महत्वाच्या बातम्या
-
स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांना त्यांच्या चिमुकलीने दिलेला निरोप पाहून मन भारावलं
भारत-पाकिस्तान तणावा दरम्यान भारतीय वायू दलाचे हेलिकॉप्टर काश्मीरमध्ये क्रॅश झाले आणि त्यात स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी! बातमीचं वृत्तांकन करताना जरा ताळतंत्र बाळगा: आनंद महिंद्रा
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाईदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची पाकिस्तान सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत केली. सदर वृत्तानंतर देशभरात आनंद व्यक्त करण्यात वातावरण पसरलं आहे. परंतु, मागील काही दिवसांत भारतीय वृत्तवाहिन्यांनी पुलवामा आणि विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचं केलेलं वृत्तांकन अनेकांच्या पचनी पडलेलं नाहीये. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध भारतीय प्रसारमाध्यमांनाच हवं आहे, त्यामुळे या वाहिन्यांवर निर्बंध घालावेत अशी मागणी देखील समाज माध्यमांवरून होताना दिसते आहे.
6 वर्षांपूर्वी -
अति-उत्साही न्युज-दलाने काय मिळवलं? सरकारी जाहिराती, व्हिडिओ गेम ते लष्कराप्रती संवेदना?
परराष्ट्र संबंध राबवणारे अधिकारी हे शब्दप्रभू असतात तेव्हा जास्त चांगले असते. त्यामुळेच भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी परवा जेव्हा “म्हणजे बिगर-लष्करी” आणि “प्रतिबंधात्मक कारवाई” हे शब्दप्रयोग केले, तेव्हा ते आश्चर्यकारक नव्हते. तरीही अनेकांनी त्याचे कौतुक केले. त्या शब्दवापरामध्ये खरोखरीच काही तरी उपयुक्त आणि अर्थवाही असं होतं. केवळ चलाख शब्दकलेच्या पलीकडे ते निवेदन आणि ज्या कारणाने ते केले गेले ते हवाई हल्ले, या दोन्ही दरम्यान एक दुहेरी दावा होता.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात फडणवीसांची अधिवेशन गुंडाळण्याची चर्चा, तर मोदींची पक्ष मजबूतीची चर्चा
भारतीय वायुदलाने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक’नंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. पुलवामानंतरच्या घडामोडींना आणखी एक रुपेरी किनार होती. ‘मागच्या सरकारांबद्दल’ आणि त्यांच्या सुरक्षाविषयक अपयशांबद्दल ‘अधिकृत सूत्रांकडून’ आडून-आडून वार केले गेले तरी विरोधी पक्षांनी या कसोटीच्या काळात आपला प्रतिसाद संयत ठेवला.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन
पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन सुरू असून Locवर गोळीबार सुरूच आहे. मात्र भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेने, चर्चेने प्रश्न परिस्थिती बदलू शकते असे म्हटले परंतु तरीही आज पहाटेपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिका, फ्रान्सकडून मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरात पाकिस्तान विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आला आहे. अमेरिका फ्रान्स, ब्रिटनकडून याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये मंजूर करण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यानो जबाबदारीनं वागा! 'एअर स्ट्राईक' सहभागातील महिला पायलट्सचे खोटे फोटो शेअर
भारतीय वायुदलाने केवळ बारा दिवसात जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांना अद्दल घडवली. दरम्यान, या हल्ल्याचा भारतीय वायुदलाने केवळ १२ दिवसात बदला घेत दहशतवाद्यांचं तेरावं घातल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवरून व्यक्त होत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
हाऊज द जोश, वाघा बाॅर्डरवर पाकसैनिकांसमोर भारतीयांचा तुफान जल्लोष
हाऊज द जोश, वाघा बाॅर्डरवर पाकसैनिकांसमोर भारतीयांचा तुफान जल्लोष
6 वर्षांपूर्वी -
मुंबईसह राज्यात हाई अलर्ट, दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात
पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भारत – पाकिस्तान तणाव आणखीनच वाढला आहे. काश्मीरमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून जम्मू, श्रीनगर, पठाणकोट येथे विमानतळांवरून प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे आहि हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे म्हटले जात आहे. दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात. त्यामुळे राज्यातही हाय अलर्ट जारी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा
श्रीनगर, 27 फेब्रुवारी : सकाळी आलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाचे १ विमान अपघाताने कोसळले असल्याची बातमी ताजी असतानाच ‘ आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे’ असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला.
6 वर्षांपूर्वी -
How is the जोश? भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २०० - ३०० दहशदवादी ठार झाल्याचा अंदाज
या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात २०० – ३०० दहशदवाद्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोबतच कच्छ बॉर्डर जवळ भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन विमान देखील उध्वस्थ केल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताचा पाकिस्तानामधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने LoC ओलांडली. परंतु, आम्ही त्यांना हुसकावून लावल्याचा पोकळ दावा पाकने यावेळी केला आहे. भारतीय हवाई दलाने १००० किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताच्या मिराज जेट फायटरची १० विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचे सांगण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान यांची शांततेची भाषा
बिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानची खुमखुमी कमी होताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते त्यामुळे पाकिस्तान सरकार खडबडून जागा झाला आहे आणि शांततेच्या बाता करू लागला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
रॉबर्ट वढेरा मुरादाबादमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? पोस्टरबाजी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर देखील मुरादाबाद युवा काँग्रेसकडून मुरादाबादच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कलम ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त
जम्मू-कश्मीरमधील नागरिकांना विशेष हक्क देणाऱ्या देशाच्या राज्यघटनेतील कलम ’३५ अ’ कलम रद्द करण्यात यावे, या मागणीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कश्मीर खोऱ्यात तणाव असून खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारनंतर रात्रभरात जमात-ए-इस्लामी जम्मू-कश्मीर या संघटनेच्या जवळपास १५० जणांची धरपकड करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा भ्याड हल्ला; गेल्या ७ महिन्यात भारत-पाक व्यापारात ७ टक्के वाढ
पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. दरम्यान, भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे असताना दोन्ही देशांतील व्यापार गेल्या ७ महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत याच काळातील व्यापारापेक्षा ७ टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहा पाकच्या पाण्यात झोपले की पाकिस्तानचं पाणी बंद होणार का? राज ठाकरेंचा टोला
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
फक्त अजित डोभालची सखोल चौकशी करा, सर्व सत्य बाहेर येईल: राज ठाकरे
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारत पाक सीमेवर तणाव वाढतो आहे, पाककडून युद्ध सदृश्य जमवाजमव
पुलवामा जिल्ह्यात दहशवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्ध सदृश्य जमवाजमव सुरु असून, पश्चिम सीमेवरून पाकिस्तानी सैन्य कमी करून ते जम्मू-काश्मीरजवळच्या पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे, एएनआयने यासंबंधी अधिकृत वृत्त दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
हुकूमशाही? भाजप पक्षाचे झेंडे घरावर लावण्यासाठी कार्यकर्त्यांची जबरदस्ती
हुकूमशाही? भाजप पक्षाचे झेंडे घरावर लावण्यासाठी कार्यकर्त्यांची जबरदस्ती
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC