महत्वाच्या बातम्या
-
कोणतीही शक्ती भारताच्या शांती, प्रगती आणि अखंडतेला अस्थिर करू शकत नाही
कोणतीही शक्ती भारताच्या शांती, प्रगती आणि अखंडतेला अस्थिर करू शकत नाही
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाही काढणार: जेटली
पाकिस्तानच्या दहशतवादी जैश-ए-मोहम्मदने गुरुवारी पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ७८ गाड्यांच्या ताफ्यावर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४२ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केंद्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला याविषयी अर्थमंत्री यांनी सांगितले. त्यानुसार भारत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकणार असून, पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देखील काढून घेतला जाणार आहे. तसेच पाकसोबतचे इतर व्यापारी संबंध तोडण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा भ्याड दहशतवादी हल्ला; काश्मीरमध्ये इंटरनेट बंद
काल जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे तब्बल ३९ जवान शहीद झाले आहेत. CRPF च्या माहितीनुसार, रस्त्यावर एका ४ चाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधील बॉम्बचा स्फोट झाला.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा भ्याड दहशतवादी हल्ला; महाराष्ट्राचे सुपुत्र राहुल करांडे यांना वीरमरण
काल जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे तब्बल ३९ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. सांगली जिल्ह्यातील CRPF जवान राहुल करांडे हे पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झाले.
6 वर्षांपूर्वी -
राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्याड हल्ल्याला चोख प्रतिउत्तर देण्याची हीच वेळ: राज ठाकरे
काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं, ‘पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. ह्या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे, असं आवाहन केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
हल्ल्याच्या पूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी अॅलर्ट दिला होता, तरी सीरिया व तालिबानी पद्धतीने हल्ला
कालच्या भीषण हल्ल्याच देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी अॅलर्ट जारी केला होता. त्यानंतर देखील हल्ला यशस्वी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अॅलर्ट नुसार, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारीला अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले. त्याच दिवशी हल्ल्याचा महाभयंकर कट, दहशदवाद्यांनी रचला आहे. त्यानुसार हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात असे संकेत गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा यंत्रणांना दिले होते.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची भाषणात ५६ इंची, पुलवामात दहशतवादी हल्लात CRPFचे ३० जवान शहिद
आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा २०१६ नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! मोदी सरकारकडे नोटाबंदी काळातील लोकांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नाही
२०१६ मध्ये काळापैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने अचानक पुकारलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आता २ वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. परंतु, सदर निर्णयामुळे सर्वसामान्यांना प्रचंड हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या होत्या. दरम्यान, जुन्या नोटा जमा करून नव्या नोटा मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना संपूर्ण वेळ उन्हातान्हात सह परिवार उभे राहावे लागले होते. त्यात, अनेकांचा रांगेत मृत्यू झाल्याच्या खूप घटना घडल्या होत्या. परंतु, नोटाबंदीदरम्यान देशात नेमका किती लोकांनाच नाहक जीव गेला याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जिओ मेरे लाल? मोदी सरकार BSNLला डिस्कनेक्टिंग इंडिया करण्याच्या तयारीत?
प्रचंड तोट्यात असणाऱ्या BSNL या सरकारी टेलिकॉम कंपनीतील गुंतवणूक काढून घेण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यास नरेंद्र मोदी सरकारनं सुरुवात केल्याचे वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे कंपनी बंद करण्याचा विचार देखील सरकारकडून सुरू असल्याचे समजते. दरम्यान, २०१७-१८ या आर्थिक वर्षात BSNLचा तब्बल तोटा ३१,२८७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता बीएसएनएल बंद करण्याबद्दल केंद्र सरकारनं गांभीर्यानं विचार सुरू केल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूक; मागे लागलेल्या रोडरोमियोत शिवसेनेला इंटरेस्ट असल्याचे वृत्त?
मागील अनेक दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूकपूर्व सर्व्हेचा धसका घेतल्याचं समजतं. त्यामुळे स्वबळ वगरे बाजूला ठेवून शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचं सूत्र जवळपास ठरल्याचे वृत्त प्रसार माध्यमांकडे आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून जागावाटपावरून येणाऱ्या प्रस्तावावरून प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, ‘रोडरोमियोसारखे आमच्या मागे का लागता? आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही’, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला फटकारलं होतं. परंतु, सध्याच्या वृत्तानुसार त्याच रोडरोमियोने खुश करणारा प्रस्ताव समोर ठेवल्याने शिवसेनेचा इंटरेस्ट वाढल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॅग अहवाल: राफेल विमानाची प्रत्यक्ष किंमतच नमूद नाही, मग महाग की स्वस्त ठरलं कसं?
देशाच्या संरक्षण आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या कराराबाबतचा कॅगचा अहवाल अखेर आज अधिकृतपणे वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेत सादर करण्यात आला आहे. सध्याच्या भाजप प्रणित एनडीए सरकारने केलेला राफेल लढाऊ विमानांचा करार हा आधीच्या काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने केलेल्या करारापेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त असल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच मोदी सरकारने १२६ विमानांच्या तुलनेत ३६ विमानांसाठी करार करताना एकूण १७.०८ टक्के पैसे वाचवले आहेत, असं म्हटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
रंगवलेल्या शौचालयातून पर्यटन? कोणता सुगंधी सोन्याचा आनंद मिळणार पर्यटकांना? वास्तव
युरोपमध्ये विविध पर्यटक तिथल्या घराच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहण्यासाठी जातात. त्यामुळे एक दिवस भारतातील शौचालय इतकी सुंदर होतील की ते पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे. वास्तविक काँग्रेसच्या काळातील ‘हागणदारी मुक्त गाव’ योजना वेगळ्या नावाने राबवून, त्यावर प्रचंड जाहिरातबाजी करत मोदी सरकारने ती योजनाच हायजॅक केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जे स्वतः भ्रष्ट तेच CBI व मोदींना शिव्या देतात? आता मोदींचा हा व्हिडिओ बघा!
काल कुरुक्षेत्र येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जे विरोधक भ्रष्ट आहेत तेच CBI व मोदींना शिव्या देतात’. मागील काही दिवसापासून CBI आणि ईडी’च्या कारवाईने देशभरातील विरोधक हैराण झाले आहेत. ज्या राज्यात निवडणुका लागतात त्याच राज्यातील विरोधकांच्या मागे योगायोगाने CBI आणि ईडी’ची कारवाई सुरु होताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींनी लष्करी गुपिते अनिल अंबानींना सांगून देशद्रोह केला: राहुल गांधी
भारतीय हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार फ्रान्ससोबत होण्यापूर्वीच त्या विषयीची महत्वाची माहिती उद्योगपती अनिल अंबानी यांना सांगून मोदींनी देशाच्या संरक्षण विषयक अशा अत्यंत गोपनीय कायद्याचा भंग करीत एक प्रकारे देशद्रोहाचा गुन्हा केला असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केला. स्वत:ला देशाचा चौकीदार समजणाऱ्या मोदींवर या महाभयंकर गुन्ह्याबद्दल खटला चालवून त्यांना तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणी सुद्धा त्यांनी उचलून धरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान समोर असतानाच भाजप मंत्र्याचे सहकारी महिला मंत्र्यासोबत अश्लील चाळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच त्रिपुराच्या दौऱ्यावर गेले असताना एका कार्यक्रमादरम्यान स्वतः मोदी समोर असताना एक विचित्र प्रकार घडल्याच समोर आलं आहे. कारण, एका उदघाटन सोहळ्यावेळी त्रिपुराच्या एका मंत्र्याने सहकारी महिला मंत्र्याच्या नको तिथे हाथ लावल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. पुरुष मंत्र्याने महिला मंत्र्यासोबत स्वतः नरेंद्र मोदी समोर उपस्थित असताना केलेल्या अश्लील चाळ्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भारतीय जनता पक्षविरोधात विरोधकांनी चांगलेच रान उठवले असून, संबंधित मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी उचलून धरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप मंत्र्यांची 'सुसाट' फेक-ट्रेन, त्यावर तत्पर प्रवक्ते, तर भक्तांचं 'ओन्ली मोदीजी'
समाज माध्यमांवर आज जी खोट्या प्रचाराची बीज रोवली गेली त्याला सर्वाधिक कारणीभूत म्हणजे भारतीय जनता पक्ष असंच म्हणावं लागेल. अनेक सुशिक्षित तरुणांना देखील त्यांच्या सामाजिक तसेच राजकीय अज्ञानाचा फायदा घेत खोट्या व्हिडिओ आणि एडिटेड गोष्टींच्या आधारे सत्ताधाऱ्यांनी मूर्ख बनवलं आहे. त्यात भाजपच्या अनेक मंत्र्यांचा, आमदारांचा, खासदारांचा आणि त्यांच्या आयटी सेलचा मोठा वाटा आहे. आजही त्याच खोट्या गोष्टींच्या आधारे लोकांना मूर्ख बनवण्याचे प्रकार खुलेआम सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर: पुलवामा चकमकीत २ जवान शहीद, तर १ दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटे झालेल्या चकमकीत १ दहशदवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या चकमकीदरम्यान लष्कराचे २ जवान देखील शहीद झाले आहेत. परिसरात अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने जोरदार शोधमोहीम सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी भ्रष्टच, अनिल अंबानींनी राफेल प्रकरणी दलालाची भूमिका बजावली: राहुल गांधी
नरेंद्र मोदी यांना राफेल लढाऊ विमानांचे प्रकरण भोगण्याची शक्यता प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व्यक्त करत आहेत. सदरप्रकरणी अनेक कागदपत्र आणि इतर पुरावे देखील समोर येण्यास सुरुवात झाली आहे. राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला. अनिल अंबानी यांनी राफेल करार होण्यापूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीचा धागा पकडत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राफेल विमान करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये गुज्जरांचे आंदोलन तीव्र; रेल्वे पटरीवरच तंबू ठोकले
आरक्षणाच्या मुद्यावरून गुज्जर समाजाचे हिंसक आंदोलन आज देखील सुरूच आहे. त्यामुळे राज्यसरकारच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. सरकारी नोकऱ्या तसेच शिक्षणात एकूण ५ टक्के राखीव जागांच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन तीव्र आणि हिंसक होताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये ‘अग्नितांडव’; १७ जणांचा मृत्यू
दिल्लीत करोलबागमधील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये आज पहाटे ४ वाजता भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून जवळपास १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today