महत्वाच्या बातम्या
-
'५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’, मोदींना राष्ट्रवादीचे खोचक प्रश्न
एनसीपीने आपल्या ‘जवाब दो’ मोहिमेअंतर्गत आता थेट पंतप्रधानांना लक्ष्य करत त्यांच्या परदेश वारी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. लवकरच पंतप्रधानांच्या परदेश वारीचे शतक पूर्ण होत असले तरी देशाने त्यातून काय साधले असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना विचारला आहे. युपीएच्या काळात ९ वर्षात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्यांवर ६४२ कोटी रुपये खर्च झाले होते. तर दुसरीकडे मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आज पर्यंत तब्बल १४७४ कोटी रुपये खर्च झाले तरी त्यातून देशाला काय सध्या झालं असा सवाल केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
गोव्यात भाजप काँग्रेसचे आमदार फोडून 'काँग्रेस मुक्त गोवा' नारा देणार?
गोव्यात सध्या राजकीय घडामोडींना जोर आला आहे. विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे; पण त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजप तसेच सत्ताधारी मित्र पक्षांकडून मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली वेगाने वाढल्या आहेत. लवकरात लवकर पर्यायी नेतृत्वाचा शोध पूर्ण करून नव्या मुख्यमंत्र्यांकडे सूत्र सोपविण्याची जय्यत तयारी सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
'अब की बार' सामान्यांच्या खिशावर जास्तच भार; पेट्रोलची नव्वदीकडे
इंधन दरवाढ कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आणि त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सुद्धा महागाईच्या भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ आज सुद्धा कायम आहे. मुंबईत पेट्रोल ११ पैशांनी वाढले आहे. परंतु, डिझेलच्या दरात २४ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ८८.२९ रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर ७९.३५ रुपये मोजावे लागत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
#MeToo : उद्या तसे आरोप मोदींवर सुद्धा होतील : शक्ती कपूर
#MeToo मोहिमेवर सध्या देशभर वादंग निर्माण झालं असताना अभिनेते शक्ती कपूर यांनी वेगळीच शंका या मोहिमेवर उपस्थित केली आहे. त्यांच्या नुसार या प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली या केवळ ब्लॅकमेल करत असल्याची टीका तसेच शंका शक्ती कपूर यांनी व्यक्त केली आहे. उद्या असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा होतील अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस जाहीर
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले करून त्यांना गुजरातबाहेर पळवून लावणाऱ्या आमदार अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये एका १४ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपी बिहारचा असल्याचे समोर येताच उत्तर भारतीयांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आले तसेच त्यांना गुजरात सोडण्याचे आदेश हिंसक जमावाकडून देण्यात आले होते.
6 वर्षांपूर्वी -
दसरा-दिवाळीत महागाई अजून भडकणार, इंधन दरवाढीचा भडका कायम!
इंधन दरवाढ कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आणि त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सुद्धा महागाईच्या भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ आज सुद्धा कायम आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात आज वाढ झालेली नाही. परंतु, डिझेलच्या दरात ९ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ८८.१८ रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर ७९.११ रुपये मोजावे लागत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
#Metoo ची छाया क्रिकेटविश्वावर, BCCI सीईओंवर लैंगिक शोषणाचे आरोप
#Metoo ची छाया क्रिकेटविश्वावर पडली असून बीसीसीआयचे सीईओ जोहरी यांच्यावर आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बीसीसीआयचे सीईओ जोहरी यांच्यावर एका महिला लेखिकेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने जोहरी यांच्याकडे संबंधित महिलेले केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण मागितलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
बिहारी खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांचे पृथ्वी शॉ आणि मनसेच्या नावाने स्टंट?
पृथ्वी शॉ’च्या क्रिकेटमधील जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या मदतीचा मोलाचा वाटा आहे. अगदी प्रथम श्रेणी क्रिकेट पासून ते अंडर- १५ आणि अंडर-१९ क्रिकेट पर्यंत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा पृथ्वी शॉ नेहमीच एका मुंबईकरांसारखा महाराष्ट्रात एकजीव झाला होता तसेच तो आणि त्याच संपूर्ण कुटुंब उत्तम मराठी सुद्धा बोलतात हे सर्वश्रुत आहे. असं सर्व असलं तरी महाराष्ट्राने खेळाकडे आणि खेळाडूंकडे कधीच संकुचित दृष्टिकोनातून पाहिले नाही. अगदी आज त्याची ख्याती जगभरात पोहोचली तरी सर्वांनी पृथी शॉ या नम्र आणि गुणी खेळाडूंकडे केवळ भारतीय क्रिकेटचा उगवता तारा असच पाहिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुजरात; कामावरुन घराकडे निघालेल्या बिहारी तरुणाची अज्ञातांकडून हत्या
गुजरातमध्ये एका बिहारी तरुणाची क्रूर हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक वृत्त आहे. गुजरातच्या गया येथील केडिया गावात अरमजीत नावाचा युवक हा मूळचा बिहारचा राहणारा होता. शुक्रवारी रात्री उशिरा तो कामावरुन घरी परतत असताना, काही अज्ञातांनी अमरजीतवर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याला क्रूरपणे ठार मारले असं समजत.त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून पुन्हा गुजरात मध्ये उत्तर भारतीयांविरोधात हिंसेचे प्रकार सुरु झाल्याचे समजते. तसेच त्याचा मृत्यू हा गुजरातमधील हिंसक आंदोलनचाच भाग असल्याचा थेट आरोप अमरजीतच्या कुटुंबीयांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अक्षय कुमारच्या त्या कृत्याचं काय? ते कोणत्या मोहिमेत मोडतं?
सध्या तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर संपूर्ण चित्रपट श्रुष्टि ढवळून निघाली असताना, नाना पाटेकरांवर १० वर्षांपूर्वीच्या गैरवर्तणुकीच्या आरोपांवर बोट ठेवत अक्षय कुमारने हाऊसफुल ४ मधून तूर्तास लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर सुद्धा आरोप झाल्याने पेच अजूनच वाढला आहे. त्यातील नाना पाटेकर यांच्यावरील आरोप सध्या न्यायालयात गेल्याने थोडं सबुरीने घेणं गरजेचं आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी अक्षय कुमारने केलेली कृत्य स्वीकारावी अशी होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
सबरीमाला मंदिरात जाणाऱ्या महिलांचे तुकडे करा, अभिनेता व भाजप समर्थक तुलसीधरन नायरच वक्तव्य
सबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या आदेशावर नाराजी व्यक्त करत मल्याळम अभिनेत्याने वादग्रस्त विधान केल्याने खळबळ माजली आहे. अभिनेता, तसेच भाजप समर्थक तुलसीधरन नायर यांनी सबरीमाला मंदिरात येणाऱ्या महिलांचे तुकडे केले पाहिजे असे धक्कादायक विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
#MeToo : नाना पाटेकर व साजिद खानवर आरोप झाल्याने ‘हाऊसफुल ४’चे दरवाजे बंद?
अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तणुकीचे जाहीर आरोप झाल्याने त्यांच्यासोबत यापुढे चित्रपटात काम करणार नाही असा निर्णय बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार याने घेतला आहे. त्यामुळे आता #MeToo मोहिमेमुळे झालेल्या आरोप प्रत्यारोपाणानंतर फिल्मी दुनियेतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल करार - राहुल गांधींची पत्रकार परिषद - नवी दिल्ली
राफेल करार – राहुल गांधींची पत्रकार परिषद – नवी दिल्ली
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील उत्तर भारतीयांच्या पलायना सदर्भात पत्रकार परिषद - नवी दिल्ली
गुजरातमधील उत्तर भारतीयांच्या पलायना सदर्भात पत्रकार परिषद – नवी दिल्ली
6 वर्षांपूर्वी -
संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी फ्रान्स दौरा, राहुल गांधींचं प्रश्नचिन्ह?
राफेल लढाऊ विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या न्यूज पोर्टलने केला होता आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
एस-४०० करार : भारताला लवकरच CAATSA निर्बंधांबाबतचा कळेल : डोनाल्ड ट्रम्प
काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट अर्थात CAATSA अंतर्गत अमेरिकेकडून घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारत सरकारला लवकरच माहिती कळेल, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे कालांतराने भारताच्या आर्थिक अडचणी वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.
6 वर्षांपूर्वी -
राफेल करारासाठी दसॉल्टला रिलायन्ससोबत व्यवहाराची अट घालण्यात आली होती? मीडियापार्टचा गौप्यस्फोट
भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल या लढाऊ विमान खरेदी करारावरून फ्रान्सच्या प्रसार माध्यमांकडूनच नवे खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा फ्रान्समधील मीडियापार्ट या नामांकित डिजिटल न्युजने केला होता. दरम्यान, दसॉल्ट एव्हिएशनने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, आम्ही केवळ स्वायत्तमपणे भागीदार म्हणून रिलायन्सची निवड केल्याचे स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेअर बाजारात कोसळला , सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी घसरला
आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमधील घडामोडींमुळे आज भारतीय शेअर बाजारात तीव्र पडसाद उमटले आहेत. सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला आणि काही मिनिटात गुणवणूकदारांचं अरबो रुपयाचं पाणी झालं आहे. त्यात भर म्हणजे भारतीय रुपयाची घसरण सुद्धा सुरुच असून रुपयाने गुरूवारी ऐतिहासिक तळ गाठला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी ते उदाहरण दिलं होत 'त्यांच्या' बटाट्यांच्या स्वप्नांवर, भाजपने केली होती मोड-तोड
राहुल गांधींनी ते उदाहरण दिलं होत ‘त्यांच्या’ बटाट्यांच्या स्वप्नांवर, भाजपने केली होती मोड-तोड
6 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च दणका! राफेल विमान खरेदी प्रक्रियेची पूर्ण माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे मोदी सरकारला आदेश
राफेल विमान करारावरून मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांनी आधीच राफेल करारातील व्यवहाराची माहिती सामान्यांना उघड करावी अशी मागणी केली होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव मोदी सरकारने ती फेटाळली होती. परंतु आता सुप्रीम कोर्टातूनच मोदी सरकारला आदेश गेल्याने केंद्र सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today