महत्वाच्या बातम्या
-
पाकिस्तानचे ‘सार्क’ परिषदेचे निमंत्रण भारताने फेटाळले
भारत आणि पाकिस्तानमध्ये डेरा बाबा नानक-करतारपूर साहिब कॉरिडॉरवरुन सुरू असलेल्या वादादरम्यान पाकिस्तानला आणखी एक दणका मिळाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, मोदी सरकारने पाकिस्तान सरकारचे हे निमंत्रण नाकारले असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
तो पैसा कठिण काळात वापरण्यासाठी, आरबीआयचा मोदी सरकारला नकार?
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी काल संसदेच्या अर्थविषयक समितीसमोर हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून अतिरिक्त राखीव निधीवरून मोदी सरकार आणि RBI यांच्यात कटुता आली आहे. कर्ज देण्याची क्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक अस्थिरता ध्यानात घेता सध्या RBI’कडे ज्या प्रमाणात अतिरिक्त राखीव निधी आहे, तो भविष्यातील उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीसाठी आवश्यक आहे असे RBI’चे गर्व्हनर ऊर्जित पटेल यांनी संसदीय समितीकडे स्पष्ट सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचा आरबीआय'वर एक्सेस कॅपिटलमधून २ लाख कोटी रुपयांसाठी दबाव?
आरबीआय’कडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त रोकड अर्थात “एक्सेस कॅपिटल” मधून, मोदी सरकारला तब्बल १ ते ३ लाख कोटी रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘बँक ऑफ अमेरिका मॅरिल लिंच’च्या तज्ञांनी रिझर्व्ह बँकेकडून मोदी सरकारला १ ते ३ लाख कोटी रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही रक्कम भारताच्या एकूण जीडीपीच्या ०.५ ते १.६ टक्के इतकी असेल असं म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
माझं गोत्र 'कौल दत्तात्रय ब्राह्मण' सांगत राहुल गांधींचे भाजपला प्रतिउत्तर
सध्या ५ राज्यांमध्ये विधानसभेची धामधूम सुरु असून त्यानिमित्त एकमेकांवर चिखलफ़ेक सुरु असताना भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना डिवचण्यासाठी तुमचे गोत्र कोणते असा प्रश्न उपस्थित केला होता. सध्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजस्थान दौऱ्यावर आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
केजरीवालांवर हल्ल्याचा कट? तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काही दिवसांपूर्वी कार्यालयाजवळ धक्काबुक्की करत एका इसमाने मिरची पूड फेकल्याचं असफल प्रयत्न केला होता. ते संपूर्ण प्रकरण ताज असताना आत केजरीवालांच्या जनता दरबारातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने त्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून चौकशी सुरु केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सुनील अरोरा यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती
विद्यमान निवडणूक आयुक्त सुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील असं वृत्त आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांच्या जागी त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. स्वतः निवडणूक आयोगाने सोमवारी या नियुक्तीची अधिकृत बातमी दिली आहे. पुढील महिन्यात म्हणजे दोन डिसेंबरला अरोरा अधिकृतपणे त्यांचा पदभार स्वीकारतील. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त १ डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा आणि संयम बाळगा : मनमोहनसिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिगर भारतीय जनता पक्ष शासित राज्यांमध्ये भाषणादरम्यान थोडा संयम बाळगायला हवा. पंतप्रधानांनी त्यांच्या आचरणातुन नेहमी इतरांसाठी उदाहरण समोर ठेवले पाहिजे. तसेच त्यांची एकूण वर्तणूक ही पंतप्रधानपदाला सुद्धा साजेशी असली पाहिजे, असा सल्ला माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटींचं बक्षीस
आज मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला तब्बल १० वर्षे पूर्ण होत असली तरी या हल्ल्यामागील खऱ्या सूत्रधार तसेच दोषींवर कारवाई न होणे म्हणजे पीडितांचा अपमानच म्हणावा लागेल. युनो’च्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे षडयंत्र रचणारे खरे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे ही पाकिस्तान सरकारची मुख्य जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली आहे. तसेच या दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यासाठी बक्षिसा सुद्धा अमेरिकेकडून मोठी वाढ करण्यात आली असून ती तब्बल ३५ कोटी इतकी करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘पीएमओ’चा परदेशातून भारतात आणलेल्या काळ्या पैशाची माहिती देण्यास नकार
चौकशी आणि गुन्हेगारांवरील न्यायालयीन खटल्यात अडथळे ठरू शकणारी माहिती देऊ नये अशी तरतूद RTI कायद्यात आहे. त्यानुसार ब्लॅकमणी बाबत माहिती देण्यास नरेंद्र मोदींच्या कार्यालयाने स्पष्ट नकार दिला आहे. विशेष म्हणजे १६ ऑक्टोबरला केंद्रीय माहिती आयोगाने PMOला परदेशातून आणलेल्या काळ्या पैशाबाबतचा संपूर्ण तपशील १५ दिवसांत देण्याचा लेखी आदेश दिले होते.
6 वर्षांपूर्वी -
प्रभू श्रीराम म्हणतात, देश घातलात खड्यात आता माझ्या नावाने!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यांनी आजच्या व्यंगचित्रातून अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेना, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर बोचरी टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ती जागा राम जन्मभूमीच, आता सरकारने कायदा बनवावा : मोहन भागवत
अयोध्येतील त्या विवादित जागेवर राम मंदिरच होते. आणि ती भूमी रामल्लाचीच आहे. कारण तिथे केलेल्या उत्खननात सुद्धा राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. तसेच कोर्टाच्या प्रक्रियेला फार विलंब होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या विवादित जागेवर राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने तसा कायदा करावा, अशी थेट मागणी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी हुंकार सभेत केली. तसेच आता राम मंदिराच्या कायद्यासाठी देशभरात जनजागृती करण्याचे थेट आवाहान सुद्धा आरएसएस प्रमुखांनी यांनी केले.
6 वर्षांपूर्वी -
विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्यानेच त्यांना राम मंदिर आठवलं
भारतीय जनता पार्टीने सामान्यांना विकासाची दाखविलेली स्वप्ने पूर्णपणे भंग पावल्याने ते सामान्यांचे मन विचलित करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने पुन्हा अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. असे असले तरी रामाच्या नावावर भविष्यात पुन्हा मते मिळणार नाहीत,’ असं पृथ्वीराज चव्हाण यांनी मत व्यक्त केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा आमच्या युतीसाठी पोषक : फडणवीस
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब अयोध्येतील राम मंदिराच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान, काल पासून ते अयोध्येच्या दौऱ्यावर असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या संबंधित प्रकरणावर प्रसार माध्यमांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या दौऱ्याचे सर्मथन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकांआधी राम-राम आणि निवडणुकांनंतर आराम, हेच मोदी सरकारचं काम
येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संवाद साधताना म्हणाले की, अयोध्येला येण्यामागे माझा कोणताही छुपा अजेंडा नाही. मी केवळ देशातील तमाम हिंदुंची भावना व्यक्त करण्यासाठी इथं आलो आहे. परंतु, आता मोदी सरकारने तमाम हिंदुंच्या भावनांशी अजिबात खेळू नये. एवढे दिवस, वर्षे आणि पिढी गेली तरी अजून अयोध्येत राम मंदिर उभे राहत नाही. युपीचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनीच सांगितल्याप्रमाणे मंदिर येथे होतं, आहे आणि राहिलं सुद्धा या मताशी आम्ही पण सहमत आहोत. परंतु, हे राम मंदिर आम्हाला दिसत का नाही? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची अयोध्यावारी रिलायन्सच्या विमानातून?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २ दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आज सकाळीच ते सहकुटुंब एका विशेष विमानाने अयोध्येला रवाना झाले. परंतु त्यांचं कुटुंब ज्या विशेष विमानाने अयोध्येला गेलं ते अंबानी समूहाचं असल्याचं समोर येत आहे. तसा लोगो सुद्धा त्यावर स्पष्ट दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
देश कठीण परिस्थितीतून जातो आहे: प्रणब मुखर्जी
भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी यांनी मानवाधिकारांचे हनन आणि देशांतर्गत वाढती असहिष्णूता आणि देशातील जास्तीत जास्त पैसा केवळ श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने भारतात गरीब-श्रीमंतांमध्ये निर्माण झालेल्या दरी मुळे त्यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
फ्रान्समध्ये सुद्धा राफेल डील चौकशीच्या कचाट्यात येणार ? मीडियापार्ट
भारतामध्ये राफेल करारावरून आधीच अडचणीत आलेलं नरेंद मोदी सरकार आता अजून अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आता भारताप्रमाणे फ्रान्समध्ये सुद्धा राफेल लढाऊ विमानांच्या कराराची चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्रान्समधील भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने फ्रान्सच्या राष्ट्रीय आर्थिक अभियोजक कार्यालयात तशी चौकशी संदर्भात तक्रार दाखल केली आहे. या संस्थेने दाखल केलेल्या तक्रारी प्रमाणे भारत आणि फ्रान्स दरम्यान सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या तब्बल ५९,००० कोटीच्या राफेल लढाऊ विमानांच्या डीलची सखोल चौकशी करण्यात यावी अशी लेखी मागणी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे कुटुंबीय आज विशेष विमानाने अयोध्येला रवाना होणार
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी धार्मिक राजकारण तापविण्यास सुरुवात केली आहे. आधीच भाजप समर्थक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत सभा आणि लॉन्गमार्च आयोजित करत आहेत. त्यात उद्या उद्धव ठाकरे कुटुंबीय सुद्धा आज विशेष विमानाने अयोध्येला प्रयाण करत आहेत. सध्या तणावाचे राजकीय आणि धार्मिक वातावरण निर्माण करून त्याचा पक्षाला कसा फायदा करून घेता येईल अशी सत्ताधाऱ्यांची रणनिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
जागतिक बॉक्सिंग स्पर्धा: मेरीकोमची अंतिम फेरीत धडक
जागतिक ख्यातीची भारतीय बॉक्सिंग सुपरस्टार एम. सी. मेरी कोम हीने तिच्या कारकिर्दीतील ६व्या विश्वविजेतेपदासाठी नवी दिल्ली येथील विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याआधी तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने सहज पराभूत केले आणि अंतिम फेरी गाठली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरात सोहराबुद्दीन चकमक: अमित शहा सुद्धा कटात होते, पण कागदोपत्री पुरावे?
कथित गुंड सोहराबुद्दीन शेख आणि त्याचा साथीदार तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीचा कट रचणाऱ्यांमध्ये मुख्यत्वे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा, डी.जी. वंजारा, राजकुमार पांडियन व एम. एन. दिनेश हे ३ IPS अधिकारी सामील होते. परंतु, हे आरोप सिद्ध करणारे कोणता सुद्धा कागदोपत्री पुरावे नव्हते’, असे CBIचे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी बुधवारी विशेष CBI न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्याकडे नोंदवलेल्या साक्षीत नमूद केले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today