महत्वाच्या बातम्या
-
प्रसार माध्यमांच्या प्रचारामुळे मोदी पंतप्रधान झाले', त्यांनी कधीही चहा विकला नव्हता
भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तिखट शब्दात टीका केली आहे. भाजपमध्ये मी सध्या वैयक्तिकरित्या वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले. तसेच नरेंद्र मोदींनी भूतकाळात केव्हाही चहा विकलेला नसून ते केवळ प्रसार माध्यमांच्या प्रचारामुळेच देशाचे पंतप्रधान झाले आहेत अशी बोचरी त्यांनी थेट मोदींचं नाव घेऊन केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अग्नी-४ बॅलेस्टिक मिसाइलचे यशस्वी परीक्षण
ओडिशाच्या भूमीवरून काल रविवारी सक्षम परमाणू घेऊन जाणारे आणि ४,००० किमी पर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ‘अग्नी ४’या बॅलेस्टिक मिसाइलची लष्कराने प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी चाचणी केली आहे. डॉ. अब्दुल कलाम द्वीपावरील एकीकृत परीक्षा केंद्रावरून (आयटीआर) रविवारी सकाळी ८.३५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे ४,००० किलोमीटर अंतरावरील जमिनीवर मारा करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिली.
6 वर्षांपूर्वी -
घ्या! शहांना मित्र पक्षाचं नाव माहित नाही आणि मोदी राहुल गांधींची स्मरणशक्ती काढतात
मागील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी भाषणादरम्यान राहुल गांधींना त्यांच्या एका उमेदवाराचं नाव चुकीचं उच्चारल्याने तो थेट भाषणाचा मुद्दा बनवला होता. त्यावेळी उपस्थित लोकांना मोदींनी ओरडून ओरडून सांगत होते की बघा काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव सुद्धा माहित नाही. वास्तविक मोदी स्वतः सुद्धा सर्व उमेदवारांची नावं वाचून बोलत असतात, पण मला सर्वकाही माहित आहे अशा अविर्भावात असतात.
6 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये भाजप-जनता दल (युनाइटेड) १७-१७ तर पासवान यांना ६ जागा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राजकीय घटनांनी जोर धरला आहे. त्यानिमित्त बिहारमध्ये सुद्धा एनडीए’दरम्यानचे जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जागावाटपावर आज दिल्लीत या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि जागावाटप निश्चित करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकांच्या कॉम्पुटरवर वॉच? हॅकर्सकडून भाजप-IT सेलची वेबसाइटच हॅक आणि तंबी
भारतीय जनता पक्षाची आयटी सेलची वेबसाइट bjpitcell.org हॅकर्सने हॅक केली असून भाजपला डिजिटल दणका दिला आहे. तसेच त्यावर भाजपला तंबी देणारा संदेशसुद्धा देण्यात आला आहे. त्यावर एक संदेश सोडताना म्हटले आहे की, खासगी संगणकावर लक्ष ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे तो मागे घेण्यात यावा. तसेच भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या सरकारचा निर्णय मागे न घेतल्यास आम्ही भाजपच्या गुन्हेगारीचे पुरावे थेट जगासमोर ठेऊ, अशी धमकीच या हॅकर्सने मोदी सरकारला दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सुरतमध्ये खासगी शिकवणीच्या बसला भीषण अपघात, १० विद्यार्थ्यांचा मृत्यू
शाळेच्या सहलीवर गेलेल्या बसला भीषण अपघात झाला असून एकूण १० विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात तब्बल ६० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. महाराष्टाच्या सीमेलगत असलेल्या गुजरातच्या डांग जिल्ह्यातील ही घटना असल्याचे वृत्त आहे. डांग येथे तब्बल ३०० फूट दरीत ही शाळेची बस कोसळली आहे.
6 वर्षांपूर्वी -
३ राज्यात पराभव; कर नाही तर २०१९ मधील 'डर कमी' करण्याचा प्रयत्न? सविस्तर
हिंदी पट्टय़ातील ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील मोठं अपयश पदरात पडल्यावर सामान्य माणसाचं दुःख सत्ताधाऱ्यांना थोडी समज देऊन गेल्याचा हा प्रत्यय म्हणावा लागेल. लवकरच सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा माहोल द्यानात घेता, नरेंद्र मोदी सरकार तिजोरीवर भार टाकणारे लोकप्रिय निर्णय घेत राहतील अशी अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्वच निर्दोष म्हणजे त्या सर्व हत्या नसून, ते स्वत:च मेले आहेत: राहुल गांधी
गुजरातच्या सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील २२ आरोपी निर्दोष असल्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. यावर राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमाने ट्विट केले आहे. हरेन पांड्या, जस्टिस लोया, तुलसीराम प्रजापती, प्रकाश ठोंबरे, श्रीकांत खंडाळकर, कौसर बी, सोहराबुद्दीन शेख या सर्वांची हत्या नसून ते स्वत:च मेले आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई, ६ दहशतवादी ठार
काश्मीर खोऱ्यातील त्राल आणि पुलवामा सेक्टरमध्ये शनिवारी सकाळपासून भारतीय लष्कर आणि आतंकवाद्यांदरम्यान तुंबळ धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय जवानांनी तब्बल ६ दहशतवाद्यांना ठार केले असून, काहींचा अजून शोध सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
राजीव गांधींच्या ‘भारतरत्न’वरुन आपमध्ये फूट? आमदार अलका लांबा नाराज?
दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीचा ठपका ठेवत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत सरकारने परत घेण्याच्या ठरावावरुन आपमध्ये वादंग निर्माण झालं आहे. कारण दिल्ली विधानसभेत सदर विषयाला अनुसरून थेट ठराव मांडण्यात आल्यानंतर आपच्या विद्यमान आमदार अलका लांबा यांनी समाज माध्यमांवर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तरुणाईचं हे अज्ञान राजकारण्यांच्या पथ्यावर पडतं?
तरुणाईचं हे अज्ञान राजकारण्यांच्या पथ्यावर पडतं?
6 वर्षांपूर्वी -
सावधान! अघोषित आणीबाणी? सरकार तुमच्या कम्प्युटरवर वॉच ठेवणार : सविस्तर
मोदी सरकार आता तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके हालचालींवर बारीक नजर असणार आहे. कारण, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील तब्बल १० मोठ्या एजन्सींना तुमच्या खासगी कम्प्युटरवर थेट नजर ठेवण्यासाठी परवानगी बहाल करण्यात आली आहे. या सर्व संबंधित १० एजन्सी एकप्रकारे तुमच्यासाठी गुप्तहेराचेच काम करणार असून त्या केव्हाही तुमच्या खासगी कम्प्युटरमधील माहिती तपासू शकतात. त्यामुळे तो कम्प्युटर तुमच्या मालकीचा जरी असला तरी त्याचा वापर आणि साठवलेल्या माहितीची काळजी घ्या.
6 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यांनी भगवान हनुमाना'चा वारंवार अपमान केला?
भाजप नेत्यांनी भगवान हनुमाना’चा वारंवार अपमान केला?
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारीच नाही: केंद्रीय कृषीमंत्र्यांची कबुली
सरकार बदललं तरी देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सजून तशाच कायम आहेत. काही दिवसांपासून देशभर विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनं पुकारली आणि थेट दिल्लीवर मोर्चे निघाले होते. देशभर शेतकऱ्यांची समस्या अतिशय गंभीर असताना मोदी सरकारमधील कृषिमंत्र्यांनी एक धक्कादायक कबुली दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी योग्य टीम लीडर नाहीत, जनता पुन्हा मतं देण कठीण: अर्थतज्ज्ञ मेघनाद देसाई
मोदींच्या धोरणांमुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असताना आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ सुद्धा पंतप्रधानांवर टीका करताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदींसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण, भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई यांनी सुद्धा नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, त्यांनी मोदींबाबत विधान करताना म्हटले की, २०१९ लोकसभा निवडणुकीत नाराज झालेली सामान्य जनता पुन्हा भारतीय जनता पक्षाला मतं देणार नाही, अशी बोचरी टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या बँकिंग क्षेत्रातील धोरणांविरोधात बँका संपावर, ५ दिवस बँका बंद
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या मागील सर्व प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने अर्थात ‘AIBOC’ उद्यापासून तब्बल ५ दिवसांसाठी संपावर जाणार आहेत. त्यात हे ५ दिवस आल्याने अनेकांची आर्थिक गैरसोय होण्याची शक्यता आहे. उद्या २० डिसेंबरनंतर सलग ५ दिवस बँका बंद राहणार असल्यानं २० तारखेच्या आधीच आपण बँकांमधील सर्व महत्वाचे व्यवहार आटोपून घ्यावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
त्या सिनेमाचं उदाहरण देत म्हणाले, आमच्या उत्साही वाचाळवीरांच्या तोंडात कापडाचा गोळा भरण्याची गरज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही वाचाळवीर नेत्यांना डोस दिला आहे. प्रसार माध्यमांकडे पुढे पुढे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मुळात कमी बोलण्याची नितांत गरज आहे, असं विधान गडकरींनी केलं आहे. नितीन गडकरी एका मीडियाच्या कार्यक्रमात संबोधीत करत होते. दरम्यान, याचवेळी त्यांनी राफेल लढाऊ विमानांच्या डील प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आलेल्या तब्बल ७० पत्रकार परिषदेवर नितीन गडकरी यांनी प्रथमच भाष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
बोफोर्स व २-जी प्रकरणात जेपीसी नेमलेली, मग राफेल प्रकरणात का नाही?
राफेल लढाऊ विमानांच्या कराराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात टायपिंगची चूक सुधारण्यासाठी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. आम्ही एखाद्या शब्दाची चूक समजू शकतो. परंतु, इथे तर संपूर्ण परिच्छेदतच गडबडी कशी आहे. काही झालं तरी संपूर्ण परिच्छेदातच चूक होणं अशक्य आहे, असा खरगे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे खर्गे हे लोकलेखा समितीचे (पीएसी) अध्यक्ष सुद्धा आहेत.
6 वर्षांपूर्वी -
युपीमध्ये बुआ- भतिजाची महाआघाडी? काँग्रेसला धक्का
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाश्री प्राप्त केल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असला तरी उत्तर प्रदेशातून काँग्रेसला दुःखद बातमी येण्याची शक्यता आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि सपा एकत्र येणार असून लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला सुद्धा या महाआघाडीत स्थान मिळणार आहे असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
जवाबदार पंतप्रधान म्हणून मी पत्रकार परिषदांना कधीच घाबरलो नाही : डॉ. मनमोहन सिंग
युपीएचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मी कधीच असा पंतप्रधान नव्हतो, जो पत्रकार परिषदेत बोलायला घाबरायचो. मी जवाबदार पंतप्रधान म्हणून माझ्या मंत्रिमंडळाचा पत्रकार परिषदेत पत्रकारांशी नेहमीच सुसंवाद राखला होता. तसेच मी कोणत्याही परराष्ट्र दौऱ्यावरून देशात परतल्यानंतर नेहमीच जाहीर पत्रकार परिषद घेत होतो, असं सुद्धा डॉ. मनमोहन सिंग आवजून म्हणाले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC