महत्वाच्या बातम्या
-
सत्ताकाळात स्मारक व पुतळ्यांवर खर्च केलेले पैसे परत करा: सुप्रीम कोर्ट
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाकडून बसपा अध्यक्षा मायावतींना जोरदार झटका मिळाला आहे. उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान असताना, आपल्या पदाच्या गैरवापर करत स्मारक तसेच पुतळ्यांवर वारेमाप खर्च केलेले पैसे परत करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पदाचा गैरवापर करत मायावतींनी सामान्य जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करून लखनौ आणि नोएडामध्ये स्वतःच्या पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीचे पुतळे बांधले होते, हा सामान्य जनतेच्या पैशाचा मोठा गैरवापर आहे असा निर्णय CJI रंजन गोगाई यांच्या खंडपीठाने दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
India vs NZ T20 : भारताची न्यूझीलंडवर ७ विकेट्स राखून मात
भारतीय क्रिकेट टीमच्या गोलंदाजांचा भेदक मारा तसेच फलंदाजांच्या दमदार सलामीच्या जोरावर भारताने दुसरा ट्वेन्टी-२० सामना खिशात घातला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १५८ धावांच लक्ष दिलं होतं. दरम्यान, भारताने रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर या आव्हानाचा सहज पाठलाग केला आणि यजमान्यांना धूळ चारली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'चौकीदार ही चोर है' असं आता संरक्षण मंत्रालय सुद्धा म्हणतंय: राहुल गांधी
राफेल लढाऊ विमानांच्या करारात पंतप्रधानांनी थेट हस्तक्षेप केला. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलचं कंत्राट मिळावं म्हणून त्यांनी समांतर वाटाघाटी सुरु केल्या, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पंतप्रधानांनी फ्रान्ससोबत थेट वाटाघाटी केल्यानं भारतीय संरक्षण मंत्रालयाची बाजू कमकुवत झाली, असं वृत्त आज ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आणि त्यानंतर खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान कार्यालयाची ट्विटवरून कबुली, नरेंद्र मोदींनी देशातील संस्था नष्ट केल्या
देशातील विरोधकांनी नेहमीच नरेंद्र मोदींवर देशातील महत्वाच्या मोठ्या संस्था उध्वस्थ केल्याचा आरोप केला आहे. अर्थात मोदींनी ते कधीच मान्य केलं नसलं तरी त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाने ते एका ट्वीटमध्ये मान्य केल्याचे म्हणावे लागेल. कारण याट्विटमध्ये मोदी स्वत:वरच आरोप करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सत्तेचं दबाव तंत्र? पण प्रियांका गांधी रॉबर्ट वाड्रानां नेण्यासाठी बिनधास्त ईडी कार्यालयाकडे आल्या
काल ईडीने प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरांची मुख्यालयात तब्बल ९ तास चौकशी केली. परंतु, त्यांना नेण्यासाठी वढेरा यांच्या पत्नी प्रियंका गांधी ईडीच्या कार्यालयात बिनधास्त आल्याने सर्वच प्रसार माध्यमांना धक्का बसला. त्यांनाही काळा सूट परिधान केला होता आणि थेट ईडीच्या कार्यालयाबाहेरच येऊन थांबल्या.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करू
सत्तेत आल्यावर तिहेरी तलाक कायदा आम्ही रद्द करू अशी जाहीर घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दिल्लीत आयोजित अल्पसंख्यांक अधिवेशनात महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव यांनी ही घोषणा केली. यावेळी स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून करण्यात आलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरू शकते.
6 वर्षांपूर्वी -
केजरीवाल सरकारचा अर्थसंकल्प 'आधुनिक शाळांचा' तर योगी सरकारचा 'गोशाळांचा'
आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा तिसरा अर्थसंकल्प युपीच्या विधानसभेत सादर झाला. दरम्यान, लवकरच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने योगी सरकारची मोठी कसोटी लागणार होती आणि त्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. युपीचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला.
6 वर्षांपूर्वी -
ईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी झाली
प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात उतरताच त्याचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या पाठीमागे ईडी’चा ससेमिरा लागल्याचे विरोधक आरोप करत आहेत. दरम्यान आज मनी लाँड्रिंगप्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांदी यांचे पती रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीकडून त्यांची तब्बल ५ तास सखोल चौकशी झाल्याचे सांगण्यात येते.
6 वर्षांपूर्वी -
RBI द्वैमासिक पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात
रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता नवा रेपो रेट ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्के असा असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळं बँकांचे व्याजदर कमी होऊन, गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता
कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्या हंगामात क्रिकेटमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर ७८ धावांनी विजय मिळवला. विदर्भाचं हे रणजी करंडकाचं द्वितीय विजेतेपद ठरलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO जम्मू: दूरदूर निर्मनुष्य दल लेक'मध्ये मोदी शूटिंग'साठी माशांना अभिवादन करत होते? नेटकरी
नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे त्यांच्यासोबत फोटोशूट आणि व्हिडिओशूट करणारी विशेष टीम असते हे अनेक वेळा अनुभवण्यात आले आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर मोदी गेले असता पुन्हा आला आहे. कारण मोदींची अभिवादन करण्याची स्टाइल सर्वपरिचित आहे. रविवारी नरेंद्र मोदींनी जम्मूमधील दल लेकमध्ये फेरफटका मारला. परंतु, या बोटीमधून मारलेल्या फेरफटक्यादरम्यानही नरेंद्र मोदी हात वर करुन अभिवादन करतांना दिसत होते.
6 वर्षांपूर्वी -
दिवाळखोरी आरकॉमची, फटका संरक्षण विषयक राफेल प्रकल्पाला?
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपमधील आरकॉमने काही दिवसांपूर्वी स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्यासाठी कायदेशीर अर्ज केल्याने, त्यांच्या दुसऱ्या कंपनीच्या संबंधित नागपूरमधील राफेल लढाऊ विमानांसंबंधित ऑफसेट प्रकल्प रखडण्याची चर्चा आहे. Rcom कडून दिवाळखोरीचा अर्ज केल्यानंतर, मागील ३ दिवसांत रिलायन्स एडीएजीच्या ४ प्रमुख कंपन्यांचे शेअर्स तब्बल २० ते ५० टक्क्याने कोसळले.
6 वर्षांपूर्वी -
हवाई दलाची जवानांसाठी जुनी विमाने; जीव गमावलेल्या वैमानिकाच्या भावाचा संताप
मागील आठवड्यात बंगळुरु येथे मिराज २००० या लढाऊ विमानातून सराव करते वेळी विमानाचा अपघात होऊन स्क्वॉड्रन लीडर समीर अब्रोल आणि सिद्धार्थ नेगी या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा मंगळवारी इंदापूर तालुक्यात कार्वर विमानाला अपघात होऊन सिद्धार्थ हा वैमानिक जखमी झाला. यानंतर या अपघातांबद्दल वादळ उठले आहे. प्रशिक्षण देताना किंवा सरावासाठी हवाई दलाच्या वैमानिकांना व इतर वैमानिकांना जुनी लढाऊ विमाने दिली जातात, ज्यामुळे त्यांचे जीव धोक्यात असतात अशी तक्रार चहूबाजूंनी होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: ‘अपनी बात राहुल के साथ’, राहुल गांधींचा जनतेशी थेट संवाद!
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निरनिराळ्या रणनीतीचा अवलंब करताना दिसत आहेत. आता त्यांनी थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि मोदींच्या ‘चाय पे चर्चा आणि मन की बात’ला टक्कर देण्यासाठी ‘अपनी बात राहुल के साथ’ हा संवाद उपक्रम राबविणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गडकरी कटकारस्थानी स्वभावाचे नाहीत, काही असतं तर सर्वात आधी मला सांगतील
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानांवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर एखादी इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,’ असं भागवत म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
महात्मा गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेला अटक
महात्मा गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला नेत्या पूजा पांडे यांना त्यांच्या पती अशोक पांडेसहीत पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या हत्येची घटना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न हिंदू महासभेकडून केला गेला.
6 वर्षांपूर्वी -
सरकार कोणत्याही पक्षाचं आलं तरी राम मंदिर होणारच: सरसंघचालक
सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येत राम मंदिराबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले की, ‘२०१४ मध्ये राम मंदिराचा मुद्दा नव्हता. जरी तेव्हा राम मंदिराचा मुद्दा नसता, तरी सुद्धा सरकार स्थापन झालं असतं. परंतु, २०१९ मध्ये राम मंदिर सर्वात महत्त्वाचा विषय आहे, असं सरसंघचालक म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
इस्त्रोची उतुंग भरारी, G-SAT-३१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात ISRO ने उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या युरोपियन कंपनीच्या एका प्रक्षेपण यानाद्वारे देशाच्या नवीन संचार उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. इस्रोने जीसॅट-31 या उपग्रहाचे आज मध्यरात्री २.३१ वाजता फ्रेंच गुयाना च्या स्पेसपोर्टवरून यशस्वीरित्या अवकाशात झेपावले.
6 वर्षांपूर्वी -
वाह! मोदीजी वाह! कोणती आई मुलाला सांगते...बाळा! भरपूर लाच घे.. खूप पाप कर?
आगामी लोकसभेच्या निमित्ताने काही पेड प्लॅटफॉर्मच्या मार्फत प्रसार माध्यमांकडे भावनिक बातम्या पोहोचविण्याचे प्रकार रोज दिसू लागले आहेत. त्यात जवळची नाती सुद्धा मार्केटिंगसाठी वापरली जात आहेत असंच म्हणता येईल. भावनिक राजकारण्याचा नावाने लष्कर आणि नाती मागील ५ वर्षात सर्वाधिक राजकीय फायद्यासाठी वापरली गेली आहेत. तसेच काहीसा प्रकार, ज्यामध्ये नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया पेज ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जे सांगितलं, त्यातून पुन्हा समोर आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये राहुल गांधींची जंगी सभा, तुफान गर्दी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बिहारमध्ये जंगी सभा होत असून, त्याला स्थानिक लोकं मोठी गर्दी करताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधींनी सुद्धा जंगी सभांचा सपाटा लावला असून, सत्ताधाऱ्यांना प्रत्येक राज्यात घेरण्याची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सपाट लावला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा