महत्वाच्या बातम्या
-
पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशाऱ्यांना आम्ही घाबरत नाही: संजय राऊत
‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लातूर येथे दिलेल्या इशाऱ्यावरून आता शिवसेना-भाजपात शाब्दिक हमरीतुमरीला सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना उत्तर देताना असल्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे असे म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरूर यावं : राज ठाकरे
प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. त्यानंतर बरेच वादळ निर्माण झाले होते. साहित्यावर नितांत प्रेम करणारे राज ठाकरे यांच्या पक्षाकडून तशी मागणी झाल्याच्या बातम्या पुढे आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. परंतु, त्याबरोबर अनेकांनी वेगळीच शंका सुद्धा व्यक्त केली होती आणि ती म्हणजे मनसेच्या नावाने दुसरंच कोणी तरी हे करत आहे का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता.
6 वर्षांपूर्वी -
IND vs AUS 4th Test : भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला
भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कांगारूंना त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत गारद केले आणि इतिहास रचला आहे. आजचा ५वा दिवस सुद्धा पावसामुळे पूर्णपणे वाया गेला आणि अखेर शेवटची चौथी कसोटी अनिर्णीत राहिली. त्यामुळे भारताने २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ना खाऊंगा ना खाने दूंगा? योगी सरकारमधील ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना लाच प्रकरणी अटक
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील ३ विद्यमान मंत्री निवडणुकीच्या तोंडावर राजकीय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, एका खासगी टीवी वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशननंतर ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना अटक करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS: चौथा दिवशी भारताच्या विजयात पावसाचा अडथळा
भारत विरुद्ध कांगारूंच्या चौथ्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मालिका भारतीय टीमने जळपास जिंकली आहे. दरम्यान, या गोष्टीवर उद्या शिक्कामोर्तब होईल. परंतु, ते होण्यापूर्वी विराटसेनेने रविवारीच कांगारुंची लक्तर वेशीवर टांगली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
‘हे तर दहशतवादीच’; स्वरा भास्करची आरएसएस'वर टीका
शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून केरळमध्ये कायदा सुव्यवस्थेवरून तणावाची परिस्थिती आहे. दरम्यान, महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने-आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांना सर्वात मोठं हिंसक वळण मिळाले ते केरळमधल्या नेडुमांगडू पोलीस ठाण्यावर ४ गावठी बॉम्ब फेकण्यात आले. धक्कादायक म्हणजे संबंधित पोलिस ठाण्यावर गावठी बॉम्ब फेकणारे संशयित हे आरएसएसशी संबंधित असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत ‘मोदी मंत्र’ कुचकामी हे कार्यकर्त्यांना ठाऊक, पण ते बोलू शकत नाहीत: भाजप नेते संघप्रिय गौतम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उपपंतप्रधान पद द्यावे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना युपीच्या मुख्यमंत्रिपदी बसवा आणि एमपी’चे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष पद द्या, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पक्षाला दिला आहे. त्याचबरोबर पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केवळ राज्यसभेवरच लक्ष द्यावं असे मत व्यक्त केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपची डोकेदुखी वाढणार; या ७ राज्यांमध्ये काँग्रेस करणार प्रादेशिक पक्षांशी आघाडी
यूपी आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसशी येथील अनुक्रमे बहुजन समाज पार्टी – समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसशी आघाडी होण्याची काहीही चिन्हे नसली तरी इतर राज्यांतील प्रादेशिक पक्ष मात्र राष्ट्रीय काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: राफेल प्रश्नांवरून राहुल गांधीनी घाम काढताच भाजपची पाकिस्तान-पाकिस्तान बोंब सुरु? सविस्तर
राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरुन विरोधकांकडून होत असलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी मूळ प्रश्न आणि त्याला अनुसरून उत्तर देण्याऐवजी चर्चा भलत्याच विषयावर केंद्रित केली असे म्हणावे लागेल. विषय लोकसभेत चर्चेला असताना निर्मला सीतारमन यांनी पुन्हा मोदींच्या पराभवासाठी पाकिस्तानची मदत घ्यायला काँग्रेसला लाज नाही का वाटत ? असा काहीही संबंध नसणार विधान केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी हे स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान: कॅप्टन अमरिंदर सिंह
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला जे पंतप्रधान लाभले आहेत, त्यांच्यातील नरेंद्र मोदी हे सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, १९८४ मधील दंगल आणि इतर अनेक मुद्द्यांवरुन काँग्रेसला लक्ष केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काल मोदींवर जोरदार निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
रेल्वेत बिल मिळालं नाही तर जेवण फुकट, मार्चमध्ये? वाह रे टायमिंग!: सविस्तर कारण
रेल्वे प्रवाशांनसाठी एक मोठी बातमी आहे. कारण रेल्वेमधून प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचं अधिकृत बिल हातात मिळालं नाही, तर ते जेवण मोफत मिळणार आहे. मार्च महिन्यापासून रेल्वेमधील जेवणाच्या किंमतींचे तक्ते रेल्वेसह स्टेशनवर सर्व प्रवाशांना दिसतील अशा पद्धतीने सर्वत्र लावले जाणार असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वाच्या नावावर असा खेळखंडोबा काँग्रेसच्या काळात सुद्धा झाला नव्हता: उद्धव ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उफाळलेला केरळमधील शबरीमला मंदिराचा वाद आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत नरेंद्र मोदींनी मांडलेली भूमिका या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेने मोदी सरकार आणि आरएसएस’वर सामनामधून बोचरी टीका केली आहे. ‘हिंदुत्वाच्या नावावर देशात सध्या जो खेळखंडोबा सुरू आहे तसा तर काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा झाला नव्हता असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी सामनामधून केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS : पंत १५९ नाबाद, तर जाडेजा ८१ धावा, भारताचा पहिला डाव घोषित
कांगारूंविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामान्यांच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ करताना भारताने दमदार फलंदाजी करत पहिला डाव ७ बाद ६२२ भावांवर घोषित केला आहे. रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने ६०० धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि कांगारुंपुढे मोठं लक्ष उभं केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: मला एखादं मंत्रालय द्या, ज्यांना इथे असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून देईन: भाजप आमदार
यूपीतल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भारतीय जनता पक्षाच्या आमदारानं वादग्रस्त आणि वादग्रस्त विधान केलं आहे. देशात ज्या लोकांना असुरक्षित वाटते, त्यांना तर बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे, अशी विक्रतु प्रतिक्रिया देताना मुक्ताफळे उधळणारे हे महाशय भारतीय जनता पक्षाचे मुजफ्फरनगरमधले आमदार विक्रम सैनी आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी
अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज म्हणजे 4 जानेवारीला महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. सीजेआय रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सुनावणी पार पडणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
पद्म पुरस्कार: फिल्मी भाजप, श्रीदेवी, रमाकांत आचरेकर सर व राज यांनी मांडलेलं ते वास्तव आज सिद्ध झाले
भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे आणि जो भविष्यात भारतरत्न झाला, अशा महान सचिन तेंडुलकरचे गुरु आणि पद्म पुरस्कार विजेते द्रोणाचार्य रमांकात आचरेकर सर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मुंबईतील अनेक महान क्रिकेटपटू, जाणकार आणि राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले गुरु आचरेकर सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. दरम्यान, यावेळी सचिन आणि सरांचे सर्वच शिष्य अत्यंत भावुक झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
फिल्मी भाजपला पद्म पुरस्कार श्रीदेवी लक्षात, पण पद्म पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सरांचा विसर
भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे आणि जो भविष्यात भारतरत्न झाला, अशा महान सचिन तेंडुलकरचे गुरु आणि पद्म पुरस्कार विजेते द्रोणाचार्य रमांकात आचरेकर सर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मुंबईतील अनेक महान क्रिकेटपटू, जाणकार आणि राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले गुरु आचरेकर सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. दरम्यान, यावेळी सचिन आणि सरांचे सर्वच शिष्य अत्यंत भावुक झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबाबत शंका : मोहन भागवत
अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले स्पष्टीकरण आणि नुकत्याच हिंदी भाषिक पट्यातील ३ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस’चे प्रमुख मोहन भागवत यांनी आपले मत जाहीररीत्या व्यक्त केले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये पूर्वनियोजित सेवाधान शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान ते उपस्थितांना संबोधित करत होते.
6 वर्षांपूर्वी -
Ind vs Aus 4th Test: चेतेश्वर पुजाराचे धडाकेबाज शतक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या टेस्ट मॅचचा आज पहिला दिवस आहे. दरम्यान, कांगारूंविरुद्धच्या ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघ सुस्थितीत आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS 4th Test : विराट कोहली माघारी, भारताला तिसरा धक्का
कांगारूंविरुद्ध त्यांच्याच भूमीत ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा