महत्वाच्या बातम्या
-
राम मंदिर कधी बांधणार? भाजपा खासदारांकडूनच नैतृत्वाला जाब
आधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर प्रचंड दबाव असताना त्यात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी सुद्धा भर टाकल्याचे समजते. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनीही राम मंदिराच्या निर्माणासाठी नेमकी काय पावले सरकारने उचलली आहेत, असा जाब भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी थेट संसदीय मंडळाच्या बैठकीत विचारला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नैतृत्वाची चांगलीच अडचण झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही: राहुल
जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत आम्ही पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही, असा थेट इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. केवळ घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्ज सुद्धा माफ केलेलं नाही, असं राहुल प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यात उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही
आगामी लोकसभा निवडणुका अगदी ३-४ महिन्यांवर येऊन ठेपल्याने भाजपने निवडणुकीचे उदघाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कल्याण तसेच पुण्यात मेट्रो ट्रेनचे भूमिपूजन पार पडणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रमाला भाजपचा मित्र पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणा पाठोपाठ कमलनाथांनी 'राज' मार्गाचं वास्तव स्वीकारलं? यूपी-बिहारींना नाही तर स्थानिकांना नोकऱ्या
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कमलनाथ यांनी बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. परप्रांतियाविरोधातील राग आळवला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोंढे मध्य प्रदेशातील स्थानिक युवकांच्या नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे आमच्या राज्यातील तरुणांना राज्यातील प्रत्येक उद्योगात ७० टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं नवंनियुक्त मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधी पक्षनेते पद: शिवराज सिंह चौहान यांना आरएसएस'चा विरोध
मध्यप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. के कमलनाथ लवकरच मुख्यमंत्रिपदाची सूत्र स्वीकारतील. सत्ताधाऱ्यांचा विषय मार्गी लागला असला तरी विरोधकांमध्ये वेगळाच पेच निर्माण झाला आहे. कारण सभागृहाच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नाव पुढे रेटले जात असताना संघाकडून मात्र शिवराजसिंग यांच्या नावाला तीव्र विरोध असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
१९८४ शीख विरोधी दंगल: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा
१९८४ साली दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हायकोर्टाच्या कनिष्ठ कोर्टाने निर्णय बदलत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवलं आहे. कुमार यांना शीख विरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, दंगल भडकवणे आणि कट कारस्थान रचणे हे दोन गुन्हे कोर्टात सिद्ध झाले आहेत. परंतु, हत्या प्रकरणात कुमार यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राम मंदिर हा केवळ भाजपचा अजेंडा, ‘एनडीए’चा नव्हे; मित्रपक्षांची भूमिका
भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए’च्या एकूण घटकपक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तर जे आहेत ते स्वतःची वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत आणि स्वतःला भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यापासून वेगळं ठेवत आहेत. एनडीए’चा भाग असलेल्या लोक जनशक्ति पार्टीने स्वतःची भूमिका मांडली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्यावरून वेगळे पाडले आहे. राम मंदिर हा केवळ एका पक्षाचा अजेंडा आहे, तो संपूर्ण एनडीएचा अजेंडा नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपाला अप्रत्यक्ष रित्या सुनावले आहे अशी चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दाक्षिणात्य नेते राहुल गांधींच्या पाठीशी, तर मोदी स्वतःला राजे समजतात अशी टीका
देशात सध्या सर्वत्र अराजक माजले असून पंतप्रधान मोदींनी सत्ताकाळात देशाला १५ वर्षे मागे रेटले आहे. मोदी स्व:ताला देशाचे राजे समजत आहेत. त्यामुळे देशाला आता नव्या तरुण पंतप्रधानाची गरज आहे. दरम्यान, तामिळनाडूतर्फे आघाडीकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आपण मांडत असल्याचे DMKचे अध्यक्ष एम के स्टॅलिन जाहीरपणे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
छत्तीसगड: मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल यांची निवड
छत्तीसगडमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा पेच अखेर सुटला आहे. याआधी मध्यप्रदेश आणि राजस्थानातील मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना यश आलं होतं, मात्र छत्तीसगडचा पेच कायम होता.
6 वर्षांपूर्वी -
पी. व्ही. सिंधूला वर्ल्ड टूर फायनल्सचं विजेतेपद
पी. व्ही. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहारावर तडफदार विजयश्री प्राप्त करत वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद नावावर केलं आहे. सिंधूने ओकुहारावर २१-१९,२१-१७ अशी मात करत या जागतिक किताबावर स्वतःच आणि देशाचं नाव कोरलं आहे. महत्वाचं म्हणजे वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचं तिने हे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं आहे आणि त्यामुळे बॅडमिंटन जगतात तीच कौतुक करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
विराट कोहली व अजिंक्य रहाणेची संयमी खेळी, भारत सुस्थितीत
भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीच्या संयमी खेळीने आणि त्याला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची लाभलेली साथ.यामुळे आज दुसऱ्यादिवशी भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत चिकाटीने पुन्हा कमबॅक केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
जेवणाचे बुरे दिन! सामान्यांच्या ताटातील भाकरी महागली
सध्या महागाईने हैराण झालेल्या सामान्य माणसाच्या ताटातील भाकरी सुद्धा महागली आहे. उत्पादनात घट झाल्याने मुंबईत ज्वारी आणि बाजरीचे दर दाम दुप्पट झाले आहेत. तसेच खानावळीत सुद्धा तयार भाकरीच्या दरात जवळपास ४ ते ५ रुपयांची वाढ झाल्याने मुंबईकरांच्या खिशाला भगदाड पडणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल डील: राहुल गांधींची 'जॉईंट पार्लीमेंट्री कमेटी'ची मागणी अजून मान्य नाही?
सुप्रीम कोर्टाने राफेल करारावरून चौकशी करण्याची गरज नसल्याचे निकालात स्पष्ट करताच अमित शाहांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राहुल गांधींवर राफेलच्या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी देशाची माफी मागावी अशी जाहीर मागणी करावी.
6 वर्षांपूर्वी -
कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबियांचे जवळचे मानले जाणारे कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात चुरस होती. अखेर एकमताने आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानंतर कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
राफेल लढाऊ विमानांच्या करारात कोणतीही अनियमितता नसल्याचं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी संबंधित सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, संजय किशन कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने दाखल याचिकांवर आज न्यायालयात अंतिम सुनावणी घेतली.
6 वर्षांपूर्वी -
गडकरींकडून विजय मल्ल्याची पाठराखण, म्हणाले 'तो घोटाळेबाज कसा'?
विजय मल्ल्याचे लंडनमधून भारतात प्रत्यार्पण होण्याआधीच त्याला सज्जन असल्याचा दाखल देण्यास भाजपकडून सुरुवात. कारण खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि देशातून पलायन कडून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मल्ल्याची पाठराखण केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आलू पॉलिटिक्स'चा दुसरा अंक सुरु? पराभूत झाल्याने भाजप चा पराक्रम
आलू पॉलिटिक्स’चा दुसरा अंक सुरु? पराभूत झाल्याने भाजप चा पराक्रम
6 वर्षांपूर्वी -
मनसेवर मतं फोडाफोडीचे आरोप करणारी शिवसेना देशभर भाजपची मत फोडण्यात व्यस्त?
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव आणि ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार शिवसेना उमेदवारांचे या हिंदी भाषिक राज्यांमध्ये डिपॉझिट जरी जप्त झाले असले तरी, याच तीन राज्यांमधील भाजपचे ५ आमदार शिवसेनेने घेतलेल्या मतांमुळे पराभूत झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आसाम NRC त्रुटी; अनेक परदेशी नागरिक भारतीय झाले, तर जे भारतीय आहेत त्यांना यादीत स्थानच नाही
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक अर्थात NRC नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवताना, कोणीही भारताला इस्लामिक देश करण्याचा प्रयत्न करु नये असे मत मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांनी याचिकेच्या सुनावणी दरम्यान व्यक्त केले आहे. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर धर्माच्या आधारे भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे होते, परंतु भारताने धर्म निरपेक्ष भूमिका स्वीकारली, असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.
6 वर्षांपूर्वी -
राजस्थान-एमपी'त काँग्रेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या शक्यतेने मोदी सुद्धा घाईघाईत घोषणा करणार?
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे मोदी सरकार धास्तावले आहे. त्याचे मोठे दुष्परिणाम २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत सुद्धा भिगावे लागतील याची चुणूक नरेंद्र मोदींना लागली आहे. त्यात ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये मोठे धक्के बसून थेट सत्ता गमावण्याची वेळ आल्याने मोदी सरकारने चांगलीच धास्ती घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC