महत्वाच्या बातम्या
-
अयोध्या अर्थात उत्तर प्रदेशातील हिंदी भाषणासाठी उद्धव ठाकरेंची हिंदीची शिकवणी?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यात अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. दरम्यान, या दौऱ्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख कामाला लागले आहेत. शिवसेनेसाठी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराचा मुद्दा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. हिंदीतील भाषणा दरम्यान भाजपाला देशभर अडचणीत आणण्यासाठी योग्य संदेश हिंदी भाषेत जाणे गरजेचे आहे, हे माहित असल्याने त्यांनी भाषणासाठी हिंदीची शिकवणी सुरु केल्याचे वृत्त ‘दैनिक भास्कर’ने प्रसिद्ध केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
संरक्षण संस्थांमधील तब्बल ४ लाख कर्मचारी सरकार विरोधात तीव्र आंदोलनाच्या तयारीत?
केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विविध संस्थांमधील तब्बल चार लाख कर्मचारी पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीत तीन दिवसीय आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कर, हवाई दल, वर्कशॉप, नवल डॉक्स तसेच ४१ दारुगोळा फॅक्टरी इथं काम करणारे कर्मचारी २३ ते २५ जानेवारी दरम्यान आंदोलन पुकारणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात हे आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
सिंगापूर: गुंतवणुकीसाठी भारत उत्तम ठिकाण : पंतप्रधान
सिंगापूर सध्या फिनटेक फेस्ट सुरु असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की,”आज तंत्रज्ञानाच्या ताकदीची व्याख्या बदलत असून यात तरुणांचं मोलाचं योगदान आहे. तरुणांची एकूण क्षमता आणि त्यांच्या ऊर्जेवर विश्वास दाखवला पाहिजे, असे वक्तव्य पंतप्रधानांनी भाषणादरम्यान केले. तसेच उपस्थित फिनटेक कंपन्यांच्या प्रतिनिधींना भारतात गुंतवणुक करण्याचे जाहीर निमंत्रण सुद्धा दिले.
6 वर्षांपूर्वी -
गुजरात दंगल: सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी, मोदी अडचणीत?
गुजरातमध्ये गोध्रा कांडानंतर मोठी जातीय दंगल उसळली होती. दरम्यान, या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आधीच क्लिन चिट देण्यात आली होती. तसेच याच प्रकरणात प्रमुख आरोपी नरेंद्र मोदी आणि इतरांना एसआयटीने दिलेली क्लिन चिट गुजरात हायकोर्टाने कायम ठेवली होती. परंतु गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध झकिया जाफरी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यानुसार मंगळवारी झकिया जाफरी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती. ए. एम. खानविलकर यांच्या पीठाने १९ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
हास्यास्पद स्पष्टीकरण; रिलायन्सला विमान निर्मितीचा अनुभव आमच्याकडून मिळेल: दसॉल्ट
विषय हा होता की, संरक्षण संदर्भातील लढाऊ विमान निर्मिती क्षेत्रातील शून्य अनुभव असलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्सला राफेलचं कंत्राट देणं हवाई दलासाठी धोकादायक आहे, असा आक्षेपदेखील राहुल गांधींनी घेतला होता. त्यावर सुद्धा एरिक यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘आमच्या कंपनीकडे प्रशिक्षित अभियंते तसेच कर्मचारी आहेत. तर दुसरीकडे भारतातील अनिल अंबानींची रिलायन्स कंपनी या क्षेत्रात नवोदित आहे. दसॉल्टसोबतच रिलायन्सदेखील या प्रकल्पात गुंतवणूक करेल. यामुळे रिलायन्सला विमान निर्मितीचा अनुभव मिळेल,’ असं दसॉल्टच्या सीईओंनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
फेक न्यूज व मोदींच्या आजूबाजूच्या घडामोडींमध्ये परस्परसंबंध असल्याचा निष्कर्ष: बीबीसी
बीबीसी न्यूजने केलेल्या एका संशोधनानुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय नागरिक ‘राष्ट्र उभारणी’च्या उद्देशाने राष्ट्रवादासंदर्भातील बातम्या मोठ्या प्रमाणावर शेअर करतात. राष्ट्रवादासंदर्भातील संदेश पसरवणे त्यांना स्वतःचे कर्तव्य वाटते असं म्हटलं आहे. दरम्यान, भारत देशाची प्रगती, हिंदुशक्ती तसेच हिंदू गतवैभवाला झळाळी अशा विषयां बद्दलची खोटी माहिती कोणतीही खात्री न करता मोठ्या प्रमाणावर पुढे पाठवली जाते असं समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल विमान करारप्रकरणी केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर
अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राफेल लढाऊ विमान करारप्रकरणी मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर केले आहे. तसेच या शपथपत्रामार्फत केंद्राने राफेल लढाऊ विमान खरेदी करारासाठी अमलात आणण्यात आलेल्या खरेदी प्रक्रियेची माहिती सुद्धा बंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केली आहे. तसेच राफेल लढाऊ विमान खरेदी कराराच्या निर्णयासंबंधीच्या प्रक्रियेबाबतचा तपशील केंद्राने याचिकाकर्त्यांना सोपवली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींचे डमी; लोकं मोदींचा राग माझ्यावर काढायचे; कंटाळून काँग्रेसमध्ये
२०१४ पासून मी नरेंद्र मोदींच्या प्रचारात सतत कार्यरत होतो. नरेंद्र मोदी यांनी सामान्य लोकांना इतकी खोटी आश्वासनं दिली की, ती आश्वासनं केवळ निवडणुकीतील “जुमला” ठरल्याने लोकं मोदींचा सर्व राग माझ्यावर काढायचे असा रोजचा अनुभव झाला होता. दरम्यान, पंतप्रधान झाल्यावर मोदींनी ओळख दाखवणं सुद्धा बंद केले तसेच अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा कधीच उत्तर मिळाले नाही. त्यावेळी त्यांच्या घमंडी स्वभावाचा मला सुद्धा अनुभव आला. ते लोकांना केवळ स्वतःच्या वेळेपुरता वापरून घेतात आणि काम झाल्यावर दुर्लक्ष करतात हे मी खात्रीने सांगतो असे ते म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
अयोध्या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट नकार
अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दरम्यान, राम मंदिर जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल, असं यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. परंतु, त्यानंतर सुनावणीनंतर लगेचच या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, ही याचिका सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट पणे फेटाळून लावली आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन
मोदींच्या मंत्रिमंडळातील प्रमुख वरिष्ठ मंत्र्यांपैकी केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे काल रविवारी रात्री उशिरा दीड वाजता कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. बेंगळूरू येथील आपल्या निवासस्थानी त्यांणि अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर नियमित उपचार सुरु होते. नुकतेच ते लंडन दौऱ्यावरुन घरी परतले होते. कर्नाटकातील दक्षिण बेंगळूरू मतदारसंघातून तब्बल ६ वेळा निवडून येण्याचा त्यांचा विक्रम आहे. दरम्यान, बंगळूरूच्या नॅशनल कॉलेज येथे त्यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
सध्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून आज छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
६०० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकत भाजप नेते जनार्दन रेड्डींना अटक
तब्बल ६०० कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकातील भाजपाचे दिग्गज नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक करून ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग तसेच संबंधित प्रकरणातील प्रमुख आरोपीला पैशांची अवैध पद्धतीने देवाण घेवाण करण्यासाठी मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रेड्डी यांच्यासोबत त्यांचा प्रमुख सहकारी महफूझ अली खान याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, कोर्टाने जनार्दन रेड्डी यांना २४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत धाडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
एमपी'मध्ये सत्ता आल्यास शासकीय इमारती व परिसरात RSS च्या शाखांवर बंदी: काँग्रेस
मध्य प्रदेशमध्ये विघानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारामध्ये राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून दोन्ही बाजूंनी तिखट शब्दांचा मारा करण्यात येत आहे. सध्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडू लागल्याने संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल: भाजपाची रथयात्रा रोखणाऱ्यांना आम्ही त्याच रथाखाली चिरडू
पश्चिम बंगालमधील ‘जे लोक आमची रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही त्याच रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू’ असं वादग्रस्त वक्तव्य पश्चिम बंगाल राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा लॉकेट चॅटर्जी यांनी यांनी केल्याने खळबळ माजली आहे. मालदा जिल्ह्यात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजपने प. बंगालमध्ये लोकशाही स्थापन करण्याच्या उद्देशाने ही रथयात्रा आयोजित केली आहे असं त्या म्हणाल्या.
6 वर्षांपूर्वी -
२५ नोव्हेंबरलाच सेनेचं ‘चलो अयोध्या’ आणि RSS'ची सभा? देशात धार्मिक तेढ वाढवण्यासाठी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर देशात धार्मिक तेढ वाढविण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न सुरु झाले आहेत का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. कारण हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा हाती घेत शिवसेनेने ‘२५ नोव्हेंबरला चलो अयोध्या’ चा कार्यक्रम आखला आहे आणि त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा म्हणजे २५ नोव्हेंबरला राम मंदिराच्या मागणीसाठी प्रचंड सभा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ प्रमाणे कोणतीही लाट नसेल, तर २०१९ मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म महत्वाच्या भूमिकेत
भारतीय जनता पक्षाच्या २०१४ मधील विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची भूमिका मांडली आहे. दरम्यान, बोलताना ते म्हणाले की नरेंद्र मोदी हे मोठे नेते असले तरी २०१९ मध्ये २०१४ प्रमाणे कोणतीही लाट नसेल असे त्यांनी म्हटले आहे. तसेच २०१९ मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तरी त्यांना एकट्याला २७२ जागा मिळणे कठीण असल्याचेच म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
नोटबंदी फसल्याचा पुरावा? भाजपकडून ८ नोव्हेंबरला ना 'पत्रकार परिषद' ना 'मन कि बात'?
देशातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर पत्रकार परिषद आयोजित करणारा भाजप पक्ष आणि ‘मन की बात’ मध्ये मनातल्या गोष्टी देशवासियांना सांगणारे नरेंद्र मोदी, यापैकी ८ नोव्हेंबरला ना पक्षाने एखादी पत्रकार परिषद आयोजित केली, ना मोदींनी २ वर्षांपूर्वीच्या नोटबंदीच्या निर्णयावर ‘मन मोकळं केलं’. यावरूनच नोटबंदी फसल्याचे जवळपास निश्चित होते.
6 वर्षांपूर्वी -
आज किंवा उद्या गोव्यात नेतृत्वबदल गरजेचा : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्यात नेतृत्वबदलाबाबत भाष्य करुन भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणले आहे. दरम्यान, गोव्यात भाजप नेतृत्व बदल करणार नाही, असे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी आधीच स्पष्ट केले होते. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आजाराने ग्रासले आहे. परंतु, अशा परिस्थितीत सुद्धा ते राज्याचं काम करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
हिंदूंनो! पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून सावधान: शिवसेना
जसजशी लोकसभा निवडणुक जवळ येत आहे, तसा राम मंदिराचा विषय अधिक गडद करण्याचा प्रयत्नं सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात श्री. रामचा भव्य पुतळा उभारण्याचे संकेत दिले होते. त्याला अनुसरूनच मित्र पक्ष शिवसेनेने सामना या मुखपत्रातून मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
RBI आणि केंद्रातील वाद विकोपाला? आकस्मिक योजनेसाठी साऊथ ब्लॉकची तयारी?
भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रातील मोदी सरकारमधील वाद विकोपाला गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आरबीआयच्या संचालक मंडळाच्या १९ नोव्हेंबर रोजीच्या मुंबईतील बैठकीत उर्जित पटेल यांनी काही आकस्मित निर्णय घेतल्यास साऊथ ब्लॉकने तयारी सुरु केली असून त्यांच्याजागी हसमुख अधिया यांच्याकडे गव्हर्नरपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News