महत्वाच्या बातम्या
-
भारत-पाकिस्तान शत्रुत्त्वामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागतील: डोनाल्ड ट्रम्प
पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिस्थिती चिघळताना दिसत आहे. जागतिक बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेतून देखील सतर्कतेचे इशारे दिले जात आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. तसेच भारत आता मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे, असे ट्विटदेखील त्यांनी केले आहे. त्यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून १३० कोटी रुपयांची मदत रोखली आहे. पाकिस्तानने अमेरिकेचा विश्वासघात केला असेही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना ट्रम्प यांनी उचलेलं हे पाऊल म्हणजे भारतासाठी एक प्रकारे मदत समजली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुरावे! पुलवामा हल्ल्याच्या दिवशी नरेंद्र मोदी संध्याकाळपर्यंत फोटोशूट करत होते?
पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ ३ तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आघाडीसोबतचे तर्क केवळ माध्यमांमध्ये, पण राज ठाकरेंची वेगळीच रणनीती आहे?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती आणि त्यानंतर माध्यमांमध्ये या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. त्यात राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, तत्पूर्वी एक घटना दिल्लीत घडली होती आणि ती म्हणजे स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानकडून भारताविरुद्ध युद्धाची तयारी, लष्कर आणि रुग्णालयं सज्ज
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने स्वतःच युद्धाची पूर्वतयारी करण्यात सुरुवात केली आहे. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही परिस्थितीत भारताच्या दबावात येऊ नका असं सांगितलं असून यानंतरच पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
UN सुरक्षा परिषदेत देखील पाकिस्तानची कोंडी, चीनचं भारताला समर्थन
पुलवामामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचं दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अर्थात UNSCने देखील हा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचं सांगत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पंधरा देशांचा समावेश असून यामध्ये चीनचा देखील समावेश आहे. सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत अशा हल्ल्यांसाठी जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, हा पाकिस्तानसाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
सीबीआय'ची चंदा कोचर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस, देश सोडून जाण्यास मनाई
व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात दोषी आढळलेल्या चंदा कोचर यांच्याविरोधात CBIने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती आम्हाला दिली जावी असं सांगितलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशात अपना दल भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत
एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भारतीय जनता पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. युपी’मध्ये भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी एनडीए सोडण्याचा इशारा दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्जिकल स्ट्राइकचे हिरो डी. एस. हुडा यांचा राहुल गांधींना 'हात'
लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसनं राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केली आहे. सर्जिकल स्ट्राइकचं नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्याकडे या कृती दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. देशासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचं काम हुडा यांच्याकडे असेल. ते देशाच्या सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मतं विचारात घेऊन सदर आराखडा तयार करतील. सर्जिकल स्ट्राइक दरम्यान हुडा नॉर्दन आर्मीचे कमांडर होते.
6 वर्षांपूर्वी -
राफेल करार; पुनर्विचार याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार
राफेल कराराप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या निकालासंदर्भात दाखल झालेल्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालात राफेल करारात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्रुटी आढळलेल्या नाही, असे स्पष्ट करतानाच या कराराच्या चौकशीची मागणी फेटाळली होती.
6 वर्षांपूर्वी -
पुलावामा हल्ला: देश दुःखात बुडाला, पण मोदी कॉर्बेट पार्कात शूटिंग करत होते: काँग्रेसने पुरावे दिले
पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात १० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देश दुःखात बुडाला असताना नरेंद्र मोदी नेमके काय करत होते याचे पुरावे सादर करण्यात आले आहे. जवान शहीद झाल्यानंतर देशात सर्वांनी एकत्र येण्याची हाक सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दिली होती. त्यानंतर विरोधकांनी देखील सामंज्याची भूमिका घेत सरकारला सहकार्य देखील केलं. वातावरण भावनिक असल्याने विरोधकांनी कोणतेही प्रश्न उपस्थित केले असते तर मोदींनी त्याच राजकारण केलं असतं हे विरोधकांना चांगलेच ठाऊक होतं. कारण, स्वतः भाजपचे नेते म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे सर्वच प्रमुख नेते प्रचारात व्यस्त होते. त्यात हद्द म्हणजे, दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावून स्वतः नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये प्रचारासाठी गेले आणि तेथे सुद्धा लष्कराच्या नावाने स्वतःचा आणि पक्षाचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
सुप्रसिद्ध बॉलिवूड निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुधा बडजात्या आणि मुलगा सूरज बडजात्या असा परिवार आहे. ट्रेड अॅनालिस्ट कोमल नहता, यांनी आपल्या ट्विटरवर अकाऊंटवर राजकुमार यांच्या निधनाची बातमी शेअर केली. काहीच मिनिटांपूर्वी राजकुमार बडजात्या यांचे निधन झालेत. मला विश्वास बसत नाही. आठवडाभरापूर्वी त्यांच्या प्रभादेवी कार्यालयात मी त्यांना भेटलो होतो, असे त्यांनी आपल्या ट्विटरमध्ये लिहिले.
6 वर्षांपूर्वी -
गुप्तचर यंत्रणांचा इशारा! जैश-ए-मोहम्मद मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने आधीपेक्षा देखील भयानक आत्मघाती हल्ला करण्याची मोठी योजना आखल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानुसार १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये संभाषण झालं असून त्याआधारेच गुप्तचर यंत्रणांनी सदर इशारा दिला आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव यांनी भाषणात 'चौकीदार चोर हैं' म्हटलं होतं, आता 'चौकीदार थोर आहेत' बोलण्याची शक्यता?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्ष झपाटून कामाला लागले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणजे सत्तेत राहून तब्बल साडेचार वर्ष मोदींवर आणि भाजपवर वारंवार टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळाच्या नाऱ्यावरून पलटले आहेत. अगदी विरोधकांच्या सुरात सुर मिळवून राफेल लढाऊ विमानांच्या कारणावरून देखील मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहांसमोर गप्प! आता म्हणतात भाजपा नव्हे ‘NDA’ ठरवेल आगामी पंतप्रधान
२०१४ मधील निवडणुकीपेक्षा यंदा भारतीय जनता पक्षाने शंभर जागा कमी जिंकल्यास, आगामी पंतप्रधान भारतीय जनता पक्ष नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए ठरवणार, असे सूचक विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. विशेष म्हणजे हेच बोलण्याची संधी त्यांना अमित शहा एकाच पत्रकार परिषदेत उपस्थित असताना सुचले नाही हे विशेष.
6 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींना कोर्टाचा दणका; ४ आठवड्यात ४५३ कोटी द्या, अन्यथा ३ महिन्यांचा तुरुंगवास
रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधातील एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. अनिल अंबानी यांनी ४ आठवड्यामध्ये थकवलेले ४५३ कोटी रुपये भरावे, अन्यथा ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार रहावे, असे निर्णयाअंती बजावले आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: शहीदांवर अंत्यसंस्कार, भाजप मंत्री पायात बूट घालून बसले व हसत गप्पा सुरु, स्थानिक संतापले
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आलेली आहे. प्रत्येक भारतीय देशभक्तीने पेटून उठलेला असताना, सत्ताधारी भाजपचे मंत्र्यांची असंवेदनशीलता अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडला आहे. त्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळालं.
6 वर्षांपूर्वी -
संतापजनक! शहीद जवानांमुळे देशात राष्ट्रभक्तीची लाट, मतांमध्ये रूपांतरित करा: गुजरात भाजप नेते
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आलेली आहे. प्रत्येक भारतीय देशभक्तीने पेटून उठलेला असताना, एक संतापजनक आणि रक्त खवळून सोडणारी घटना घडली आहे. गुजरात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रवक्ते भरत पंड्या यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: ते हिंदू आहेत, दंगली भडकवण्यासाठी मुस्लिम बनून पाकिस्तान जिंदाबाद बोलतात?
पुलवामा हल्ल्यानंतर समाज माध्यमांच्या आडून अनेक वाईट प्रवृत्तीची लोकं एकत्र येऊन आणि पाकिस्तान विरुद्धच्या बिघडलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतात हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली भडकतील अशी कृत्य करत आहेत. याचा संबंध काही राजकीय पक्षांसोबत देखील असू शकतो अशी शक्यता आहे, जे निवडणुकीआधी वातावरण दूषित करू इच्छित आहेत. परंतु, ठरवून सदर कृत्य करताना त्या तरुणांचा मूर्खपणा देखील उघड झाला असून, ते काही तरी हेतूने करत असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
IPL - १२ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर
लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात इंडियन प्रीमिअर लीगही अर्थात आयपीएलच्या १२ व्या हंगामाचे सामने देखील रंगणार आहेत. आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २३ मार्चपासून सुरू होणा-या लीगच्या पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे एकमेकांसमोर ठाकणार आहेत. लोकसभा निवडणुका लक्षात ठेवता २३ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत पहिल्या २ आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतात निवडणुकीचा काळ, त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा अशा चर्चेने जोर धरला : इमरान खान
भारताने कोणतीही आगळीक करून युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर थेट प्रतिउत्तर देईल, अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद आयोजित करून दिली आहे. दरम्यान, भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने, पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा जोर धरू लागली आहे आणि मी ते समजू शकतो, असं सांगत नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today