महत्वाच्या बातम्या
-
जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस
भारतासह अमेरिका, युरोप आणि जगातील अनेक ठिकाणी फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झालं आहे. जवळपास ३० मिनिटांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प आहे. लाखो फेसबुक युजर्सचं अकाऊंट सुरू होत नाहीय, तर अनेकांना लाईक आणि कमेंट करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवरही फोटो अपलोड करताना त्रास सहन करावा लागतो आहे. यामुळे ट्विटरवर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मसूद अजहरला युनोत जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनचा सुरुंग
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं पुन्हा एकदा सुरुंग लावला आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. परंतु चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.
6 वर्षांपूर्वी -
अजब! २५० दहशतवादी मारल्याचा आकडा मी सर्वसामान्यांमध्ये रंगलेल्या चर्चेतून दिला: अमित शहा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये २५० दहशतवादी ठार झाल्याचा दावा एका सभेत केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांवर जोरदार टीकास्त्र सोडल होतं, तसेच २५०चा नेमका आकडा अमित शहा यांनी कोणत्या आधारावर दिला, असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता, त्यावर अखेर अमित शहा यांनी मौन सोडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला
मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला
6 वर्षांपूर्वी -
मालिका विजयासाठी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार
भारत-ऑस्ट्रेलिया या संघांमधील मालिकेचा अखेरचा आणि निर्णायक सामना आज बुधवारी राजधानी दिल्लीतील फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदानात रंगणार असून आजचा सामना जिंकणारा संघ ही एकदिवसीय मालिका आपल्या नावावर करणार असल्याने दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत. त्यामुळे नवी दिल्लीतील फिरोज शाह कोटला येथे होणार्या पाचव्या एकदिवसीय सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधींच पहिलं ट्वीट; ‘हा’ दिला संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून मंगळवारी कार्यकारिणीची बैठक व जाहीर सभा घेऊन काँग्रेसने लोकसभा निवडणुकांचे जोरदार रणशिंग फुंकले. काँग्रेसच्या गुजरातमधील जाहीर सभेला बऱ्याच वर्षांनी इतकी प्रचंड गर्दी झाली होती. गुजरातमधील जाहीर सभेनंतर प्रियंका गांधी यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. प्रियंका गांधी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्येच ट्विटर अकाऊंट सुरू केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: पीएनबी महा-घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला मोदी 'मेहुलभाई' म्हणाले होते
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ नोव्हेंबर २०१५ रोजी तीन सुवर्ण योजनांचे उदघाटन करण्यात आले. सुवर्ण रोखे, सुवर्ण ठेव आणि सोन्याची नाणी अशा योजनांतून देशात पडून राहिलेले सोने चलनात आणण्याचा या योजनांमागील उद्देश होता. या योजनांच्या उद्घाटनाप्रसंगी नरेंद्र मोदींनी भाषण केले होते. या कार्यक्रमात गीतांजली जेम्सचा अध्यक्ष आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी हा देखील उपस्थित होता. ज्वेलरी क्षेत्रातील मोठे व्यापारी तसेच रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. २०१५ मध्ये नीरव मोदीचा घोटाळा उघड झाला नव्हता आणि त्यावेळी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही आघाडीचे हिरे व्यापारी होते. मोदींचा जो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे तो याच कार्यक्रमातील आहे. या भाषणात मोदींनी मेहुल चोक्सीचा उल्लेख मेहुल भाई असा केला होता.
6 वर्षांपूर्वी -
फेसबुकला भाजपा आमदाराच्या अकाऊंटवरून अभिनंदन यांचे पोस्टर हटवण्याचे आदेश
केंद्रीय निवडणूक आयोगाने समाज माध्यमांवर विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र असलेले पोस्टर शेअर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला दणका दिला आहे. दिल्लीतील भाजपा आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी फेसबुकवर शेअर केलेले २ पोस्टर हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने फेसबुकला दिले आहे. या दोन्ही पोस्टरवर अभिनंदन यांचे छायाचित्र होते.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेला तब्बल ५० हजार कोटी उधळले जाणार, तर समाज माध्यमांवर ५,००० कोटी
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात २ महिने ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडतील हे निश्चित झाले आहे. दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या (CMS) अहवालानुसार भारतातील ही निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात खर्चिक निवडणूक ठरणार आहे. भारतातील निवडणुकीवर यंदा तब्बल ५० हजार कोटी रुपये (७ अब्ज डॉलर) इतका प्रचंड खर्च होण्याची शक्यता असून अमेरिकेतील निवडणुकीवर २०१६ साली ६.५ अब्ज डॉलर खर्च झाले होते. तर भारतात २०१४ साली निवडणुकीवर पाच अब्ज डॉलर खर्च झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या गुजरातमधूनच काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुजरातच्या अहमदाबाद शहरात होणार आहे. या बैठकीसाठी कॉंग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या होमपिचची निवड केल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी! मसूद अजहरला कोणी सोडलं ते शहिदांच्या कुटुंबियांना सांगावं: राहुल गांधी
पुलवामा हल्ल्यात चाळीस सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूमध्ये जैश-ए-महंम्मदचा हात असल्याचे उघड झाले आहे. परंतु, त्याला अनुसरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहरची १९९९ मध्ये भारताच्या कैदेतून सुटका कोणी केली होती, हे मोदींनी पुलवामातील त्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना सांगावं, असे त्यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
इथिओपियातील विमान दुर्घटनेत १५७ प्रवाशांचा मृत्यू, ४ भारतीयांचा समावेश
इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या विमानातून एकूण १४९ प्रवासी आणि ८ कर्मचारी प्रवास करत होते. विमान कोसळून तब्बल १५७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ भारतीय प्रवाशांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या उपस्थितीत हार्दिक पटेल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
गुजरातमधील पटेल समाजाच्या आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून अधिकृतपणे याबद्दलची माहिती दिली. गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट
देशात सर्वत्र भ्रष्टाचार आहे, परंतु आपले संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट आहे. राफेल लढाऊ विमानखरेदीतील संशयास्पद करारावरून ही बाब मोठ्या प्रमाणावर अधोरेखित होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी ‘मुंबई कलेक्टिव्ह’च्या परिसंवादात व्यक्त केले.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाने तंबी दिली तरी भाजपकडून प्रचारात लष्कराच्या जवानांच्या फोटोंचा वापर
लोकसभा निवडणुका आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच निवडणुकीच्या तारखा येत्या २ ते ३ दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. याच अनुषंगाने शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकित निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील निवडणूक आयोगाने असे निर्देश दिले होते. तरी देखील भाजपच्या पोस्टरवर भारतीय लष्कराच्या जवानांचे फोटो बिनधास्त वापरले जात आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाला तंबी? प्रचारात लष्कराच्या जवानांचे फोटो वापरू नका: निवडणूक आयोग
लोकसभा निवडणुका आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच निवडणुकीच्या तारखा येत्या २ ते ३ दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. याच अनुषंगाने शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकित निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील निवडणूक आयोगाने असे निर्देश दिले होते.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकी दरम्यान पुलवामासारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल : राज ठाकरे
भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. निवडणुकांआधी आणखी एक हल्ला होण्याची शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मनसेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयाची मध्यस्थ समितीची भूमिका आश्चर्यकारक : आरएसएस
राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काल मध्यस्थीसाठी तिघांची नियुक्ती केली. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश फकीर महम्मद इब्राहिम खलिफउल्ला या मध्यस्थ समितीचे प्रमुख असून त्यात वरिष्ठ वकील श्रीराम पांचू तसेच आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान RSSला सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका पटलेली दिसत नाही. दरम्यान, देशातील हिंदूंकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: नीरव मोदी लंडनच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरतो
पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून फरार झालेला नीरव मोदी सध्या इग्लंडची राजधानी लंडनमध्ये राहत असल्याचे समजते आहे. द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने मोदीचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यात तो लंडनच्या रस्त्यांवर मोकळेपणाने फिरताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेजगाम जिल्ह्यामधून भारतीय लष्कराच्या एका जवानाचं अपहरण
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. तसेच बेजगाम जिल्ह्यामधून एका भारतीय लष्कराच्या जवानाचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात प्रचंड भीतीदायक वातावरण पसरले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY