महत्वाच्या बातम्या
-
राजीव गांधी बोफोर्सच्या चौकशीला सामोरे गेले, तसे मोदी सरकारने राफेलच्या चौकशीला सामोरे जावे
राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून मोदी सरकारला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या काळातील बोफोर्स तोफांच्या करारातील व्यवहाराची चौकशी व्हावी अशी विरोधी पक्षांची मागणी होती आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सुद्धा बोफोर्सच्या चौकशीला सामोरे गेले होते याची आठवण त्यांनी मोदींच थेट नाव न घेता करून दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला आयात शुल्कावरून 'टेरिफ किंग' असं संबोधलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावरून मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला आहे. आता भारत सरकार अमेरिकेला खूश करण्यासाठीच व्यापार करार करू इच्छितो आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
तनुश्रीच्या आडून दिल्लीश्वरांचा नाना पाटेकर आणि मनसे विरुद्ध सापळा? सविस्तर
झूम वहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर तनुश्रीने पुन्हा प्रसार माध्यमांसमोर नाना पाटेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ज्या भाषेत प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून तरी तिचे बोलविते धनी दुसरेच कोणी असून सर्व काही सिनेमाप्रमाणे स्किप्टेड (ठरवून) असल्याची कुजबुज प्रसार माध्यमांमध्ये रंगली आहे. अगदी ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाचा वाद, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे असा कशाचा कशाला संदर्भहीन विषय तिच्या पत्रकार परिषदेत आला कसा अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपच्या हातून निसटलेल्या पाणी फाऊंडेशन तसेच ‘अक्षय कुमार’ राजकारणाशी त्याचा थेट संबंध जोडला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं : सुमित्रा महाजन
लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर आश्चर्यकारक विधान केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ १० वर्षांसाठी आरक्षण हवं होतं असं थेट विधान त्यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. शिक्षण तसेच नोकरीमध्ये कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकशाहीत थापा मारून निवडणूक जिंकणं हा एक मार्ग बनला आहे: उद्धव ठाकरे
निवडणुकीत थापा मारण्याच्या भाजपच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून तोंडसुख घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष केलं आहे. तसेच निवडणुकांतील आश्वासने पूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी जाहीर केली होती. मात्र निवडणूक आयोगाची ही घोषणा त्यांच्या मागील घोषणांप्रमाणे केवळ पोकळ आश्वासन ठरु नये, अशी टीका करत अप्रत्यक्षरित्या भाजपच्या खोट्या आश्वासनांना उजाळा देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सीएनजीवर मोदी सरकारची वक्रदृष्टी! आता सीएनजी वाहन धारकांचे बुरे दिन
प्रदूषणाला आळा बसावा म्हणून सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिल गेलं. अनेक वाहन धारक ज्याच्या गाड्या सीएनजीवर चालतात म्हणून खुश होते. परंतु त्यांना सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांसारखं महागडं सीएनजी भराव लागणार आहे. मोदी सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रती किलो १.७० रुपयांनी वाढविला असून नोएडामध्ये १.९५ रुपयांनी दर वाढले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
वायुदलाकडून अभिनंदन, HAL च्या अचाट कामांची क्षमता बघा! मग रिलायन्स डिफेन्सला ऑफसेट कंत्राट का दिले?
HAL अर्थात भारतीय संरक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड” कंपनी जीच्या क्षमतेवर समाज माध्यमांवर नकारात्मक गोष्टी फसविण्यास सुरुवात झाली आणि मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक तसेच ऑफसेट नियमांच्या आडून रिलायन्स डिफेन्स लिमिटेड बाबतीत होकारात्मक बातम्या पेरण्यास समाज माध्यमांवर सुरुवात झाली होती.
6 वर्षांपूर्वी -
हायअलर्ट! बायोमेड कंपनीची लस महाराष्ट्र व यूपी'मध्ये वापरल्याने पोलिओचा धोका
भारत पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आला असला तरी बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरसचे अस्तित्त्व असल्याचं निष्पन्न झाल्याने संपूर्ण देशात आणि विशेष करून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात याच बायोमेड कंपनीची लस वापरल्याचे समोर आल्याने या दोन राज्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आधी काँग्रेस आणि आता मोदी सरकारविरोधात अण्णांचं आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलन छेडणार आहेत. लोकपाल तसेच कृषी समस्या या विषयांवर २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती दिवशी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा मोदी सरकारला इशारा दिला आहे. राज्य भाजपच्या अनेक दिग्गज नेते मंडळींनी यावर तोडगा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा, मात्र अण्णांनी माघार घेणार नसल्याचं कळवलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पासवर्ड बदला! फेसबुकवर तब्बल ५ कोटी अकाऊंट हॅक, सर्वाधिक भारतीय अकाउंट
फेसबुकवरील तब्बल पाच कोटी अकाऊंट हॅक झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये सर्वाधिक भारतीय अकाऊंटचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. हॅकर्सनी फेसबुकच्या “View As” या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा नेमका फायदा उचलत फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती स्वतः कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी प्रसिद्ध केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी नावाच्या फुग्यात हवा माध्यमांनी भरली, ती माध्यमांनाच काढावी लागेल
मोदी नावाच्या फुग्यात हवा माध्यमांनी भरली, ती माध्यमांनाच काढावी लागेल
6 वर्षांपूर्वी -
त्या व्हिडिओ ने खळबळ: डेसॉल्टचे अध्यक्ष बोलले, राफेलसाठी एचएएल'सोबत करार जवळपास झाला होता
२५ मार्च २०१५ म्हणजे नरेंद्र मोदींच्या फ्रान्स भेटीच्या (१० एप्रिल २०१५) केवळ १५ दिवस आधी फ्रान्समध्ये मिराज-२००० या लढाऊ विमानांच्या हस्तांतराचा कार्यक्रम फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला होता. डेसॉल्ट एव्हिएशन आयोजित या कार्यक्रमात म्हणजे मोदींनी राफेल बाबत नवीन करार अंमलात आणण्यापूर्वी जे घडलं होत, त्याचे अनेक खुलासे आणि वास्तव समोर आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा व्हिडिओ डेसॉल्ट एव्हिएशनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल’वरीलच आहे. दरम्यान या कार्यक्रमात मिराज-२००० लढाऊ विमानांच्या हस्तांतरानंतर भारत सरकार आणि भारतीय वायू दल पुढच्या नव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या बांधणीत म्हणजे राफेलच्या करारात उतरणार होत. त्यात एचएएल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच नाव जवळपास निश्चित झालं होत, असं या व्हिडिओमधून समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेलवरून क्लीनचिट भोवली? पवारांना धक्का, विश्वासू नेते तारिक अन्वर यांचा राष्ट्रवादीला रामराम
एनसीपीचे राष्ट्रीय सचिव तसेच खासदार तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवारांना जोरदार राजकीय धक्का दिला आहे. लोकसभेतल्या खासदारकीचा सुद्धा त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांनी एका मुलाखतीदरम्यान राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली होती. तसेच नरेंद्र मोदींच्या हेतूवर सुद्धा जनतेला संशय नसल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं होत.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: मोदींच्या भाषणात गरीब, पण आज केवळ ८३१ श्रीमंतांकडे देशाचा २५% जीडीपी गेला: सविस्तर
सरकार बदललं तरी देशातील गरीब श्रीमंतांमधील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बार्कलेज हुरुन रिच लिस्टवरुन देशातील हे वास्तव समोर आलं आहे. मोदींच्या प्रत्येक भाषणात गरीब आणि गरिबी झळकते, परंतु जमिनीवरील वास्तव वेगळंच असल्याचं चित्र आहे. आधीच वाढत्या इंधन दरामुळे विकोपाला गेलेली महागाई आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या सामान्य माणसाची अवस्था फारच कठीण होऊन बसली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाषणात गरीब, पण आज केवळ ८३१ श्रीमंतांकडे देशाचा २५% जीडीपी गेला
भाषणात गरीब, पण आज केवळ ८३१ श्रीमंतांकडे देशाचा २५% जीडीपी गेला
6 वर्षांपूर्वी -
विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही, कलम ४९७ रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा क्रांतिकारी निकाल
देशातील स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान म्हणजे आयपीसी कलम ४९७ वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नाही, महिलेचा सन्मान करणं महत्त्वाचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पेट्रोल दिवाळीत सामान्यांचं महागाईने दिवाळं काढणार, इंधन दर शतकाच्या दिशेने
देशभरात पेट्रोल दर शंभरी गाठण्याची शक्यता आहे. त्यात डिझेलने सुद्धा ८० चा टप्पा ओलांडला आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी १३ पैशांनी महागले आहेत. यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी प्रति लिटर ९०.३५ रुपये आणि डिझेलसाठी प्रति लिटर ७८.८२ रुपये मोजावे लागत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बोफोर्स वेळी माहिती द्या, मग राफेल वेळी थेट चीन-पाकिस्तानची मदत कशी?
बोफोर्स’वेळी माहिती द्या आणि जनतेला समजू देत असा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणारे भाजप नेते, आज राहुल गांधींनी राफेल सौद्यात माहिती जनतेला द्या, असा प्रश्न विचारताच राहुल गांधी थेट चीन-पाकिस्तानची मदत करत असल्याचा कांगावा का करत आहेत?
6 वर्षांपूर्वी -
विद्यमानांना अप्रत्यक्ष 'आर्थिक निरक्षर' संबोधत राज ठाकरेंच्या डॉ. मनमोहन सिंग यांना शुभेच्छा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवरून देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ८६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्या देताना बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीवरून नाव न घेता मोदींना टोला लगावला आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांवर आणि समाज माध्यमांवर या शुभेच्छा चांगल्याच झळकत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या राज्यात १६ टक्के तरुणाई बेरोजगार: एस.डब्लू.आय अहवाल
मागील लोकसभा निवडणुकीत ‘बहुत हुआ रोजगार का इंतजार, अबकी बार मोदी सरकार’ अशा घोषणा देत नरेंद्र मोदी सत्तेत विराजमान झाले खरे, परंतु सध्या देशातील वाढत्या बेरोजगारीचे आकडे वेगळंच सत्य समोर आणत आहेत. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया (SWI) या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशात सध्या १६ टक्के तरुणाई बेरोजगार असल्याच नमूद करण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS