महत्वाच्या बातम्या
-
एक्जिट पोल मोदी सरकारच्या विरोधात गेल्याने शेअर बाजार कोसळला
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्जिट पोल भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच मोदी सरकारच्या विरोधात गेल्यामुळे आज शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मुंबय शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी बाजार उघडताच ४७८.५९ अंकाची मोठी घसरुन होऊन तो ३५,२०४.६६ वर सुरु झाला होता. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये सुद्धा तब्बल १८५ अंकाची घसरगुंडी झाल्याचे पहायला मिळाले. सकाळी बाजार उघडताच निफ्टीची १०,५०८.७० अंकावर सुरुवात झाली.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रानं आरबीआयच्या कामात हस्तक्षेप करू नये: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
RBI आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयादरम्यान मागील अनेक दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. या संपूर्ण प्रकारानंतर IMF’चे मुख्य अर्थशास्त्री मॅरिस ओब्स्टफील्ड सदर प्रकरणावर जाहीर भाष्य केलं आहे. सर्मप्रथम RBI ने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर भारतातील केंद्र सरकारनं दयायला हवी. तसेच संबंधित सरकारने केवळ राजकीय फायद्यासाठी कोणत्याही केंद्रीय बँकेच्या कारभारात हस्तक्षेप केलेलं आम्ही खपवून घेणार नाही, असं मॅरिस ओब्स्टफील्ड यांनी अधिकुतपणे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारला चांगलीच चपराक बसली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कांगारुंची झुंज अपयशी, विराटसेनेचा यजमानांवर विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टीमने कांगारूंवर ३१ धावांनी विजय मिळवला आहे. कांगारुंपुढे ३२३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारतीय गोलंदाजांनी कांगारूंचा दुसरा डाव २९१ धावांतच गुंडाळला. ऑलराऊंडर पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी जोमाने केली करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची झुंज अपयशी ठरली. भारताच्या तेज गोलंदाजीपुढे कांगारुंचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर भारताने चार सामन्यांच्या मालिकेत यजमानांवर १-० अशी आघाडी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
५०% पेक्षा जास्त आरक्षण नाही, सुप्रीम कोर्टाने तेलंगणा सरकारला झापले
सुप्रीम कोर्टाने तेलंगणा राज्य सरकारला मुस्लीम आरक्षणावरून चांगलीच चपराक दिली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये ६७ टक्के आरक्षण बहाल करण्याची मागणी एका याचिकातर्फे कोर्टाकडे करण्यात आली होती. सदर प्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली. त्यात, ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक निकालाआधी रॉबर्ट वड्रा यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी
मागील चार वर्षांहून अधिक काळ संबंधित प्रकरणी तपास यंत्रणा काम करत होती. परंतु, सदर प्रकरणात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी रॉबर्ट वड्रा यांच्यावर कारवाईची फास आवळण्यात आल्याने वेगळीच शंका व्यक्त करण्यात येते आहे. यावेळी ते आम्हाला आत डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी प्रसार माध्यमांकडे केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणात तुम्हीच जिंकणार ना 'राव', मोदी-शहा-योगींना तेलुगू जनता लांबच ठेवणार?
तेलंगणात विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा टीआरच्या हाती सत्ता जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तेलगू जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांना स्पष्ट नाकारल्याचे चित्र समोर येऊ शकते. त्यामुळे दक्षिणेच्या राजकारणातील भाजपच्या प्रवेशाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप एमपी'त बाहेर, राजस्थानात सुपडा साफ तर तेलंगणात क्लीन बोल्ड होणार?
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगण या ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. आता उत्सुकता आहे ती, ११ तारखेच्या निकालांची. आता विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल अंदाज येण्यास एकामागे एक सुरुवात झाली आहे. त्यानुसार मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांची सत्ता भारतीय जनता पक्षाला गमवावी लागेल असं चित्र आहे. तसे झाल्यास भारतीय जनता पक्षासाठी आणि मुख्यत्वे मोदी आणि अमित शहांना तो मोठा धक्का असेल असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी भाषणात नीरव मोदी, अनिल अंबानी की जय म्हणावं
मोदींनी भाषणात नीरव मोदी, अनिल अंबानी की जय म्हणावं
6 वर्षांपूर्वी -
दहशतवादी हल्ल्यांपेक्षा खड्ड्यांमुळे अधिक मृत्यू : सुप्रीम कोर्ट
देशभरात रस्त्यांच्या निकृष्ठ दर्ज्यांमुळे आणि खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्युमुखी पडलेल्यांची निरपराधांची संख्या ही कदाचित देशभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्या लोकांपेक्षा अधिक असेल, अशी तीव्र नाराजी सुप्रीम कोर्टाने आज व्यक्त केली. मागील ५ वर्षांत रस्ते अपघातात तब्बल १४,९२६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कोर्टाने खूप चिंता व्यक्त केली तसेच असे प्रकार ‘अमान्य’ असल्याचे मत सुनावणीत स्पष्ट केले.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणात तब्बल १२० कोटी जप्त; मतदानाच्या आधी आला बेहिशेबी पैसा?
तेलंगणात मतदानाला काही तास उरले असताना काल सकाळी तेलंगणात पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ३ कोटी रुपये जप्त केले. सदर प्रकरणी एकूण ८ जणांना पोलिसांनी विभागाने ताब्यात घेतलं आहे. असं असलं तरी प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम कर्नाटकातून आली असल्याचे पोलिसांनी मत व्यक्त केले आहे. पण पकडण्यात आलेली रक्कम कोणत्या पक्षाशी संबंधित आहे का? यावर काही माहिती समजू शकलेली नाही.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणा,राजस्थानमध्ये आज मतदान; अनेक बुथवर EVM मध्ये बिघाड
आज राजस्थान आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पहिले जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे लागून राहिले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाड होण्याच्या घटना समोर येत आहेत असे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
अहंकार चाळवला? कांद्याचे पैसे मनीऑर्डर करणाऱ्या शेतकऱ्याच्या चौकशीचे आदेश
या सिजनमध्ये कांद्याला अवघा एक-दीड रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय काल नाशिक मध्ये आला होता. २०१४ मध्ये “बहुत हुआ किसान पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींची या शेतकऱ्याने चांगलीच कोंडी केली होती. एकूण सात क्विंटल ५० किलो कांदा विकून मिळालेले १,०६४ रुपये संजय साठे या शेतकऱ्याने थेट मोदींना मनिऑर्डर करून पाठवले आणि ‘ठेवा तुम्हालाच’ असा थेट संदेश पंतप्रधांना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेअर मार्केट गडगडला, सेन्सेक्समध्ये ५७२ अंकांची घसरण, २.२८ लाख कोटींचे नुकसान
शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. हाती ते;आलेल्या बातमीनुसार सेन्सेक्स तब्बल ५७२ अंकांनी खाली घसरला आहे. तर निफ्टीत सुद्धा मोठी घसरण पहायला मिळाली. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांचे एवढे नुकसान झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
चेतेश्वर पुजाराच्या १२३ धावांच्या खेळीने भारताचा डाव सावरला
येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच दरम्यान भारतीय क्रिकेट संघ पहिल्या डावात मोठ्या अडचणीत सापडला होता. दरम्यान, होमपीचवर ऑस्ट्रेलियन टीम भारतीय खेळाडूंना सहज मात देईल असे वाटत होते. परंतु, मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने वैयक्तिक शतकी खेळी करत पहिल्यांदा भागीदारी करत भारताला सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेर पुजाराच्या महत्त्वपूर्ण फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या आणि टीमचा जीव भांड्यात पडला.
6 वर्षांपूर्वी -
सीबीआय संचालकांना तडकाफडकी का हटवलं?; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह
सीबीआय सारख्या महत्वाच्या विभागात झाल्याचे हालचालींमुळे देशभर मोदी सरकारवर टीका करण्यात आली होती. दरम्यान, हा वाद इतका विकोपाला गेला होता की विरोधकांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, सध्या हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेला असून तिथे सुद्धा मोदींवर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी! प्रचार संपला, आता तुमचा पार्टटाईम जॉब असलेल्या पीएम पदाकडे जरा लक्ष द्या
सर्वाधिक वेळ परदेश दौऱ्यात आणि देशभरातील निरनिराळ्या निवडणूक प्रचारात अधिक वेळ खर्ची घालणाऱ्या नरेंद्र मोदींवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली आहे. पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार आता पूर्णतः संपला आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचा पार्ट टईम जॉब असलेल्या पंतप्रधानपदाकडे जरा लक्ष द्या आणि कमीत कमी एकतरी पत्रकार परिषद घ्या, असा उपरोधीक टोला राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लष्कराच्या शौर्याचं स्वतःसाठी मार्केटिंग, पण त्याच जवानांची अधिक वेतनाची मागणी फेटाळली
भारतीय लष्कराच्या ज्युनियर कमीशंड अधिकाऱ्यांबरोबर सशस्त्र दलांतील जवळपास १.१२ लाख लष्करी जवानांची जास्त पगाराची मागणी नरेंद्र मोदी सरकारनं स्पष्ट पणे फेटाळून लावली आहे. सैन्य सेवा एकूण वेतनात अधिक वाढ करून द्यावी अशी मागणी सुरक्षा दलांकडून करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही प्रलंबित मागणी केंद्र सरकारनं जास्त वेळ न घेता फेटाळून लावली आहे. त्यामुळे भारतीय सैन्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: मराठा आरक्षणात दगा होणार? शहांच्या तोंडून कायद्याचं अप्रत्यक्ष बिंग फुटलं?
देवेंद्र फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाला अधिकृत मान्यता दिली असली तरी अमित शहांच्या तेलंगणातील भाषणादरम्यान एकप्रकारे घटनात्मक आणि न्यायालयीन बिंग फुटल्याची शंका प्रसार माध्यमांवर व्यक्त होऊ लागली आहे. अनेक घटनातज्ञांच्या मतानुसार मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर ठाम पणे टिकण्यासाठी ते ओबीसीमध्येच नवा प्रवर्ग करून देणे गरजेचे होते. तसेच त्यासाठी ओबीसींच्या एकूण राखीव कोटय़ामध्येच वाढ करून, त्यासाठी भारताच्या संसदेत अधिकृतपणे कायदा करणे गरजेचे होते.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या त्या वक्तव्याने त्यांनी सरदार पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं?
स्वातंत्र्याच्या काळात भारतातील नेत्यांकडे शहाणपण नसल्यामुळे पंजाबमधील तीर्थस्थळ कर्तारपूर हे पाकिस्तानात गेले, असे सांगत पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. तसेच नरेंद्र मोदी स्वतःला सर्वेश्रेष्ठ नेता सिद्ध करण्यासाठी गांधी, पटेल आणि इतर नेत्यांना खालच्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षांनी मोदींवर निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ! मोदीना विकास नाही 'विनाश पुरुष' म्हटल्याने उमा भारतींचा लोकसभेत पत्ता कट?
आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही असे उमा भारती यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. तसेच यापुढे मी संपूर्ण लक्ष अयोध्येतील राम मंदिर आणि गंगा नदीवर केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केले आहे. उमा भारतींनी हा मोठा निर्णय घेतला असला तरी मूळ कारण वेगळंच असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today