महत्वाच्या बातम्या
-
पवारांची अमित शहांवर टीका, न्यायालयाचे निर्णय सुद्धा तुम्हाला मान्य नाहीत
पुण्यात एनसीपीच्या संविधान बचाव यात्रेची समारोप सभा आज पार पडली. दरम्यान, या कार्यक्रला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा सुद्धा भाषणादरम्यान समाचार घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अयोध्या राम मंदिर: आता सुनावणी थेट पुढच्या वर्षी
अयोध्येतील बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी जमीन वादाबाबत अलाहाबाद हायकोर्टाने २०१० साली दिलेल्या निकालावरील आव्हान याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आता थेट पुढच्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी अयोध्या प्रकरणावर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती. संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती. के. एम. जोसेफ यांच्या समोर सुनावणी झाली. दरम्यान, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिकांवर आता थेट २०१९ मध्ये सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानात भारतीय चित्रपट व मालिकांवर कायदेशीर बंदी
पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करणाऱ्या भारतीय समर्थकांना आज चांगलाच धडा मिळाला आहे. कारण पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने शनिवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान भारतीय चित्रपट आणि मालिकांवर बंदीचा घालण्याचे आदेश दिले आहेत. याआधी २०१७ मध्ये लाहोर हायकोर्टाने भारतीय मालिका आणि चित्रपटांवरील बंदी हटवली होती. परंतु, या आदेशामुळे बॉलिवूडला सुद्धा मोठा धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्यापासून रामजन्मभूमी आणि बाबरी खटल्याची सुनावणी
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाच्या खटल्याची सुप्रीम कोर्टात सोमवारी, म्हणजे २९ ऑक्टोबर पासून सुनावणी सुरू होणार आहे तसेच या खटल्याची पुढील नियमित सुनावणी कशी करायची याची रूपरेषा सुद्धा त्याच दिवशी निश्चित केली जाईल असे वृत्त आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे ही पुढील सुनावणी होईल.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे ८२व्या वर्षी निधन
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदन लाल खुराना हे मागील काही वर्ष मेंदूज्वरामुळे कोमामध्ये गेले होते. काल रात्री उशिरा राहत्या घरीच त्यांचे निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांचे पुत्र हरिश खुराना यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या इच्छेला नकार, प्रजासत्ताक दिनी ट्रम्प यांचा भारतात येण्यास नकार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची मोदींच्या विनंतीला सपशेल नकार दिल्याने पंतप्रधान मोदींना राजकीय धक्का बसला आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःला आंतरराष्ट्रीय नैतृत्व म्हणून प्रदर्शन करण्याचा त्यांचा अप्रत्यक्ष हेतू सुद्धा धुळीस मिळाल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
सीबीआय प्रकरण; राज ठाकरेंचं मोदींच्या 'वर्मा'वर बोट: व्यंगचित्र प्रसिद्ध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या देशभर खळबळ माजविणाऱ्या सीबीआय मधील घडामोडींवरून मोदींच्या “वर्मावर” नेमकं बोट ठेवलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर या व्यंगचित्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. आज राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवरून प्रसिद्ध करण्यात आलेलं हे व्यंगचित्र मोदी सरकारच्या सुद्धा “वर्मावर” लागण्याची चिन्ह आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राफेल डील निर्णय प्रक्रियेसंबंधी माहिती केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द
काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राफेल डील प्रकरणी झालेल्या निर्णय प्रक्रियेसंबंधी विस्तृत माहिती बंद लिफाफ्यातून केंद्र सरकारकडून मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेशानुसार आज केंद्राने ती माहिती न्यायालयात सुपूर्द केली आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी सुनिश्चित केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी केवळ मोठ आश्वासने दिली आणि जनमत वाया घालवले
मोदींचा साडेचार वर्षातील कार्यकाळ पाहिल्यास त्यांनी दिलेल्या ढीगभर आश्वासनांवरून सामान्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. आपण सर्वानी मोदींचा एकूणच पंतप्रधानपदाचा कार्यकाळ नीट पाहिल्यास हा काळ अनेक विरोधाभासात्मक कृतींनी व्यापलेला आहे असं जाणवेल. मागील लोकसभा निवडणुकीत जनतेकडून मिळालेले जनमत त्यांनी मोदींनी पूर्णपणे वाया घालवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
एनसीपीचा राजीनामा देऊन तारिक अन्वर पुन्हा काँग्रेसवासी
शरद पवारांचे जुने विश्वासू आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे तारिक अन्वर अखेर यांनी आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसवापसी केली आहे. त्यामुळे बिहारमधील राष्ट्रवादीची ताकद संपुष्टात आली आहे. तारिक अन्वर हे दिल्लीतील राजकारणातले मोठे नेते आणि शरद पवारांचे विश्वासू म्हणून सर्वश्रुत होते. त्यामुळे काँग्रीसला बिहारच्या राजकारणात बळ मिळणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
टेलिकॉम कंपन्यांना ई-केवायसी'साठी आधार कार्डची मागणी बंद करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदेश जरी केले आहेत. त्यानुसार मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी अथवा नवीन सिम कार्ड कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना ई-केवायसी’च्या नावाने ग्राहकाकडे आधार कार्डची मागणी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी हे तसे अधिकृत निर्देश सर्व टेलिकॉम कंपन्यांना जारी केले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सीबीआय प्रकरण; राहुल गांधी सुद्धा आंदोलनात सामील
सध्या देशभर सीबीआय विरुद्ध सीबीआय वाद रंगला सटाणा काँग्रेसने देशभर सीबीआयच्या कार्यालयांवर मोर्चे काढले आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांमधील वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, मोदींनी राफेल घोटाळ्याची चौकशी थांबविण्यासाठी CBI संचालक आलोक वर्मा यांची पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
CBI प्रकरण: सुप्रीम कोर्टाकडून हंगामी संचालकांवरच निर्बंध
सीबीआयमधील २ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादावर आणि केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. दरम्यान, न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी थेट हंगामी सीबीआय संचालक एम. नागेश्वर राव यांच्यावर निर्बंध लादत आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांची चौकशी २ आठवड्यांत पूर्ण करण्याचे थेट आदेश सीव्हीसीला दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अलोक वर्मांकडे राफेल, अर्थ आणि कोळसा खात्या सकट ७ महत्वाच्या फाईल्स होत्या?
सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या सीबीआय संचालकांकडे राफेल, अर्थ आणि कोळसा खात्या सकट ७ महत्वाच्या फाईल्स होत्या अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सात महत्वाच्या फाईल्स अगदी शेवटच्या टप्यात असताना अलोक वर्मांकडून त्यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधकांना या प्रकरणात वेगळाच संशय येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: CBI चे संचालक अलोक वर्मांच्या घराबाहेर पाळत करणारे ४ जण ताब्यात
CBI चे संचालक अलोक वर्मा यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठविलेले असताना काल रात्रीपासून ४ अज्ञात संशयित त्यांच्या घराभोवती वारंवार फिरताना दिसले. वर्मांच्या घरी जनपथवर, दोन गाडीत बसलेल्या चौघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले, गाडीतून खेचून बाहेर काढले आणि दिल्ली पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, ते ४ संशयित आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे कनिष्ठ अधिकारी होते असं समोर आलं आहे. या चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं वर्मा यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचे गंभीर आरोप, आमचं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना वाचवतंय
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी भाजप सरकारवर सीबीआयमधील घटनांवरून गंभीर आरोप केले आहेत. माझं भाजप सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत असून, CBI नंतर पुढची कारवाई ईडी’च्या अधिकाऱ्यांवर होईल, असं भाजप खासदार स्वामी यांनी मत व्यक्त केल्याने भाजप तोंडघशी पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी सीबीआय व रॉ प्रमुखांना स्वतःच्या निवासस्थानी का पाचारण केलं: काँग्रेसला शंका
सीबीआय या देशातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेतील सध्याच्या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जवाबदार आहेत आणि काही दिवसांपासूनची सीबीआय मधील घडामोडी या संशयास्पद आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. दरम्यान, मोदींनी CBI आणि RAW च्या प्रमुखांना आपल्या निवासस्थानी का बोलावले होते? संबंधित चौकशीवर प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न नव्हता का? मोदींनी त्यांना नेमक्या काय सूचना केल्या? असंवैधानिक पद्धतीने तपासात दखल देण्याचा हा प्रकार नव्हे का, असे एक ना अनेक प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भर पत्रकार परिषदेत केली आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार सत्तेत....पण हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी?
मोदी सरकार सत्तेत….पण हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी?
6 वर्षांपूर्वी -
विराट कोहली १०,००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या विक्रमवीरांच्या यादीत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताय टीमचा कर्णधार विराट कोहलीने १०,००० धावांचा पल्ला गाठला आहे. १०,००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये त्याने आज दिमाखात प्रवेश केला आहे. विराटने १०,००० धावांचा टप्पा केवळ २०५ डावांमध्ये ओलांडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सीबीआय संचालक मोदी सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात
सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात CBI चे संचालक आलोक वर्मा यांनी मोदी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने केंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. याचिकेत त्यांनी केंद्र सरकारने आपल्याला पदावरून दूर करताना सर्व नियम आणि कायद्यांना पायदळी तुडवल्याचे म्हटले असून थेट मोदी सरकारला न्यायालयात आवाहन दिले आहे. दरम्यान, त्यांची याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC