महत्वाच्या बातम्या
-
दानवेंकडून सीआरपीएफ'च्या ४० शहिदांचा थेट 'अतिरेकी' म्हणून उल्लेख
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अजून एका वादात सापडले आहेत. याआधी शेतकऱ्यांचा ‘साले’ असा अपमानजनक उल्लेख करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी आता कहर केला आहे. सोलापूरातील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दानवे यांनी पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी शहीद जवानांऐवजी त्यांचा थेट ‘अतिरेकी’ असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर कडाडून टीका केली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती
रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती
6 वर्षांपूर्वी -
मी ब्राह्मण असल्याने नावाआधी ‘चौकीदार’ लावू शकत नाही: सुब्रमण्यम स्वामी
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी भारतीय जनता पक्षाने ‘मैं भी चौकीदार’ मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू होताच सर्व पक्षाच्या नेत्यांनी समाज माध्यमांवर आपल्या नावाआधी चौकीदार शब्द लावला. मात्र, खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या नावाआधी ‘चौकीदार’ हा शब्द जोडला आहे. पण सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र आपण ब्राह्मण आहे, त्यामुळे नावात ‘चौकीदार’ शब्द लावू शकत नसल्याचे म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
५६ इंच छातीचे मोदी कुलभूषण जाधवला का नाही सोडवून आणत, पवारांचा सवाल
कराड येथील महाआघाडीच्या प्रचारसभेत एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. या देशाच्या संरक्षण दलांबाबत आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. अभिनंदनला अटक केल्यानंतर जगातील देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला आणि अभिनंदनची सुटका झाली. जर मोदींची खरंच ५६ इंचाची छाती असेल तर ते कुलभूषण जाधव यांना सोडवून का आणत नाहीत, असा रास्त सवाल त्यांनी उपस्थित केला. सैनिकांच्या पराक्रमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदारकडून डिजिटल चोरी; पक्षाच्या वेबसाईटसाठी दुसऱ्या कंपनीचा फुकट कोड चोरल्याचा आरोप
भाजपने त्यांच्या पक्षाच्या अधिकृत वेबसाईटसाठी टेम्प्लेट चोरल्याचा आरोप आंध्र प्रदेशातील एका वेब डिझाईन कंपनीनं केला आहे. भाजपानं कोणतंही क्रेडिट न देता टेम्प्लेटची बॅकलिंक काढून टाकल्याचा आरोप डब्ल्यूथ्रीलेआऊट्सनं (W3Layouts) केला. भाजपानं टेम्प्लेटसाठी कोणतंही क्रेडिट दिलं नाही. उलट त्याची बॅकलिंक मुद्दामहून काढून टाकली, असा दावा कंपनीनं केला.
6 वर्षांपूर्वी -
चीनकडून पाकिस्तानला तब्बल २ अब्ज डॉलर्सचे कर्ज
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला चीनकडून तब्बल 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार आहे. चिनी सरकारकडून याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असून २५ मार्चपर्यंत स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या खात्यात २.१ अब्ज अमेरिकी डॉलर्स (१५ अब्ज यूआन) जमा होतील असे पाकच्या वित्त विभागाचे प्रवक्ते खकान नजीब खान यांनी सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
दिल्ली पाकिस्तानी उच्चायुक्तालयात पाकिस्तान राष्ट्रीय दिन साजरा, मोदींकडून शुभेच्छा
पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवला. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात होणाऱ्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमावर भारताने बहिष्कार घातला. पण त्याचवेळी मोदींनी पाकिस्तानी जनतेला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
6 वर्षांपूर्वी -
#IPL२०१९: आजपासून आयपीएलचा धमाका सुरू
बाराव्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेचा हंगाम आजपासून सुरू होत असून, सलामीच्या लढतीत महेंद्रसिंग धोनीचा गतविजेता चेन्नई संघ आणि विराट कोहलीचा बंगळुरू संघ यांच्यात मुकाबला होणार आहे. तीनवेळा ही स्पर्धा जिंकणारा चेन्नई संघ जेतेपदाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाची दुसरी यादी; पुण्यातून बापट तर बारामतीतून कुल यांना उमेदवारी
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे. काल रात्री उशिरा भाजपने या उमेदवार यादीची घोषणा केली. बारामती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कुल या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी आहेत. बारामतीमध्ये आता एनसीपीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कुल असा सामना होईल.
6 वर्षांपूर्वी -
पीएम नरेंद्र मोदी सिनेमासाठी जावेद अख्तर यांनी कोणतही गाणं लिहिलं नाही, तरीही पोष्टरवर नाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर प्रदर्शित होत असलेला सिनेमा सुरवातीलाच अडचणीत सापडला आहे. कारण असं आहे की या सिनेमासाठी कोणताही गाणं लिहिलेलं नसताना देखील त्याच्या पोश्टरवर जावेद अख्तर यांचं नाव झळकलं आहे. त्यामुळे जावेद अख्तर त्याविरूद्ध कोणाचीही कायदेशीर कारवाई करणार का ते पाहावं लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
विषय एकच 'लष्कर', पण लष्करासमोर असताना व उद्योगपतींसोबत असताना
विषय एकच ‘लष्कर’, पण लष्करासमोर असताना व उद्योगपतींसोबत असताना
6 वर्षांपूर्वी -
नोटबंदीचा हेतूच फसला! चलनातील नोटांची संख्या पुन्हा वाढली: आरबीआय अहवाल
देशातील रोख रक्कमेत होणार्या व्यवहारांमुळे काळ्या पैशाच्या निर्मितीला चालना मिळते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी जाहीर केली. मात्र रोख रक्कमेवर मर्यादा घालण्याचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला. मार्च २०१९ पर्यंत नोटांचे प्रमाण १९.१४ टक्क्यांनी वाढले आहे. चलनातील एकूण नोटा २१.४१ लाख कोटी एवढ्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या बड्या नेत्यांना येडियुरप्पांनी तब्बल १८०० कोटी रुपये दिले: कॅरावान मासिकाचा रिपोर्ट
काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी तब्बल १८०० कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीला वाटले असल्याच्या खळबळजनक आरोप रिपोर्टवरुन आक्रमक भूमिका घेत टीका केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत येडियुरप्पा यांनी यासंबंधी स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली: नरेंद्र मोदी
काँग्रेसच्या परदेश विभागाचे अध्यक्ष आणि गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय सॅम पित्रोडा यांच्या वादग्रस्त विधानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पित्रोडांची विधानं अतिशय लज्जास्पद असून काँग्रेसनंपाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा सुरू करण्यास केली आहे, अशा कडक शब्दांमध्ये मोदी बरसले आहेत. पुलवामा हल्ल्यामागे काहीजणांचा हात होता. त्यासाठी संपूर्ण देशाला जबाबदार धरायला नको, असं विधान पित्रोडा यांनी केलं. त्यावरुन मोदींनी सॅम पित्रोडा आणि राष्ट्रीय काँग्रेसवर हल्लाबोल केला.
6 वर्षांपूर्वी -
स्टर्लिंग बायोटेक घोटाळा: घोटाळेबाज गुजराती व्यापारी हितेश पटेल याला अल्बानियात अटक
पीएनबी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी निरव मोदी याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्यानंतर भारताला आणखी एक यश आले आहे. ५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी हितेश पटेल याला अल्बानियात अटक करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशातील मोबाईल क्रांतीचे जनक विचारतात, 'बालाकोटमध्ये खरंच ३०० दहशतवादी मारले का?'
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असले तरी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०११ साली गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रण्ट गुजरात समिट वेळी त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सॅम पित्रोदा हे भारतातील मोबाईल क्रांतीचे जनक म्हणून परिचित आहेत आणि राजीव गांधी पंतप्रधान असताना टेलिकॉम क्रांती झाली त्यात त्यांची मोलाची भूमिका होती.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ मध्ये गंभीरने जेटलींचा प्रचार केला आणि ते पराभूत झाले, आता तो भाजपचा प्रचार करणार
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्याने आमच्या पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
अडवाणींनंतर कोण? त्यांच्या योजना काँग्रेस आणि भाजपातील वरिष्ठांविरुद्ध देखील?
कालच भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि त्यात पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगर लोकसभेतून उमेदवारी न देता थेट अमित शहांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत असून अडवाणी नंतर कोणाचे नंबर असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यासाठी मोदी आणि अमित शहा जोडीचे जुने फोटो देखील व्हायरल केले जात आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पहिली यादी जाहीर; मोदींच्या राजकीय गुरूंचा पत्ता कट? अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगर मतदारसंघातू भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक लालकृष्ण अडवाणी यांना पक्षाकडून डावललं जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सोशल मीडिया स्ट्रॅटेजिसाठी काँग्रेसकडून देशातील ३ मोठ्या एजन्सीची नेमणूक
लोकसभा निवडणुका घोषित झाल्यावर सर्वच पक्ष प्रचार योजना आणि उमेदवारांच्या निवडीत दंग झाले आहेत. या लोकसभा निवडणुकीत समाज माध्यमांचा प्रभावी, नियोजनबद्ध तसेच भाजपाला तगडं आव्हान देण्यासाठी देशातील ३ मोठ्या एजन्सींना नेमले आहे. त्यामध्ये डिझाईनबाक्सड, निकसन आणि सिल्वरपुष या बड्या नावांचा समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC