर्षांपूर्वी -
ग्रामीण गुजरातमध्ये भीषण दुष्काळ; हंडाभर पाण्यासाठी ४-५ किलोमीटर पायपीट
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठे मोठ्या घोषणा करण्यात गुजरातचे नेते सर्वाधिक आघाडीवर आहेत. २०१४ पूर्वी गुजरात मॉडेलच्या विषयी देखील बरीच चर्चा पाहायला मिळाली, मात्र गुजरातच्या ग्रामीण भागातील भीषण वास्तव समोर येत आहे. गुजरातमधील सोनगड जिल्ह्यातील गावाप्रमाणे इतर अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला असून स्थानिकांना हंडाभर पाण्यासाठी ४-५ किलोमीटर इतकी रोजची पायपीट करावी लागत आहे.
6 वर्षांपूर्वी -
'द हिंदू' विजय? राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का
राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी करारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच जोरदार धक्का दिल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप सुप्रीम कोर्टाने स्पष्ट फेटाळला आहे. फ्रान्ससमवेत करण्यात आलेल्या राफेल कराराच्या निकालाची फेरतपासणी करण्यासाठी ज्या दस्तऐवजावर विशेषाधिकारी असे नमूद केले आहे त्यावर अवलंबून राहता येणं शक्य होणार नाही अशी प्राथमिक हरकत केंद्र सरकारने घेतली होती. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today