महत्वाच्या बातम्या
-
दंडाधिकाऱ्यांचा अहवाल; जेएनयू'त 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असं दंडाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे संबंधित व्हिडीओ छेडछाड करण्यात आलेली होती, असंदेखील या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सदर अहवाल दिल्ली सरकारला आज सादर केला जाऊ शकतो. एकूण २५ पानांच्या या अहवालात जेएनयूमध्ये घडलेल्या संपूर्ण घटनांचा क्रम देण्यात आलेला आहे.
6 वर्षांपूर्वी -
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात घट
रिझर्व्ह बँकेनं गृहकर्ज घेणाऱ्यांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने आज रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आले आहेत. २०१९-२० या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत या निर्णय घेण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी आज वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी २ मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. यूपीतील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या २ मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
IPL २०१९: मुंबईचा चेन्नईवर दणदणीत विजय
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानात जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या माऱ्याच्या जोरावर चेन्नईचा विजयरथ रोखला. यासह मुंबईने आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत शंभराव्या विजयाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नईचा तब्बल ३७ धावा अशा मोठ्या फरकाने पराभव केला.
6 वर्षांपूर्वी -
सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही; माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास संतापले
माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास यांनी युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना चांगलेच झाडाले आहे. देशाचं सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे रामदास यांनी ध्यानात आणून दिले आहे. आदित्यनाथ यांनी एका सभेदरम्यान सैन्याचा उल्लेख “मोदीजी की सेना” असा उल्लेख करत सैन्याच्या राजकीय वापर करणाचा प्रयत्न केला होता. त्यावर संतापलेल्या माजी नौदल प्रमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदार भाजप नेते व अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून १.८ कोटी रूपये जप्त
अरूणाचल प्रदेशमध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा गंभीर आरोप कांग्रेसने भारतीय जनता पक्षावर केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेत भाजपावर हा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, पैसे जप्त केलेल्या कारवाईचा व्हिडीओ देखील यावेळी जारी केला आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून तब्बल १.८ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष हे पैसे मतं विकत घेण्यासाठी वापरणार होते का? हा काळा पैसे आहे का? असे अनेक प्रश्न काँग्रेसने आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बिहारमधील मोदींच्या सभेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांचा राडा, एकमेकांना खुर्चा फेकून मारल्या
काल बिहारमधील गया येथे नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. परंतु, मोदींच्या भाषणादरम्यानच उपस्थित भाजप कार्यकर्त्यांचे दोन गट आपसात भिडले आणि मोठी धांदल उडाली होती. भाजप कार्यकर्ते वरिष्ठ नेत्याचं ऐकण्याच्या देखील मनस्थितीत दिसत नव्हते. नेत्यांनी आवाहन करून देखील हाणामारी सुरूच होती.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणातून महागाई, बेरोजगारी व दुष्काळ गायब
लोकसभेच्या आखाड्यात सध्या सर्वच पक्षांकडून प्रचारसभा आणि भाषणं सुरु झाली आहेत. परंतु २०१४ मध्ये विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढवणारे नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे सध्या सामान्य माणसाच्या दैनंदिन विषयांना बगल देत भगवं वादळ, मंदिर आणि पाकिस्तान अशा विषयावर भाषणं ठोकताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या राफेल जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राफेल लढाऊ विमानांच्या कराराचा मुद्दा आक्रमकपणे वापरला जात असताना याबाबत काँग्रेसने जाहिरातीत राफेलच्या प्रतिकृतीच्या वापर केल्याने निवडणूक आयोगाने त्याबाबत आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या ९ पैकी ६ जाहिरातींवर आयोगाने आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये राफेलबाबत असलेल्या जाहिरातीचाही समावेश करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकच्या गोळीबारात ५ नागरिक जखमी
भारताविरुद्ध पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कुरापती काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जम्मू-कश्मीरच्या पुंछ भागात शाहपुर सेक्टर आणि राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार आणि तोफांचा मारा करण्यात आला आहे. या गोळीबारात पाच नागरिक जखमी झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
फेसबुकने काँग्रेस संबंधित तब्बल ६८७ पेज, अकाऊंट्स डिलीट केले
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकने कॉंग्रेस पक्षाला जोरदार डिजिटल धक्का दिला आहे. फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेली तब्बल ६८७ पेज आणि अकाऊंट्स डिलीट केली आहेत. त्यांच्या माहितीनुसार आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसेच निलंबित करण्यात आलेली सुमारे ६८७ फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
इस्त्रोची भव्य कामगिरी! एमिसॅटसह २८ देशांचे नॅनो उपग्रह अवकाशात झेपावले
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो आज आणखी एक नवा इतिहास रचला आहे. श्रीरहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-४५द्वारे एमिसॅटसह विविध देशांचे नॅनो उपग्रह अवकाशात झेपावले आहेत. यात उपग्रहात भारताचा एक, अमेरिकेचे 24, लुथानियाचे 2 तर स्पेन आणि स्विजर्झलँडचे प्रत्येकी एक अशा तब्बल २९ उपग्रहांचा समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
संबित पात्रांनी व्हिडिओ शेअर केला आणि सरकारच्या उज्वला योजनेची पोलखोल झाली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना पक्षाने ओरिसातील पुरी येथून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं आहे. त्यानंतर ते इथे हजर झाले असून जोरदार प्रचाराला लागले आहेत. परंतु, समाज माध्यमांवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे एकूणच भाजप आणि स्वतः नरेंद्र मोदी तोंडघशी पडल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. युपीतील पारंपारिक अमेठी मतदारसंघातून त्यांचे नाव यापूर्वीच जाहीर झाले आहे. तसेच आता ते केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून आज पत्रकार परिषद घेऊन ही अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामासारखं काहीतरी होणार हे नक्की होतं आणि तसंच झालं: रॉ गुप्तचर यंत्रणेचे माजी अधिकारी
जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेला दहशदवादी हल्ला म्हणजे लोकसभा निवणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाला मिळालेली एक भेट आहे, असं वक्तव्य रॉ या गुप्तचर यंत्रणेच्या रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंगचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी शनिवारी केलं. तसेच पाकिस्तानात असणाऱ्या आतंकवादी तळांवर हल्ला करणं हे अगदी योग्य असल्याचंही मत देखील त्यांनी मांडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
खान डौलत डुलत आला, सैय्यद बंडा त्याच्या संगतीला: राष्ट्रवादीकडून व्हिडिओ प्रसिद्ध
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एनसीपीने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘अफझल खानाच्या फौजेत फितूर वाघ’ अशी जहरी टीका एनसीपीने केली आहे. त्याचवेळी पाच वर्ष अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज थेट त्यांच्याच छावणीत. हेच का शिवरायांचे मावळे?? यांनी शिवरायांच्या नावाने मते मागणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे, असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही अफझल खानाच्या फौजेत जाऊन सेनेच्या सेनापतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगर गाठले, असे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केलीआहे.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ला हा निवडणुकांपूर्वी जैशकडून मोदींना व भाजपला मिळालेली एक भेट: रॉ R&A चे माजी प्रमुख
जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेला दहशदवादी हल्ला म्हणजे लोकसभा निवणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाला मिळालेली एक भेट आहे, असं वक्तव्य रॉ या गुप्तचर यंत्रणेच्या रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंगचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी शनिवारी केलं. तसेच पाकिस्तानात असणाऱ्या आतंकवादी तळांवर हल्ला करणं हे अगदी योग्य असल्याचंही मत देखील त्यांनी मांडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवार - सचिन तेंडुलकर भेट; चर्चांना उधान
देशभरात आगामी लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापत चालले असून निवडणूकांची रणधुमाळी सुुरू आहे.यादरम्यानच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना जोरदार उधाण आले आहे. तब्बल ३० मिनिटं दोघांमध्ये सविस्तर चर्चा सुरु होती. असं असलं तरी दोघांच्या भेटीचं कारण अजून समोर आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी म्हणाले सपा-आरएलडी-बीएसपी म्हणजे 'शराब', मग हे काय?
मेरठ तेथील भारतीय जनता पक्षाच्या प्रचार रॅलीत उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांना जोरदार पणे लक्ष केलं. त्यावेळी त्यांना समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल आणि बहुजन समाज पार्टी या पक्षांना विशेष लक्ष करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. त्यावेळी विरोधकांच्या या आघाडीला त्यांनी वेगळंच नाव ठेवून त्याचा अर्थ देखील सांगितला.
6 वर्षांपूर्वी -
जम्मू: CRPF चा ताफा जात असताना पुन्हा कारमध्ये स्फोट, जीवितहानी नाही
जम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये मोठा स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. प्रसार माध्यमांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. परंतु या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं वृत्त आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS