महत्वाच्या बातम्या
-
ग्राम परिवर्तन; यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल, कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांची कामगिरी: सविस्तर
ग्रामीण भागात विकास साध्य करायचा म्हटलं की आधी तिथल्या सामान्य लोकांप्रती प्रामाणिक आस्था आणि तिथे भेडसावणाऱ्या मूळ समस्यांचा अभ्यास करणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. परंतु, लोकाभिमुख विकास साधायचा म्हटल्यावर विषय जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेवर येऊन थांबतो, असा साहजिकच विचार प्रत्येकाच्या मनात येतो. मात्र, देशभरात मोजकेच प्रामाणिक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत जे प्रशासनातील अधिकारांचा अभ्यासपूर्ण वापर करतात आणि ग्रामीण भागातील लोकाभिमुख विकास तसेच विविध योजना सत्यात उतरवताना दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ज्यांच्यामुळे ग्राम परिवर्तनात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधीनी गडकरींना नम्रपणे विचारलं, 'नितीनजी तो बेरोजगारीचा उल्लेख राहून गेला'
काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एकटेच धाडसी नेते आहेत’, असे म्हणून त्यांची उपरोधिकपणे कौतुक केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी आणि राहुल गांधी यांच्यादरम्यान सोमवारी टिष्ट्वटरवरून कलगीतुरा रंगला.
6 वर्षांपूर्वी -
विकासाचा 'जाहिरातबाज' प्रकाश टाकल्यानंतर, भाजप आता निवडणुकीचे हे 'दिवे' लावणार
दिल्ली ते गल्ली आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. दरम्यान दिल्लीत केजरीवाल सरकारने शिक्षणापासून अनेक विषयांमध्ये विकासाची भरीव कामगिरी केलेली असताना भाजपासाठी दिल्लीतील लोकसभा सोपी राहिलेले नाही. दिल्ली प्रशासनातील सुसूत्रता सुद्धा आप पक्षाच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे दिल्लीच्या विकासात प्रकाश केजरीवाल सरकारने टाकला असला तरी आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष ‘दिवे’ लावण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज योगींची पश्चिम बंगालमध्ये सभा, वातावरण तापण्याची शक्यता
पश्चिम बंगालमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांना झालेल्या अटकेनंतर आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमध्ये जनसभा घेणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आजच्या सभेसाठी ते झारखंडपर्यंत विमानमार्गाने जाणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सरकारच्या प्रतिनिधींकडून माध्यमांना खोटी माहिती, जनतेची दीशाभूल करत आहेत
मागील तब्बल आठवड्याभरापासून अण्णा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविरुद्ध उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, सरकारतर्फे भेटण्यास येणारे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट झाल्यावर प्रसार माध्यमांना खोटी माहिती देत असल्याचा आरोप करत अण्णांनी कालच्या पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांच्या त्यावेळच्या जन आंदोलनामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. दरम्यान, अण्णांनी राज ठाकरे यांच्याशी बंद दरवाज्याआड चर्चा सुद्धा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अण्णांच्या उपोषणाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
मी सुद्धा मोदींबरोबरच राजकारणातून निवृत्ती : स्मृती इराणी
गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देत पंतप्रधानांनी मला खासदार केले. त्यानंतर मला प्रारंभी मनुष्यबळ विकासमंत्री आणि आता वस्त्रोद्योगमंत्री अशी महत्त्वाची असलेल्या मंत्रालयाची जवाबदारी सोपविली. दरम्यान, मोदी ज्यावेळी राजकारणातून अलिप्त होतील त्या वेळी मी सुद्धा राजकरणातून निवृत्त होईन, अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी घोषणा केली.
6 वर्षांपूर्वी -
मार्केटिंग शिकावं तर भाजपकडून, असं केलं ५ वर्ष हुशारीने कमळ ब्रॅण्डिंग? सविस्तर
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. कोणतीही निवडणूक जिंकायची म्हटल्यावर केवळ पक्षाची मोठी नेतेमंडळी मतदाराला माहित असून चालत नाही, तर त्या आवडत्या नेत्याचं किंवा त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह कोणतं आहे, हे सुद्धा माहित असणं अत्यंत गरजेचं असतं. कारण संबंधित पक्षाचा आवडता नेता किंवा अध्यक्ष माहित आहे, परंतु त्याच्या पक्षाचं चिन्हच जर चाहत्या मतदाराला माहित नसेल तर सर्वच शून्य आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोणत्याही निवडणुका आल्या की सीबीआय'च्या धाडी कशा पडतात? ममता बॅनर्जी
मोदी सरकार, सीबीआय विरुद्ध ममता बॅनर्जी सरकार ही न्यायालयीन लढाई आता अटळ आहे. देशातील स्वायत्त संस्था असलेल्या CBI ला थेट आव्हान देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उपोषणाला बसल्या आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रातील भाजपा सरकारने सीबीआयचा स्वतःसाठी राजकीय वापर केल्याचा ममतांचा आरोप केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या पक्ष कार्यालयात पत्रकाराला बेदम मारलं, ४ नेत्यांना अटक
एका डिजिटल न्यूज’च्या पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या ४ स्थानिक पदाधिकाऱ्यांना काल रात्री उशीरा छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. काल संध्याकाळी भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयातच सदर पत्रकाराला जबर मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आहे. रायपूरच्या एका न्युज वेबसाईटचे पत्रकार भारतीय जनता पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे वार्तांकन करत असताना त्यांना हटकण्यात आले आणि उपस्थितांनी त्यांना जबर मारहाण केल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs NZ : न्यूझीलंडसमोर २५३ धावांचे आव्हान
विजय शंकरचं अर्धशतक ५ धावांनी, तर रायुडूचं शतक १० धावांनी हुकलं आहे. रायुडूनं ९० धावांच्या खेळीला ८ चौकार आणि ४ षटकारांचा साज चढवला. तर शेवटी हार्दिक पंड्याने २२ चेंडूत २चौकार आणि ५ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर २५३ धावांचे लक्ष देण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
साडेचार वर्ष स्वतःच्या 'मन की बात,' पण आता निवडणुकीआधी ‘भारत के मन की बात’
२०१४ मध्ये भारतात भाजपाची सत्ता स्थापन झाली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पासून संपूर्ण देशाला केवळ तब्बल साडेचार वर्ष स्वतःच्या ‘मन की बात’ ऐकवणारे मोदी आता लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ‘भारत के मन की बात’ मोहीम सुरु करणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज: सीमांचल एक्सप्रेसचे नऊ डबे घसरले; सहा ठार
सीमांचल एक्सप्रेसचे ९ डबे रुळावरून घसरून झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बिहारमधील सहदाई बुजुर्ग येथे हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी डॉक्टरांची टीम रवाना झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यासंदर्भात रेल्वेने हेल्पलाईन क्रमांकदेखील जारी केले आहेत. दरम्यान, मृत प्रवाशांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs NZ भारताचे ५ गडी बाद
न्यूझीलंड दौर्यावर असलेला भारतीय पुरुष क्रिकेट संघ आज होणार्या पाचव्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून चौथ्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक असून या मालिकेत सर्वात मोठा विजय मिळवण्यासाठी देखील भारतीय संघ सज्ज झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या भाषणावेळी प्रचंड गोंधळ, गर्दी व गदारोळ; मोदींनी भाषण १४ मिनिटात उरकलं
पश्चिम बंगालमधल्या ठाकूर नगर येथील प्रचार रॅली दरम्यान मोदींचं भाषण सुरु होताच उपस्थितांनी प्रचंड गोंधळ आणि गदारोळ केल्याने पंतप्रधानांना त्यांचे भाषण केवळ १४ मिनिटातच आवरतं घ्यावं लागलं. सुरवातीला नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले, परंतु काही वेळ बोलल्यानंतर प्रचंड गोंधळ आणि गदारोळ सुरु झाला. दरम्यान, पंतप्रधानांनी उपस्थित लोकांना माइकवरून आवाहन करत शांत रहाण्यास वारंवार सांगितले. परंतु, उपस्थित लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करत प्रचंड गोंधळ करण्यास सुरुवात केली. अखेर सर्वकाही नियंत्रणाबाहेर जाण्याच्या आधी मोदींनी केवळ १४ मिनिटात त्यांचे भाषण आटोपतं घेतलं.
6 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय
तब्बल ४० बँकांचे ४६ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा डोक्यावर असलेल्या अनिल अंबानी यांच्या ‘आरकॉम’ अर्थात रिलायन्स कम्युनिकेशन्स या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने अखेर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर विषयाला अनुसरून कंपनीने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाकडे कायदेशीर पूर्तता करण्यासाठी धाव घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पत्र मिळालं, आपणास शुभेच्छा; असं एका ओळीत उत्तर देत अण्णांची मोदींकडून हेटाळणी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागील ५ वर्षांत तब्बल ३८ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्यावर अखेर त्यांनी प्रथमच अण्णांच्या पत्राला केवळ एका ओळीत उत्तर देत त्यांची अप्रत्यक्ष हेटाळणीच केल्याचे म्हटले जात आहे. त्यात अण्णांना उत्तर देताना म्हटलं आहे की, ‘तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा’ केवळ एवढाच एका ओळीचा उल्लेख संबंधित पत्रात करण्यात आला आहे. परंतु, अण्णांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या, लोकपाल नियुक्ती तसेच प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे नरेंद्र मोदींनी स्पष्ट टाळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
ते ४८ तास सावधान! या नियमाच्या आड कोणीही विजयी उमेदवारावर आधीच ट्रॅप लावू शकतो? सविस्तर
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे अनेक विजयी उमेदवार खोटे शिक्षणाचे दाखले, जातीचे दाखले तसेच संपत्तीबद्दलची खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिल्यामुळे, त्यांचं नगरसेवक पद रद्द होण्यापर्यंत विषय जाऊन पोहोचतो. परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचा त्रास नसला तरी भविष्यात या नव्या नियमामुळे अनेक विजयी उमेदवार भविष्यात निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकून स्वतःची खासदारकी किंवा आमदारकी गमावून बसू शकतात. विशेष म्हणजे कोणीही राजकीय विरोधक प्रतिस्पर्धीना मतदानाच्या ४८ तास आधी शिस्तबद्ध अडकवू शकतात.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा स्वतःच्या फायद्यासाठी देशात दंगली घडवू शकतं: युपी मंत्री ओमप्रकाश राजभर
भारतीय जनता पक्षाचे योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री तसेच मित्रपक्ष सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या दाव्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांचे वजन उपोषणाच्या चौथ्या दिवशी साडे तीन किलोने घटले
आज अण्णांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्याच्या वजनात तब्बल साडेतीन किलोची घट झाली आहे. अण्णांच्या वयाचा विचार करता ते त्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं नाही असं डाक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, मोदी सरकार अण्णांच्या उपोषणाची जराही दखल घेत नसल्याची खंत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, आता तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतल्याचे कळते.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC