महत्वाच्या बातम्या
-
जवानांना स्वतःच्या खिशातून गणवेश व इतर साहित्य घ्यावे लागणार
केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या अतिरिक्त निधीसाठी नकार दिल्याने लष्कराला त्यांच्या अनेक खर्चात कपात करावी लागणार असून अगदी गणवेश आणि इतर साहित्य सुद्धा जवानांना स्वखर्चातून घ्यावं लागणार आहे. परंतु यावरून केंद्र सरकारची उदासीनता समोर आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अमृत फार्माचे तरुण संचालक शैलेश जोशींची आत्महत्या
अमृत फार्माचे तरुण संचालक शैलेश जोशींनी राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून काल रात्री आत्महत्या केली आहे. वय वर्ष चाळीस असताना एका तरुण तडफदार उद्योजकाने आत्महत्या केल्याने उद्योग जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
आरएसएस व भाजप मोदींना पर्याय शोधण्याच्या तयारीत ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आणि भाजपकडून नरेंद्र मोदींना पर्याय शोधण्याचं काम सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केला असून मोदींना पर्याय म्हणून भाजपमध्ये सध्या नितीन गडकरी, राजनाथ सिंग आणि सुषमा स्वराज यांची नावं आघाडीवर असल्याचे केतकर म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
राजकारणातील सर्वात मोठं बंड महाराष्ट्रात होईल: शरद यादव
संपूर्ण देशभरात भाजपविरोधात सर्वच पक्षांमध्ये रोष वाढतच आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष शिवसेना भाजपवर प्रचंड नाराज आहे त्यामुळे आगामी काळात राजकारणातील सर्वात मोठं बंड हे महाराष्ट्रात होईल असं सूचक विधान जेडीयूचे शरद यादव यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
...नाहीतर सेनेला लोकसभेत मोठा फटका बसेल ?
आगामी निवडणुकीत शिवसेनेची भाजपसोबत आघाडी न झाल्यास शिवसेनेच्या निम्यापेक्षा अधिक जागा कमी होऊन त्यांना जेमतेम ९ जागा मिळतील अशी भीती शिवसेनेतीलच एक वरिष्ठ गटाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्ष नैतृत्वाने युतीचा फेरविचार करावा अशी भूमिका घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! समाज माध्यमांवरील तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर सरकारची नजर ?
ज्या समाज माध्यमांचा २०१४ मध्ये सरकार स्थापन होण्यात महत्वाचा वाटा होता ते आज त्यांच्यावरच पलटू लागल्याने अखेर केंद्र सरकार यापुढे सर्व सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका खाजगी कंपनीला तशा प्रकारचे सॉफ्टवेअर देवून तुमची सर्व माहिती आणि तुमच्या समाज माध्यमांवरील हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या राजवटीतली महागाई थांबता थांबेना, सामान्य हैराण
सर्वच शहरांमध्ये रोजच्या जीवनाश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले असून त्यात भाजीपाल्यासारख्या वस्तू महागण्याची शक्यता. आधीच कालपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या संपानंतर आता संपूर्ण देशातील शेतकरी संपावर गेल्याने दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
युपीमध्ये भाजपचे 'बुरे-दिन' आल्याचं आकडेवारी सांगते ?
केंद्रात कोण सत्तेत बसणार हे उत्तर प्रदेशातील आकड्यावर बऱ्यापैकी अवलंबून असत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. २०१४ मधील निवडणुकीचा निकाल लक्षात घेतल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे ७१ जागा असं अभूतपूर्व यश मिळालं होत. परंतु मागील पोटनिवडणुकीची आकडेवारी म्हणजे गोरखपूर आणि फुलपूर आणि त्यानंतर कालच्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत आरएलडी’ने भाजपला अक्षरशः धूळ चारली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जनता गॅस वर, अनुदानित-विनाअनुदानित सिलेंडरचे दर वाढले
आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा भडका उडाला असताना आता अनुदानित व विनाअनुदानित सिलेंडरचे दर वाढले आहेत. देशभरातील ८१ टक्के कुटुंबं हे सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे या सिलेंडर दरवाढीचा फटका देशातील कोट्यवधी लोकांना बसणार आहे. अनुदानित सिलेंडरचा दर ४८ रुपयांनी, तर विनाअनुदानित सिलेंडरचा दर २ रुपये ३४ पैसे असा वधारला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना वगळता सर्वच विरोधकांनी भाजपला धूळ चारली
देशभरात पार पडलेल्या मतं मोजणीतून जे निकाल हाती आले आहेत, त्यामध्ये शिवसेना वगळता सर्वच पक्षांनी भाजपला पोटनिवडणुकीत मात दिली आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्तेत राहून भाजपला केलेला विरोध आणि निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्याच पंगतीला जाऊन बसण्याची रणनीती मतदाराच्या पचनी पडत नसल्याने, पुढील निवडणूका शिवसेनेला कठीण जाऊ शकतात.
7 वर्षांपूर्वी -
भंडारा-गोंदिया मध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धोबीपछाड
भंडारा-गोंदिया मतमोजणीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. परंतु अखेर राष्ट्रवादीने भाजपला या लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजप उमेदवारावर विजय संपादन केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
यूपीत मोदी व योगींना नाकारलं, आरएलडी व सपाकडून भाजपचा पराभव
उत्तर प्रदेशातील कैरना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला धोबीपछाड करत आरएलडीने विजय संपादित करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चांगलाच धक्का दिला आहे. आधीच गोरखपूर आणि फुलपूर निवडणुकीतील पराभवानंतर योगी आदित्यनाथ आणि भाजपवर प्रचंड दबाव होता. अखेर २०१९ मधील निवडणुकीपूर्वी भाजपला अजून एक जोरदार धक्का उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत बसला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदींची मैत्री नितीश कुमारांना भोवली? आरजेडी विजयी
मोदींशी वाढती जवळीक नितीश कुमारांना महागात पडताना दिसत आहे. कारण जोकिहाट विधानसभेच्या जागेवर नितीश कुमारांचा पक्ष जनता दल युनायटेडचे उमेदवार मुर्शिद आलम यांना आरजेडीचे उमेदवार शहनवाज़ आलम यांनी तब्बल ४१,२२४ मतांनी पराभवाची धूळ चारली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पालघर निवडणुकीत जनतेने शिवसेनेला नाकारलं
पालघर निवडणुकीची मतमोजणीची चुरस ही भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच होती असं एकूण मतमोजणीच चित्र होत. पाहल्या ३-४ फेऱ्यामध्ये शिवसेना थेट तिसऱ्या स्थानी होती. परंतु एकूणच मतदानाचा कौल पाहिल्यास शिवसेना जरी जिंकण्याचा दावा करत होती तरी भाहुजन विकास आघाडीने घेतलेली मतं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. भाजप फेरीपासूनच अग्रस्थनी होती.
7 वर्षांपूर्वी -
आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळून बालिकेचा मृत्यू
आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळून बालिकेचा मृत्यू
7 वर्षांपूर्वी -
भाजप नेते बरगळले, शेतकरी चोर आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे
भाजप नेते बरगळले, शेतकरी चोर आहेत, त्यांना चपलेने मारलं पाहिजे
7 वर्षांपूर्वी -
पालघर, भंडारा-गोंदिया निवडणुक मतदान, व्हीव्हीपॅट मशीन गुजरातमधून
आज पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. संपूर्ण निवडणूक यंत्रणा सुसज्ज झाली असून या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. हे व्हीव्हीपॅट मशीन गुजरातमधील सुरत व बडोदा येथून आणण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणुकीत प्रादेशिक पक्षच किंगमेकर: चंद्राबाबू
आज टीडीपीच्या वार्षिक संमेलनाचे उद्धाटन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना चंद्राबाबूंनी भाजपवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवत चंद्राबाबू म्हणाले की, २०१९ मधील निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे.
7 वर्षांपूर्वी -
देशपातळीवर भाजपविरोधी आघाडीत शिवसेना नाही: सिंघवी
देशातील मोदी सरकारला सत्तेत येऊन ४ वर्ष पूर्ण होत असताना मोदीसरकार म्हणजे लोकांना केवळ आश्वासनांची खैरात करत ‘मेरा भाषण ही मेरा शासन’ असा थेट संदेश नरेंद्र मोदींनी देशाला दिला आहे. मोदीसरकारची ४ वर्ष म्हणजे केवळ जुमलेबाजी करतच स्वतःचे कौतुक करण्यावर भर असल्याची टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. त्यांनी आज मुंबई कॉंग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
7 वर्षांपूर्वी -
देशातील हुकूमशाही ७-८ महिन्यांत संपेल: राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटं बोलून देशातील सामान्य जनतेला फसवत आहेत, परंतु लोक हे आता खपवून घेणार नाहीत अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. सध्या राज ठाकरे के कोंकण दौऱ्यावर असून ते रत्नागिरी दाखल झाले असून त्यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 58 टक्केपर्यंत परतावा - NSE: ADANIENT
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL