महत्वाच्या बातम्या
-
ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास स्वबळावर लढायच्या विचारामध्ये काँग्रेस?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सध्याच्या एकूणच प्रतिक्रिया पाहिल्यास, ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार असं सांगत महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. दिल्लीत भरलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अनेकांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली आणि जर राष्ट्रवादी महाराष्ट्रात सोबत आली नाही तर काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न उपस्थित केला असता मल्लिकार्जून खरगे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात भाजपकडून पुन्हा आमदार फोडाफोडी? येडियुरप्पा पुन्हा सक्रिय
भाजपकडून कर्नाटकात पुन्हा सत्ताधारी पक्षातील आमदार फोडाफोडी करून सत्ता स्थाणपणेचा दावा केला जाऊ शकतो. जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांच्या भेटीगाठी सुरु झाल्या असून, त्यांना भाजपमध्ये सामील करण्याच्या हालचालींनी कर्नाटकात जोर धरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्विस बँकेतील काळा पैसा बाहेर काढणं दूरच, उलट ५० टक्क्यांनी भारतीयांचा पैसा वाढला
देश विदेशातील काळ्या पैशावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणल्याच्या मोदी सरकारच्या दाव्याला स्विस नॅशनल बॅंकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे मोठा धक्का बसला आहे. कारण त्या अहवालानुसार स्विस बॅंकेत असणारे भारतीयांच्या पैशावर ५० टक्क्यांनी वाढ होऊन ही रक्कम जवळपास ७००० हजार कोटीच्या घरात गेली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सावधान! मोदींच्या गुजरातमध्येच भाजप पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?
गुजरात’मध्ये लवकरच भाजपमध्ये बंड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मोदी आणि अमित शहांना गुजरातमधूनच मोठा राजकीय धक्का बसण्याची स्थित निर्माण झाली आहे असं राजकीय वातावरण आहे. कारण भाजपचे तब्बल २३ आमदार बंडाच्या पवित्र्यात असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘नाणार’ संदर्भात कितीही करार करा, प्रकल्प सुरु होणार नाही म्हणजे नाही: नारायण राणे
नाणार रिफायनरी संदर्भात केंद्र सरकारने नुकताच करार केला असून त्याला प्रतिउत्तर देताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी ‘केंद्राने नाणार संदर्भात कितीही करार करावेत प्रकल्प सुरु होणार नाही’ असा सज्जड दम भरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाचा करार सुद्धा झाला, आता पुन्हा 'मी मंत्रिपद सोडेन'
स्थानिकांचा तीव्र विरोध असताना सुद्धा नाणार प्रकल्प लादण्यात आला आहे. नाणार मध्ये सभा घेऊन ‘मी नाणार संबंधित अध्यादेश रद्द करण्याची घोषणा करतो आहे’ अशी घोषणा करणारे राज्याचे उद्यीगमंत्री सुभाष देसाईंना दिल्लीत पारपडलेल्या घडामोडीं विषयी विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिपद सोडून राजीनामा देईन असा इशारा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान आज मुंबई दौऱ्यावर, आणीबाणीविषयी काय भाष्य करणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले असून ते आज आणीबाणीविषयी काय भाष्य करणार याकडेच प्रसार माध्यमांचं लक्ष आहे. नरेंद्र मोदी आज एशियन इन्फास्ट्रक्चर इन्व्हेसमेंट बॅंकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पीडीपी'च्या सर्व निर्णयात भाजप सुद्धा सोबत होता: मेहबुबा मुफ्ती
भाजपने जम्मू आणि लडाख संदर्भातील केलेले आरोप खोटे असून, जम्मू आणि काश्मीरमधील सरकारच्या सर्व निर्णयात भारतीय जनता पक्ष सुद्धा पीडीपी सोबत होता अशी रोखठोक प्रतिक्रिया जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारताची रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनावर मात
हॉकी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने सलग दुसरा विजय संपादन केला आहे. पहिल्या सामन्यात कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानला ४-० अशी मात दिल्यानंतर आता थेट रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनाला २-१ असा धक्का दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
चाहत्यांना धडे, सोशल मीडियावर नम्रपणे उत्तर द्या
२०१४ मधील भाजपला मिळालेल्या यशानंतर त्यांचे चाहते समाज माध्यमांवर इतके उर्मट झाले की, प्रत्येकाला वेड्यात काढणे हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम सुरु होता. समाजमाध्यमांवर असणारा प्रत्येकजण त्यांना काँग्रेस समर्थक आहे असच एकूण प्रतिक्रिया देताना कल आहे. याचाच दुसरा परिणाम असा झाला की भाजपची समाजमाध्यमांवर प्रतिमा डागाळण्यास ते एक कारण झालं.
7 वर्षांपूर्वी -
खासदारांनो ग्रामीण विकास काय असतो पाहण्यासाठी बारामतीला भेट द्या
खासदारांनो ग्रामीण विकास काय असतो पाहण्यासाठी बारामतीला भेट द्या असं भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू हे शरद पवार यांच्या बारामतीतील विकास कामांची स्तुती करताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा हे राज ठाकरेंचे आरोप खरे ठरले? सविस्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर सभेत भाजपने लादलेली नोटबंदी ही म्हणजे देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या त्या आरोपाला सध्या माहितीच्या अधिकारात बाहेर आलेल्या आकड्यामुळे दुजोरा मिळताना दिसत आहे. कारण भारतात इतक्या सहकारी बँका असताना सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत सर्वाधिक म्हणजे ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नोटाबंदीनंतर अवघ्या ५ दिवसांमध्ये जमा झाल्याच माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नेत्यांना 'खामोश' करणारे शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या वाटेवर?
भाजपचे विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा सध्या भाजपवर प्रचंड नाराज असून ते आगामी निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढविणार असल्याची बातमी असून ते आता भाजपला उघड विरोध करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
नितीश कुमारांची योगाला दांडी की भविष्यात एनडीएला पण दांडी ?
भाजपच्या काल झालेल्या योगदिनाच्या कार्यक्रमाला बिहारमधील मित्र पक्ष असलेल्या जनतादलाचे युनियटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुद्धा दांडी मारल्याने बिहारमध्ये सुद्धा भविष्यातील राजकीय हवेचे उलटे वारे वाहण्याची चर्चा सुरु आहे.
7 वर्षांपूर्वी -
तुम्ही सत्तेत सामील आहात, याची आठवण मतदारच शिवसेनेला २०१९ मध्ये करून देतील? सविस्तर
भारतीय लोकशाहीत सामान्य मतदार हा मतदान करतो ते संबंधित पक्षाने जाहीरपणे दिलेल्या विकास कामांवर आणि विविध आश्वासनांवर विश्वास ठेऊन. त्यानंतर निवडून आलेल्या पक्षाने सत्ता स्थापन करून त्या दिलेल्या आश्वासनांची आणि विकासकामांची पूर्तता करायची असते आणि जनतेने देशावर व राज्याच्या विकासाठी सोपविलेली ५ वर्षांची जवाबदारी खर्ची घालायची असते.
7 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून तरुणांना दगडफेकीची नोकरी
उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना नोकरीचे अमिश दाखवून अतिरेक्यांकडून जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून दगडफेकीचं काम दिल्याचा खुलासा या तरुणांनी केला आहे. त्यावरून जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणारे युवक हे भाड्याने आणलेली माणसं असल्याचं समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना गप्प, गुजरातचा महाराष्ट्राला तापी खोऱ्यातील हक्काचे पाणी देण्यास नकार
गुजरात राज्याने पार-तापी नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे तापी खोऱ्यातील ४३४ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्र पाठवून गुजरातने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी द्यावे अशी विनंती केली होती. परंतु गुजरात सरकारने स्पष्ट नकार देत महाराष्ट्र सरकारची विनंती धुडकावून लावत मुख्यमंत्र्यांच्या विनंती पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जनतेने इंदिरा गांधींना धडा शिकवला होता, तसा मोदींनाही धडा शिकवेल: पवार
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आणीबाणीच्या काळातील इंदिरा गांधींचा दाखला देत हे वक्तव्य केलं.
7 वर्षांपूर्वी -
अखेर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळले आणि विरोधी पक्षाने सुद्धा सरकार स्थापन करण्यात रस न दाखविल्याने अखेर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर, भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढला, सत्तेतून बाहेर
जम्मू काश्मीरमध्ये सत्तेतून बाहेर पडून भाजपने पीडीपीला धक्का दिला आहे. पीडीपी बरोबर सत्तेत राहण्यामागे जो हेतू तो साध्य न झाल्याचे कारण देत भाजपने पाठिंबा काढला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News