महत्वाच्या बातम्या
-
सेना 'एनडीए'त राहायचं की नाही हा निर्णय घेण्यास स्वतंत्र: अमित शहा
शिवसेना ‘एनडीए’त राहायचं की नाही तो निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्यास तयार आहे असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लखनऊ मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
गुजरात भाजपमध्ये होणार राजकीय भूकंप ही अफवा: नितीन पटेल
गुजरात भाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची बातमी समाज माध्यमांवर पसरत होती. परंतु स्वतः उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी ट्विट करत ती अफवा असल्याचे म्हटलं आहे. गेले २-३ दिवस ही बातमी समाज माध्यमांवर पसरत होती. काय होती ती बातमी ते सविस्तर वाचा.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक, भाजप अध्यक्षपदाच्या अखेरच्या डावातही तोंडघशी
कर्नाटक निवडणुकीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उतरली खरी पण इथे सुद्धा काही क्षणातच तोंडघशी पडली आहे. भाजपकडून अध्यक्षपदाच्या शर्यतीत एस. सुरेश कुमार यांना उतरवलं खरं, परंतु निवडून येण्यासाठी आवश्यक असणार संख्याबळच नसल्याने अखेर एस. सुरेश कुमार यांनी माघार घेतली आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले.
7 वर्षांपूर्वी -
पेट्रोल - डिझेल दर वाढीवर काँग्रेसच्या काळातील भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया
२०१४ पूर्वी काँग्रेसच्या काळात भाजप विरोधी पक्षात असताना त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर वाढीवर दिलेल्या प्रतिक्रिया आणि सद्यस्थितीत सत्तेत असताना त्यांचे बदलेले सूर. किती हा विरोधाभास.
7 वर्षांपूर्वी -
राज्यात युती झाल्यास शिवसेनेला मोठं नुकसान
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर भाजपला फायदा होऊन सेनेच्या मतांच्या टक्केवारीत प्रचंड घट होऊ शकत असा अंदाज सर्व्हेमधून वर्तविण्यात आला असून सेनेच्या मतांची गतवेळची टक्केवारी २४ वरून थेट १९ टक्क्यांवर म्हणजे ५ टक्क्यांनी घसरू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर भाजपला फायदा होताना दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
सोईसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार: केंद्र
आज नवी दिल्लीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काही तरी निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काहीच निर्णय घेतला नसून उलट सोईसुविधांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ होतच राहणार असं अप्रत्यक्ष सूचित केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
कुमारस्वामींनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
जेडीएसचे नेते एच. डी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी एच. डी कुमारस्वामी यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. तर काँग्रेसचे जी. परमेश्वर यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
7 वर्षांपूर्वी -
कॅशलेस इंडिया फसलं, रोकड वापरात ७% वाढ: आरबीआय
मोदी सरकारने देशात रोकडरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचालीला चालना देण्यासाठी २०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात नोटबंदी केली खरी, पण नुकत्याच भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात समोर आकडेवारीने हे सिद्ध होत आहे की मोदी सरकारची नोटाबंदी सपशेल अपयशी ठरली आहे. आरबीआयच्या आकडेवारी नुसार नोव्हेंबर २०१६ च्या सुरवातीला १७ लाख कोटी रुपये मूल्याची रोकड जनतेच्या हाती होती. तर चालू वर्षांच्या एप्रिलअखेर तिचे प्रमाण हे १८.२५ लाख कोटी रुपयांच्या घरात गेले आहे.
7 वर्षांपूर्वी -
अक्षयने ट्विटर वरून भाजपच्या अडचणी 'डिलीट' केल्या
अक्षय कुमारने त्याची २०१२ मधील एक ट्विट डिलीट केल्याने त्याला नेटिझन्सने चांगलेच धारेवर धरले आहे. कारण २७ फेब्रुवारी २०१२ मधील त्या ट्विट मध्ये अक्षय कुमारने कॉग्रेसच्या काळातील वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर केलं होतं. सध्या मोदी सरकार असताना देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला असताना नेटिझन्सने अक्षय कुमारला चांगलाच धारेवर धरलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
लोकशाही धोक्यात, दिल्लीचे आर्चबिशप यांचं चर्च धर्मगुरुंना पत्र
देशातील लोकशाही धोक्यात आल्याचं नमूद करत दिल्लीचे आर्चबिशप अनिल कोटो यांनी देशभरातील सर्व चर्चच्या धर्मगुरुंना पत्र लिहून संदेश दिला आहे. त्यातून अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदीं सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आल्याच बोललं जात आहे. एकूणच वर्षभरावर लोकसभा निवडणूका येऊन ठेपल्याने आणि त्यात जर सर्व कॅथलिक समाजाचा रोष व्यक्त झाला तर भाजपला निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचा लोकसभेत बहुमताचा आकडा घसरला
लोकसभेतील भाजपच्या खासदारांची संख्या थेट २७२ वर येऊन ठेपली आहे. २०१४ मधील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजप २८२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. परंतु हे संख्याबळ घटून थेट २७२ वर आलं आहे. त्यामुळे जय मोदी सरकारवर जर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर भाजपकडे खासदारांचं पुरेसं संख्याबळ नसल्याचे समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
कुमारस्वामींच्या शपथविधीला जाणार शरद पवार
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा बुधवारी होणार असून त्यासाठी विरोधकांची एकजूट पाहावयास मिळत आहे. कुमारस्वामींच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा हजेरी लावणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने आता तेलंगणावर लक्ष वळवले
दक्षिणेत पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सत्तास्थापनेला अपयश आल्याने आता भाजपने आता दक्षिणेतील दुसरं राज्य तेलंगणावर लक्ष केंद्रित केलं आहे. तेलंगणा विधानसभेत एकूण १२० जागा असून सध्या भाजपचं तेथे एकूण संख्याबळ केवळ ५ आमदार इतकंच आहे. परंतु तेलंगणात परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर गुजरात मॉडेल अंमलात आणण्याचा विचार आहे.
7 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने नागरिक हैराण
देशभरात पुन्हां पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा दरवाढ झाली असल्याने वाहनमालक पुरते हैराण झाले आहेत. देशभरात पेट्रोलचा दर ३३ पैशाने तर डिझेलचा दर २६ पैशाने वाढला आहे. वाढलेल्या दराप्रमाणे पेट्रोलचा नवीन दर ८४.०७ रुपये प्रति लिटर एवढा झाला आहे. पेट्रोल – डिझेलच्या विक्रमी दरवाढीने हा आजवरचा सर्वात मोठा उच्चांक ठरला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुढची ५ वर्षे आपणच मुख्यमंत्री: कुमारस्वामी
मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ वाटून घेण्याबाबत काँग्रेस बरोबर कोणताही समझोता झाला नसून संपूर्ण कार्यकाळ आपणच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचे कुमारस्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केला आहे. काही दिवस मुख्यमंत्री पदाबाबत ३०-३० महिने हे पद वाटून घेण्याचा दोन्ही पक्षात समझोता झाल्याच्या बातम्या येत असल्याने कुमारस्वामीना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
तर शिवसेनेच्या भविष्यात अडचणी वाढतील
२०१९ मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना डॉ. मनमोहन सिंग हेच टक्कर देऊ शकतात. कारण राहुल गांधी यांना अजून बरंच राजकीय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राहुल गांधी गांधी हे मोदींना टक्कर देऊ शकणार नाहीत असं परखड मत व्यक्त केलं आहे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी. तर दुसरीकडे शिवसेनेने जर निर्णय वेळीच घेतला नाही तर त्यांच्यासमोर भविष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या शपथेची घाई करायला नको होती - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी येडियुरप्पा यांच्या अडीच दिवसाच्या कार्यकाळावर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या माते भाजपने सत्ता स्थापनेची घाई करायला नको होती, उलटअर्थी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून सय्यम ठेवला होता.
7 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा!
अडीच दिवसाचे मुख्यमंत्री राहून त्यांनी अखेर राजीनामा दिला आणि या संपूर्ण नाट्यमय घडामोडींवर पडदा पाडला आणि काँग्रेस – जेडीएसला सत्ता स्थापनेचे आव्हान केले. तरीही जर कर्नाटकात मध्यवर्ती निवडणूका लागल्या तर भाजप संपूर्ण बहुमताचे सरकार निवडून आणेल हा विश्वास व्यक्त केला.
7 वर्षांपूर्वी -
...तर १०० पटीने श्रीमंत व्हाल आणि मंत्रिपद सुद्धा मिळेल - ऑडिओ क्लिप
आम्हाला सांगा तुम्हाला कुठला पद हवं आहे? आपण समोर-समोर बसून बोलू आणि ठरवू. जर तुम्ही ऑफर स्वीकारली तर तुम्ही मंत्री बानू शकता आणि मोठ्या लोकांबरोबर तुमची उठबस होऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचा १ तर काँग्रेस-जेडीएसचे ४ आमदार गायब ?
कर्नाटकात भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी काही तासच उरले असताना १ नवीनच धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे ४ आमदार तर भाजपचा १ आमदार चक्क गायब झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 58 टक्केपर्यंत परतावा - NSE: ADANIENT
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या