महत्वाच्या बातम्या
-
कर्तारपूर कॉरिडॉर संदर्भात पाकचे अधिकारी भारत भेटीवर येणार: पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालय
पुलवामा भ्याड हल्ला आणि एअर स्ट्राईकनंतर भारत पाकिस्तानमधील परिस्थिती नाजूक झालेली असताना आता शांतीवार्ता सुरु होण्याचे अनेक प्रकार पुढे येऊ लागले आहेत आणि तणाव कमी करण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळेच कर्तारपूर कॉरिडॉर हा एक भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर करण्याचा महत्वाचा मार्ग ठरण्याची शक्यता आहे. कारण विषयाला अनुसरून चर्चेसाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच भारत भेटीवर येणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॅग पुरावे: अमेठीत ऑर्डनन्स फॅक्टरी २००७ पासून, एके २०३ बंदुकांबद्दल वाचून हसा! मोदींनीं गंडवल?
अमेठीत राजकारण तापू लागलं आहे आणि मोदींच्या कालच्या अमेठीतील सभेनंतर लष्करी उत्पादन करणाऱ्या त्या फॅक्टरीवरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. त्यानंतर सरकार पुरस्कृत नसलेल्या माध्यमांनी सखोल विषयात जाऊन तथ्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी धादांत खोटं बोलतात याचे कागदोपत्री पुरावेच समोर आले आहेत. सध्या लष्कराच्या नावाने भावनिक झालेले वातावरण पाहून मी सांगेन ती पूर्व दिशा लोकं समजतील अशा अविर्भावात ते वावरत आहेत. लष्कराच्या आडून राजकारण खेळत मी म्हणजे भारत आणि मी म्हणजे भारतीय लष्कर असा कांगावा करून लोकशाहीतील सर्व विरोधक म्हणजे पाकिस्तान समर्थक आहेत अशी हवा निर्मिती करून, देशातील सर्वच मोठ्या राजकारण्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करण्याची रणनीती आखात आहेत असंच पुरावे सांगतात. त्यासाठी कितीही खोटं बोलायला तयार आहेत असं पुरावे सांगतात.
6 वर्षांपूर्वी -
डिजिटल भाजपाची वेबसाईट हॅक!
भारतीय जनता पार्टीची अधिकृत वेबसाईट हॅक झाली आहे. ही वेबसाईट उघडताच प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर एंजेला मर्केल यांचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओसोबत अश्लिल शब्दांचाही वापर केल्याचे समोर आले. त्यानंतर काही मिनिटांतच भाजपाची ही वेबसाईट मेंटेनन्सच्या नावाने काही काळासाठी बंद केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा मोदी सरकारला झटका; 'व्यापार संधी' तोडली
अमेरिकेने भारत आणि तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (GSP) तोडली असून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सिनेटमध्ये ही अधिकृत माहिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम भारतावर जाणवणार असून अधिसूचना जारी झाल्यानंतर २ महिन्यांनी हा बदल लागू होणार आहे. GSP अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
राफेल काय साध्य करेल ते भविष्य, पण बोफोर्स तोफांनी कारगिल युद्धात काय साध्य केलं ते पहिलं मोदींनी समजून घ्यावं: नेटिझन्स
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानखरेदीचे समर्थन करताना, ‘आज आपल्याकडे राफेल विमाने असतात, तर आणखी बरेच काही साध्य करता आले असते’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले. सातत्याने टीका होत असताना या राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराचे समर्थन करत नरेंद्र मोदींनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
6 वर्षांपूर्वी -
लष्कर हे सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराच साधन नाही, हे सांगण्यासाठी लोकांनीच मोर्चे काढण्याची वेळ आली आहे का?
एअर स्ट्राईकनंतर सत्ताधाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय लष्कर आणि वायुदलाच्या जवानांचे फोटो खुलेआम भाजपच्या झेंड्याखाली लावले जात आहेत. एकूणच भारताच्या इतिहासात लष्कराचा स्वतःच्या राजकारणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर उपयोग पहिल्यांदाच होत असावा. परंतु यात भाजपचे कार्यकर्ते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच सामील असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान ते पाहून आता भाजपवरील लोकांचा संशय धृढ होताना दिसत आहे. त्यामुळे काही दिवसात लोकं रस्त्यावर उतरून भाजपाला समज देताना दिसले नाही तर नवल वाटायला नको.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील सरदार पटेलांच्या पुतळ्याकरिता CSR निधीचा गैरवापर झाल्याचं उघड
सीएसआर आणि शाश्वत नियोजन या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘गूडेराया’ कंपनीने प्राप्त केलेल्या तब्बल ९२ कंपन्यांच्या माहितीनुसार राष्ट्रीय वारसा संरक्षण या विषयासाठी २०१६ या आर्थिक वर्षात एकूण ४६.५१ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले होते. दरम्यान, २०१७ या वर्षात या विषया अंतर्गत होणाऱ्या खर्चात अचानक मोठी वाढ होवून ती रक्कम १५५.७८ कोटी इतकी झालेली दिसते.
6 वर्षांपूर्वी -
हल्ल्यानंतर किती ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दलाचे नाही, ते सरकारचे काम
भारतीय वायुदलाने बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली कारवाई कितपत परिणामकारक ठरली यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यावर वायुदल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी ध्येयावर थेट प्रहार केल्यानंतर त्यात किती जण मारले गेले ते मोजण्याचे काम वायुदल करत नाही. ते काम सरकारचे असते त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
6 वर्षांपूर्वी -
अभिनंदन यांनी जी माहिती पाकिस्तानपासून लपवली, ती मोदींनी प्रचारात या राज्यातील फायद्यासाठी उघड केली
पाकिस्तानविरुद्ध कारवाई दरम्यान मिग २१ या लढाऊ विमानाचा अपघात होऊन भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पॅराशूटच्या साहाय्याने पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं होतं. मात्र, बहाद्दूर अभिनंदन यांनी पाकिस्तानला स्वतःची किंवा देशाची कोणतीही गोपनीय माहिती दिली नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
भयंकर! भाजपच्या झेंड्याखाली 'विंग कमांडर अभिनंदन' यांचा फोटोवापरून निवडणुकीचा प्रचार
भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, पाकिस्तानी लढाऊ विमानांवर हल्ल्या करताना विंग कमांडर अभिनंदन यांनी महत्वाची जवाबदारी आणि बहाद्दुरी दाखवली होती. तसेच पाकिस्तानच्या प्रतिऊत्तरात त्याचे मिग २१ लढाऊ विमान कोसळेल, परंतु ते पॅराशूटच्या साहाय्याने खाली आले मात्र दुर्दैवाने पाकिस्तानच्या हद्दीत पडले आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं.
6 वर्षांपूर्वी -
२६ फेब्रुवारीला ब्रेकिंगन्यूजमध्ये मारलेल्या मसूदच्या भावांचे आवाज ३ मार्चला कसे ऐकू येत आहेत?
भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रशिक्षण तळ आणि शस्त्रास्त्रांचा अगणित साठा पूर्णपणे बेचिराख झाल्याच्या ब्रेकिंग न्यूज झळकताना दिसल्या. त्यानंतर काही वेळाने, एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख नेते मारले गेले आहेत. त्यात अफगाणिस्तान व काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मौलाना अम्मर, मौलाना मसूद अजहरचा भाऊ मौलाना तल्हा सैफ, काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मुफ्ती अझर खान आणि आयसी-८१४ विमानाच्या अपहरणात सहभागी असलेला मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर हे देखील मारले गेल्याच्या बातम्या झळकत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मसूद अझहर जिवंत, पाकिस्तानी माध्यमं
पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर हा भारतीय हवाईदलाने चढविलेल्या हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्ताने रविवारी खळबळ माजली. मात्र, आता पाकिस्तानी माध्यमांनी मसूदच्या नातेवाईकांचा हवाला देत मसूद जिवंत असल्याचा दावा केला आहे. तसेच जैश ए मोहम्मदने देखिल हे वृत्त फेटाळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
डिजिटल देशभक्तांचे राज ठाकरे ते वीर पत्नींच्या विरोधात विकृत अभियान: सविस्तर पुरावे
पुलवामामधील भ्याड हल्ल्यादरम्यान सीआरपीएफचे तब्बल ४४ जवान शहीद झाले . त्यानंतर भारतीय वायुदलाने दहशदवाद्यांच्या विरोधात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशातील आणि आंतरराष्ट्रीय वातावरण ढवळून निघालं आहे. वायुदल, लष्कर किंवा नौदल असो त्यांच्या शौर्यावर कोणत्याही भारतीयाला शंका नाही. परंतु, विषय येतो आहे तो सत्ताधाऱ्यांच्या विकृत समर्थकांनी राबवलेल्या विकृत अभियानाचा आणि काही ठराविक लोकांविरोधात ठरवून आणि तयारीनिशी राबविलेल्या अभियानाचा.
6 वर्षांपूर्वी -
शौर्य डोवल, पाकिस्तानी बिझनेस पार्टनर सय्यद अली अब्बास, ते RSS व भाजप कनेक्शन
‘द वायरने’ काही महिन्यांपूर्वी देशाचे पाचवे आणि विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे पुत्र शौर्य डोवल यांच्या व्यवसायांविषयी भारतीयांना सविस्तर माहिती देणार वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मात्र, देशातील पेड आणि सत्ताधारी धार्जिण्या प्रसार माध्यमांच्या वादळात ते हवेतच लुप्त झालं आणि भारतीय नागरिकांकडे ते पोहचू शकलं नाही किंवा पोहोचणार नाही याचीच दक्षता घेतली गेली असावी. देशाच्या राजकारणात अजित डोवाल हे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असावे ज्यांचा समाज माध्यमांवर अप्रत्यक्षपणे प्रचार सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनीच करून त्यांना भारताचे जेम्स बॉण्ड अशी पदवी देखील बहाल केली आणि वास्तविक ते एक निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. परंतु असं काय झालं की त्यांच्यासाठी भाजप सत्ताधाऱ्यांचा आयटी सेल नेहमीच कार्यरत असतो आणि समाज माध्यमांवरून त्यांच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम करत असतो.
6 वर्षांपूर्वी -
नाणारवासियांच्या व विरोधकांच्या लढ्याला यश, रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द
विरोधी पक्ष आणि स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून जोरदार विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी म्हणतात २६/११च्या हल्ल्यानंतर काय केलं? बहुतेक मोदींना नौदल, NSG कमांडो व मुंबई पोलिसांच्या शौर्याचा विसर?
भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, सदर कारवाईत भारतीय प्रसार माध्यमांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसताना स्वतःच निरनिराळी आकडेवारी जाहीर करण्याची स्पर्धा लावली होती.
6 वर्षांपूर्वी -
लष्कराच्या जीवावर स्वतःचा प्रचार करणाऱ्या मोदींना भारताने पाकिस्तानविरुद्ध २ युद्ध जिंकल्याचा विसर?
भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, सदर कारवाईत भारतीय प्रसार माध्यमांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसताना स्वतःच निरनिराळी आकडेवारी जाहीर करण्याची स्पर्धा लावली होती.
6 वर्षांपूर्वी -
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया; भारतापुढे विजयासाठी २३७ धावांचे आव्हान
आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया संघात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यास भारतीय संघ उत्सुक असेल. उभय संघात ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मालिकेत भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, ३ नागरिक ठार
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री भारतात परतले. मात्र, सीमेवर भारत-पाकिस्तान दरम्यान अद्याप तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांना त्यांच्या चिमुकलीने दिलेला निरोप पाहून मन भारावलं
भारत-पाकिस्तान तणावा दरम्यान भारतीय वायू दलाचे हेलिकॉप्टर काश्मीरमध्ये क्रॅश झाले आणि त्यात स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY