महत्वाच्या बातम्या
-
राफेल विमान करार: अनिल अंबानींच्या कंपनीचं फ्रान्समधूनच गुपित उघड, मोदी सरकार अडचणीत
फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी राफेल विमान करारासंबंधित धक्कादायक खुलासा केला आहे. त्यात अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स डिफेन्स’ या कंपनीचं नाव भारत सरकारनेच सुचवलं होत असा खुलासा केल्याने मोदी सरकारला धक्का बसला आहे. या व्यवहारासंबंधित नेमके हेच आरोप काँग्रेसने केले होते.
6 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार १५०० अंकांनी गडगडला
आज सकाळी शेअर बाजार चांगल्या तेजीत सुरु झाला होता. दरम्यान, सेन्सेक्स अजून वरती जाईल असे प्रथम दर्शनी वाटत असताना दुपारनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दुपारी सेन्सेक्समध्ये तब्बल १५०० अंकांनी घसरण झाली तर निफ्टीमध्ये सुद्धा३५० अंकाची घसरण पाहायला मिळाली.
6 वर्षांपूर्वी -
जम्मू काश्मिरात अपहरण झालेल्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांकडून हत्या, एकाची सुटका
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात ३ एसपीओ’सहित ४ पोलीस बेपत्ता झाल्याचे समोर आलं होत. त्यानंतर दहशतवाद्यांकडूनच या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्रसिद्ध झाली होती. परंतु, आज ४ पैकी ३ पोलीस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुदैवाने दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला सोडून दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
नेटकरी म्हणतात; महाराजांनी खानाला आलिंगन देत त्याचा कोतळा काढलेला, तर मोदींनी शरीफांना आलिंगन देत केक खाल्ला होता
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील एका कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना, लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमीकावा या युद्धकौशल्याशी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: मोहन भागवतांनी ‘कब्रस्तान शमशान’चा उल्लेख करत मोदींना इशारा दिला?
मागील उत्तर प्रदेश निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारादरम्यान “शमशान कब्रस्तान” या शब्दांचा शिस्तबद्ध वापर केला होता. त्या निवडणुकीदरम्यान मोदींनी शमशान कब्रस्तान या शब्द तंत्राचा पुरेपूर उपयोग मतांच्या ध्रुवीकरणासाठी केला होता. दरम्यान, आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शमशान-कब्रस्तान राजकारणावर टिका केली असून, समाजाच्या भल्यासाठी याचा उपयोग नसून ते केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण असल्याचे उद्गार काढले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
नवी दिल्ली - ट्रिपल तलाक अध्यादेशावर पत्रकार परिषद
नवी दिल्ली – ट्रिपल तलाक अध्यादेशावर पत्रकार परिषद
6 वर्षांपूर्वी -
एक दिवसाच्या मोठ्या ब्रेकनंतर पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढले
एक दिवसाच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेल दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या नव्या दरांप्रमाणे मुंबईत पेट्रोल ६ पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९.६० तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८.४२ झाला आहे. ऐन गणेश उत्सवादरम्यान सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुन्हा मार्मिक 'राजअस्त्र' : संघ, संस्कार, लोकशाही आणि वर्गाबाहेरील २ विद्यार्थी : सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर एकामागून एक मार्मिक अस्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा दाखल देत, मोदी आणि अमित शहांच्या एकाधिकारशाहीवर मार्मिक टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नवी दिल्ली - ३ पिशव्यांवर ३२ वेळा झाडू मारली मग मोदींना उमगलं हाताने उचलावी
नवी दिल्ली – ३ पिशव्यांवर ३२ वेळा झाडू मारली मग मोदींना उमगलं हाताने उचलावी
6 वर्षांपूर्वी -
'तिहेरी तलाक'विरोधी अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
यापुढे तिहेरी तलाक घेतल्यास महिलेचा पती गुन्हेगार ठरणार आहे. कारण, तिहेरी तलाकबंदी संदर्भातील अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. त्यात विशेष भर म्हणजे काँग्रेसने विरोध केलेल्या ‘गुन्हेगारी’ या शब्दासह केंद्राने हा अध्यादेश काढला आहे.
6 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेन विरोधात गुजरातच्या शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील महत्वाच्या प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आता गुजरातमधून तीव्र विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाविरोधात हजारो शेतकऱ्यांनी मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपादनाला तीव्र विरोध असल्याचं म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
कार्यक्रम दिव्यांगांचा आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या संवादात 'पाय तोडण्याची' भाषा
पश्चिम बंगालमधील दिव्यांगांच्या कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी एका व्यक्तीसोबत संवादादरम्यान थेट ‘पाय तोडण्याची’ भाषा वापरल्याने सर्वच उपस्थितांना धक्का बसला. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा विवादित भाष्य केल्यामुळे प्रसार माध्यमांनी त्यांना धारेवर धरलं होत.
6 वर्षांपूर्वी -
पेट्रोलचे दर विचारताच भाजप नेत्यांकडून मारहाण
पेट्रोलचे दर विचारताच भाजप नेत्यांकडून मारहाण
6 वर्षांपूर्वी -
खळबळजनक दावा! भारतात आल्यावर मल्ल्याला ताब्यात घ्यायची गरज नाही, ‘आम्हाला गुपचूप कळवा'
इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या गोपनिय कागदपत्रांच्या आधारे हा धक्कादायक खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अटक करू नये, तसेच तो देशात आल्यावर आम्हाला गुपचूप पद्धतीने कळवावे, असे आदेश सीबीआयकडून देण्यात आले होते, असा दावा करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
रुपयाची घसरण व पेट्रोल-डिझेलच्या चढ्या किंमतींमुळे शेअर बाजारात एक लाख कोटींची हानी
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची नव्याने झालेली पडझड तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींचा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मोठा धसका घेतल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या एक लाख कोटींचा चुराडा झाल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
बडोदा, विजया बँक आणि देना बँक या ३ बँकांचे विलीनीकरण होणार
भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित अशा बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक या ३ बँकांचे विलीनीकरण होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. एसबीआय’च्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतरचे बँकींग क्षेत्रातील हे दुसरे महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी रेखाटले स्वतः मध्ये रममाण झालेल्या प्र'सिद्धि विनायका'च व्यंगचित्र, होरपळणारी जनता पोरकी
सध्या देशात महागाईपासून अनेक ज्वलंत विषय पेटले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ स्वतःची प्रसिद्धी करण्यातच व्यस्त असल्याचा धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच प्र’सिद्धिविनायका’च व्यंगचित्र रेखाटलं आहे. देशात अनेक महापुरुष असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये नरेंद्र मोदींवरील चित्रित करण्यात आलेला लघुपट दाखविण्याचे डिजिटल फर्मान सुद्धा सोडण्यात आले होते, त्या मुद्याला सुद्धा राज ठाकरे यांनी हात घातला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशातील भाजपचे ३० आमदार काँग्रेसच्या तिकिटासाठी उत्सुक?
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यात मोठा फटका बसून काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता अनेक सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्यात भाजपला सर्वाधिक फटका हा राजस्थान आणि मध्यप्रदेश बसण्याची शक्यता असल्याने भाजपचे विद्यमान आमदार राजकीय गर्तेत अडकल्याचे चित्र आहे.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात पेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त करून काँग्रेसची मोदींना वाढदिवसाची भेट
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला असून परिणामी महागाईचा भडका उडाला आहे. त्यात वाढत्या महागाईमुळे मोदी सरकार विरोधात जनतेचा रोष वाढत असताना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी २ रुपयांची कपात करून सामान्यांना दिलासा दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सरकारने मला परवानगी दिली तर मी पेट्रोल-डिझेल ३५-४० रुपयांना विकेन
केंद्रातील मोदी सरकारने मला परवानगी दिली तर मी पेट्रोल-डिझल ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो असं धक्कादायक विधान योग गुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. सरकारने जर मला केवळ करामध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत दिली तर मी ते शक्य करू शकतो, असं रामदेव म्हणाले आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News