महत्वाच्या बातम्या
-
‘ट्राय’ अध्यक्षांना ‘नको ती ट्राय’ भोवली, हॅकरने आधार डेटा हॅक करून दाखवला!
ट्राय’चे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी आधार कार्डची माहिती किती सुरक्षित आहे हे देशाला दाखवण्यासाठी थेट आधार क्रमांक हॅक करुन दाखवा असं चॅलेंजच दिलं होतं. त्यासाठी त्यांनी आपला आधार क्रमांक ट्विटरवरुन शेअर केला.
7 वर्षांपूर्वी -
शिमल्यात पावसाच थैमान, जनजीवन विस्कळीत
हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमल्यात काही दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशात २०७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर राजधानी शिमल्यात ४७.७ मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं भाकीत खरं ठरतंय? विकास फसल्याने सेना-भाजपला 'राम मंदिरा'चा आधार? आपलं मत नोंदवा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या भेटी मागे हिंदुत्वाचा मुद्दा आणि भाजपला शह अशी कारणं पुढे केली जात असली तरी वास्तव हे दुसरंच असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. राज्य सरकारमध्ये तसेच केंद्रात १२-१३ मंत्रिपद उपभोगणाऱ्या शिवसेनेची नेहमीच एक बोंब राहिली आहे की, आमच्या मंत्र्यांची तसेच आमदारांची कामं मार्गी लावली जात नाहीत. परंतु नुकतंच सामना’ला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे नेते सत्तेचा अनुभव घेण्यासाठी सत्तेत सामील असल्याचं उत्तर दिल आहे. वास्तविक गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या मंत्र्यांचा कार्यकाळ हा विकासशुन्य असाच म्हणावा लागेल.
7 वर्षांपूर्वी -
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार-मायावतींची भेट
आगामी लोकसभा निवडणुका जशा भाजपसाठी महत्वाच्या आहेत, तशाच त्या विरोधी पक्षांसाठी खूप महत्वाच्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सर्वच पक्ष अनेक राजकीय गणित मांडताना दिसत आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणाचा कल हा भाजप विरोधी होऊ लागला आहे आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि बसपाच्या सर्वेसेवा मायावतींमध्ये जवळपास दीड तास राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
पटेल आरक्षण, गुजरात मेहसाणा येथील हिंसाचार प्रकरणी हार्दिक पटेलला २ वर्षांची शिक्षा
गुजरातमध्ये २०१५ साली झालेल्या पटेल आरक्षण आंदोलनावेळी मेहसाणा येथील हिंसाचार प्रकरणी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला आणि इतर दोघांना विसनगर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप आगामी लोकसभा निवडणूक राम मंदिराच्या जोरावर जिंकण्याच्या विचारत आहे
द्वारकाचे शंकराचार्य जगदगुरु स्वरूपानंद सरस्वती हे वृंदावन येथे एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी त्यांनी मोदीसरकारवर सडकून टीका केली. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मोदींना दिलेल्या झप्पीचे खुलं समर्थन सुद्धा केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाचे कौतुक सुद्धा केले आहे. त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी जगभ्रमंती करणारे आजवरचे सर्वात खर्चिक पंतप्रधान ठरले आहेत
मोदींच्या जगभ्रमंतीवर ४ वर्षात तब्बल १४८४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच त्यांनी ४ वर्षात १७१ दिवस म्हणजे एकूण १२ टक्के वेळ परदेश वास्तव्यात गेला आहे. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सत्ताकाळात म्हणजे एकूण ९ वर्षात परदेशवारीवर केवळ ६४२ कोटी रुपये खर्च झाला होता.
7 वर्षांपूर्वी -
तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, प्रत्येक बूथ प्रमुखाला २३ सूत्री कानमंत्र: अमित शाह
महाराष्ट्र आणि गोव्यातील भाजप पक्ष विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबईमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान अमित शहा यांनी कोणताही सार्वजनिक भाषण न करता पदाधिकाऱ्यांशी वन टू वन असा थेट संवाद साधला.
7 वर्षांपूर्वी -
मनसेच्या अजून एका पाठपुराव्याला यश, सॅनिटरी नॅपकिन्स करमुक्त झाल्याने स्त्रीवर्गाला फायदा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी कौन्सिलने सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेतल्याने समस्त स्त्री वर्गाला त्याचा फायदा होणार आहे. शालिनी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री मुनगंटीवार आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन या करमुक्तीची लेखी सूचना आणि विनंती केली होती, ज्याला आज यश मिळालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
सोयीचं राजकारण? नवाझ शरीफांना अलिंगन तो मास्टर-स्ट्रोक आणि राहुल गांधींच अलिंगन म्हणजे राजकारण?
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलिंगन दिल्याच्या विषयाला अनुसरून ट्विटर द्वारे प्रतिक्रिया नोंदवली आहे. कारण त्या आलिंगनानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर होकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया सर्वच थरातून नोंदवल्या जात आहेत. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आलिंगन दिल खरं, परंतु मोदींनी उभं राहण्याची तसदी घेतलेली पाहायला मिळाली नाही.
7 वर्षांपूर्वी -
जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना व उद्योगपतींना मोठ्या मनाने मिठ्या मारल्या: राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलिंगन दिल्याच्या विषयाला अनुसरून ट्विटर द्वारे प्रतिक्रिया नोंदवली आहे. कारण त्या आलिंगनानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर होकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया सर्वच थरातून नोंदवल्या जात आहेत. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आलिंगन दिल खरं, परंतु मोदींनी उभं राहण्याची तसदी घेतलेली पाहायला मिळाली नाही.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव लोकसभेने फेटाळला
केंद्रात नरेंद्र मोदी सरकारविरोधात टीडीपी’ने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील लढाई मोदी यांनी शुक्रवारी आणि अपेक्षेप्रमाणे सहज जिंकली आहे. मतदानाच्या आकडेवारीनुसार विरोधकांच्या बाजूने १२६ मतं तर सरकारच्या बाजूने एकूण ३२५ मतं पडली आहेत.
7 वर्षांपूर्वी -
लोकसभेत राहुल गांधींनी घेतली नरेंद्र मोदींची गळाभेट
आज केंद्रातील मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेत वेगळंच राजकीय नाट्य अनुभवायला मिळालं. कारण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर तुफान आरोप आणि टीकेच्या फैरी झाडल्या. परंतु, दुसरीकडे ते नरेंद्र मोदी आणि भाजपबद्दल माझ्या मनात जराही द्वेष नसल्याचं सांगत त्यांनी लोकसभेत थेट पंतप्रधान नरेन्द्र मोदींची गळाभेट घेतली आणि एकच चर्चा रंगली.
7 वर्षांपूर्वी -
अविश्वास जिंकणार? की मोदींना विरोधकांमध्ये फूट पाडण्याची संधी? आजच निकाल
आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्यावरून चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमने थेट केंद्रातील सत्तेतून आणि एनडीए’मधून सुद्धा बाहेर पडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आणि त्यांनी थेट मोदी सरकारविरुद्ध विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्नं केला. त्यामुळे आज केंद्र सरकारला अविश्वास ठरावाला तोंड देण्याची वेळ आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्याच्या अस्मितेसाठी टीडीपी'चा मोदी सरकारविरोधात 'अविश्वास' ठराव, तर शिवसेनेचा 'विश्वास'
देशभरातील विरोधक मोदी सरकार विरोधक अविश्वास ठरावा दरम्यान एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले असताना शिवसेनेचा भाजपला विरोध हा केवळ कागदावरच असल्याचं स्पष्ट होताना दिसत आहे. कारण शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला असून विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहाव म्ह्णून पक्षाने विशेष काळजी घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
कॅगचा अहवाल; मोदी सरकारच्या तब्बल १९ खात्यांमध्ये ११७९ कोटींचा घोटाळा
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तब्बल १९ मंत्रालये आणि त्यांच्याशी संलग्नीत विभागाकडून नियम आणि कायद्यांची मोडतोड करून ११७९ कोटींचा घोळ असल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. या अहवालाप्रमाणे विभागाकडून अनियमितपणे पैसे खर्च करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात
नवी दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना आणि विरोधकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. समाजवादी पार्टीने मोदी सरकारला मागासवर्गीय आणि दलितांच्या आरक्षण प्रश्नावरुन धारेवर धरण्याचे ठरवले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या RCEP करारामुळे २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील? राष्ट्रीय किसान महासंघ
थायलंड येथे २१ जुलै रोजी RCEP अर्थात क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अंतर्गत ट्रेड करारावर भारताकडून स्वाक्षऱ्या करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने पियुष गोयल हे लवकरच थायलंडला रवाना होणार आहेत. परंतु या करारामुळे देशातील २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक के. व्ही. बिजू यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपवर दबावासाठी तेव्हा चंद्राबाबुं'सोबत 'फोटोसेशन', आज टीडीपी'ला भेट नाकारली?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट नाकारल्याचे वृत्त आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चंद्राबाबुंचा टीडीपी म्हणजे तेलुगू देसम नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची तयारी आहे. त्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावी या उद्देशाने तेलुगू देसमच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंची भेट मागितली होती.
7 वर्षांपूर्वी -
मंदिर आणि धर्मावर चर्चा करुन देशात रोजगार निर्मिती होणार नाहीये: सॅम पित्रोदा
मला भारताची खरंच चिंता वाटू लागते जेव्हा मी देशात मंदिर, धर्म, जात, देव अशा विषयांवर वादविवाद आणि संघर्ष पाहतो. देशात रोजगार निर्मिती ही कोणत्याही धर्मामुळे नाही तर केवळ विज्ञानच भविष्याची निर्मिती करु शकतं असं ठाम मत भारताच्या मोबाइल क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today