महत्वाच्या बातम्या
-
चहलच्या फिरकीसमोर कांगारूंचा डाव गडगडला, भारतासमोर २३१ धावांचं आव्हान
कसोटी मालिकेपाठोपाठ आता वनडे मालिका देखील जिंकून भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियात आणखी एक पराक्रम करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आजच्या एकदिवसीय सामन्यात युझवेंद्र चहलच्या फिरकीसमोर कांगारूंनी अक्षरश: नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार, विशेष उपग्रह सोडणार
भारत पाकिस्तानच्या सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानी नागरिकांच्या घुसखोरी या नित्याच्या गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे लष्कराला सुद्धा अनेक मर्यादा येत आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराचे सैनिक दिवस-रात्र सीमेवर जागता पहारा देतात, परंतु तरी घुसखोरीला रोखताना अनेक अडथळे येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
BSF मधील जेवणाच्या दर्जावर तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू
सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याबद्दल थेट समाज ,माध्यमांवर मांडणारा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्यानं चर्चेत आलेले BSF जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सदर प्रकरण आत्महत्येचं असल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून सखोल चौकशीची मागणी करण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोणतेही युद्ध सुरू नसताना सीमेवर जवान शहीद का होत आहेत? : मोहन भागवत
सध्या प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये आरएसएस’चे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी अयोध्येतील राम मंदिर मुद्द्यावरून मोदी सरकारवर बोचरी टीका केली. तर दुसरीकडे आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शहीद होण्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘कोणतेही युद्ध सुरू नसताना देखील सध्या भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत?’ असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ज्योतिष्याने सांगितले 'जानेवारीत मुख्यमंत्री पदाचा योग आहे', म्हणून येडियुरप्पा फोडाफोडीत उतरले?
कर्नाटकच्या विधानसभा निवडणूका पार पडून केवळ ७ महिनेच झाले आहेत. परंतु, भारतीय जनता पक्षाचे पायउतार झालेले माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना अजून मुख्यमंत्री पदाचा मोह सोडवत नाही. केवळ ७ महिन्याच्या कालावधीत कर्नाटक भाजपानं २ वेळा काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मात्र दोन्ही वेळा ते प्रयत्न असफल ठरले.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराकडून पाकचे १२ बंकर्स उद्ध्वस्त, ५ रेंजर्संना कंठस्नान
जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय जवानांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानला चांगला दणका देत आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या ५ जवानांना आज ठार करण्यात आलं असून पाक सैन्याचे अनेक बंकर्स सिद्ध भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केले आहेत. तसेच सर्जिकल स्ट्राईकनंतरची भारतीय लष्कराने केलेली ही पहिली सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हणावे लागेल.
6 वर्षांपूर्वी -
विवाह इच्छुक वधूंना हवा स्वतःचा फ्लॅट असणारा नवरा, लग्न जुळणं कठीण? सविस्तर
पूर्वी तंत्रज्ञनाचा सुळसुळाट नसल्याने समाज हा एकमेकांशी थेट जोडलेला होता. त्यामुळे नातेवाईक आणि मित्र मंडळी सुद्धा एकमेकांच्या परिवारांसोबत जोडले गेले होते. अशा परिस्थितीत विवाह जुळवणे आणि लग्नासाठी इच्छुक स्थळ शोधणे सोपं होतं. त्याचं मुख्य कारण होतं ते समाज एकमेकांच्या थेट संपर्कात असायचा. तसेच गरजा मर्यादित असल्याने काही ठराविक गोष्टी इच्छेनुसार असतील तर विवाह सुद्धा लवकर जुळणं सोपं असायचं. परंतु, आज परिस्थिती फार कठीण होताना दिसत आहे. त्यामुळे एकूणच बदलेल्या परिस्थितीमुळे विवाह व्यवस्था सुद्धा फार कठीण गोष्ट होऊन बसली आहे.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील घाटावर राहणाऱ्या घाटी लोकांना नोकऱ्यांमध्ये स्थान नको, केवळ भूमिपुत्रांना: गोवा पर्यटनमंत्री
गोव्यात लोकसभा निवडणुकीआधी परप्रांतीयांच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याला अनुसरून गोव्याचे विद्यमान पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी केलेल्या एका विधानानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. गोव्यातील नोकऱ्यांमध्ये परप्रांतीय, विशेषत: महाराष्ट्रातील लोकांना स्थान दिले जाणार नाही. केवळ गोव्यातील लोकांनाच इथे प्राधान्य दिले जाईल, असे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय मुद्दा तापण्याची चिन्ह आहे.
6 वर्षांपूर्वी -
हम तो फकीर आदमी है? भाजप अति-श्रीमंत झाला, तब्बल ४३७ कोटींच्या देणग्या
देशातील विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिलेल्या अधिकृत माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं अर्थात ‘एडीआर’ ही आकडेवारी सार्वजनिक केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
#Alert: सामान्यांच्या PF'चे २० हजार कोटी रुपये बुडण्याची शक्यता, IL&FS दिवाळखोरीच्या उबरठयावर?
लाखो पगारदार सामान्य लोकांचा आधार असलेली भविष्य निर्वाह तसेच निवृत्ती वेतनाची करोडोची रक्कम बुडण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ञांच्या मते इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग फायनान्शियल सर्विसेस अर्थात “IL&FS” या ग्रुपमध्ये जवळपास १५ ते २० हजार कोटीच्या भविष्य निर्वाह तसेच निवृत्ती वेतनाच्या निधीची प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणातील राज्यस्तरीय शेतकरी 'रयत बंधू योजनेचा' केंद्राकडून राष्ट्रीय स्तरावर विचार होणार?
मागील काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हिंदी पट्ट्यातील ३ महत्वाची राज्य गमवावी लागली होती. दरम्यान, या ३ प्रमुख राज्यांमध्ये भाजपला शेतकऱ्यांच्या नाराजीचा सर्वात मोठा फटका बसल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु, असे असले तरी तेलंगणात मात्र काँग्रेस, टीडीपी आणि भाजप असे मोठे प्रतिस्पर्धी समोर असताना सुद्धा टीआरएस’ला अभूतपूर्व यश प्राप्त झालं होतं.
6 वर्षांपूर्वी -
५ राज्यात पराभवानंतरचा निवडणूक धमाका; ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?
लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना मोदी सरकारकडून नवनव्या घोषणा होताना दिसत आहेत. सध्या मध्यम वर्गाला खुश करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या अडीच लाख रुपयांपर्यतचं उत्पन्न हे करमुक्त आहे. परंतु हीच मर्यादा थेट दुप्पट करून ५ लाखांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे नोटाबंदीमुळे मोठा फटका बसलेलय मध्यम वर्गाला खुश करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न सुरु आहे. याचा थेट फायदा भाजपाला लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो याचा पक्षाला अंदाज आहे.
6 वर्षांपूर्वी -
माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या पसरवताना पकडला गेला राज्य भाजप IT सेल प्रमुख
महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल प्रमुख आशिष मरखेड हा प्रसार माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या बनवून ते समाज माध्यमांवर पसरवताना पकडला गेला आहे. विशेष एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या ८ जानेवारीच्या राहुल गांधी याच्या मूळ बातमी मध्ये धार्मिक बदल करून ती स्वतःच्या अधिकृत ट्विटरवरून प्रसिद्ध करताना पकडला गेला आहे.
6 वर्षांपूर्वी -
१५३ रुपयांत १०० टीव्ही चॅनेल दाखवाः दूरसंचार नियामक प्राधिकरण
TV वरील आवडीचे चॅनेल निवडण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ ने ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेवून ट्रायने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल दाखवण्याचे थेट निर्देश ट्रायने केबल ऑपरेटर आणि डीटीएच’सेवा देणाऱ्यांना दिले आहेत. तसेच ग्राहकांनी TV वरील १०० चॅनेलची निवड ३१ जानेवारीपर्यंत करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काँग्रेस आमदारांना खरेदी करण्याच्या हालचाली?
कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारवर पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु असून, वाट्टेल ती किंमत मोजून त्यांची खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आमदारानेच हा दावा केला असून पक्षाचे तीन आमदार सध्या भारतीय जनता पक्षाच्या थेट संपर्कात असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
#कुंभमेळा: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात आग, योगी सरकारचे ढसाळ नियोजन सिद्ध
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात आज आग लागली आहे. दम्यान, उद्यापासून येथे कुंभमेळ्यास सुरुवात होत असून, आज इथल्या ढसाळ नियोजनातून सरकारी अनास्था आणि सुरक्षेबाबत योजलेले उपाय समोर आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानी महिला एजंटकडून तब्बल ५० भारतीय जवानांविरुध्द हनी ट्रॅप?
भारतीय लष्कराच्या तब्बल ५० जवानांविरुद्ध हनी ट्रॅप लावला गेल्याचे भारतीय लष्कराच्या प्राथमिक चौकशीत पुढे येत आहे. दरम्यान, या जवानांकडून लष्कराशी संबंधित गोपनीय आणि महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरविण्यात आल्याचा संशय भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस उत्तर प्रदेशात सर्व जागा स्वबळावर लढवणार
महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी यूपीत सपा आणि बसपा आघाडी केल्यानंतर बाजूला सारल्या गेलेल्या काँग्रेसनं सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे. यूपीत लोकसभेच्या सर्वच्या सर्व ८० जागा मतदारसंघात काँग्रेस उमेद्वार उभे करणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सीबीआय संचालक आलोक वर्मा प्रकरणी मोदी सरकारवर व्यंगचित्रातून बोचरी टीका केली आहे. व्यंगचित्रामध्ये एका बाजूला पंतप्रधान मोदी खड्डा खोदताना रेखाटले आहेत. या भागाला त्यांनी ‘हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला’ असे नाव दिले आहे. तसेच यात वर्मा प्रकरण मृतदेहाप्रमाणे दाखवले आहे. त्यामुळे वर्मा प्रकरण खड्यात गाडून संपवून टाकण्याचे मोदींचे प्रयत्न व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
१० टक्के सवर्ण आरक्षण घटनात्मक पातळीवर टिकेल का? पवार साशंक
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना मोदी सरकारनं दिलेलं एकूण १० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल की नाही, याबद्दल एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला असता ही शंका त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारकडून सदर निर्णय नेमका कोणासाठी घेण्यात आला आहे?, असा प्रश्न विचारत हे आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याचं मत अनेक प्रसिद्ध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे असं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी मोदींवर सुद्धा जोरदार निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS