महत्वाच्या बातम्या
-
TET Scam | टीईटी परीक्षा घोटाळा, शिंदे गटातील मंत्र्यांचं पितळ उघडं पडलं, सत्तारांच्या मुलींची नावं शासकीय वेबसाइटवर
TET Scam | टीईटी परीक्षा घोटाळ्यात माझ्या मुलींचा काहीही संबंध नसून कुणीतरी त्यात ही नावं घुसडल्याचा आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार सतत्याने सांगत आहेत. पण परिक्षा परिषदेच्या महाटीईटी या शासकीय वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या यादीतच सत्तारांच्या मुलींची नावं आढळून आल्याने सगळंच पितळ उघडं पडलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | या गावातील हॅन्डपंपामधून पाण्यासोबत आग बाहेर पडते आहे, ग्रामस्थ धास्तावले, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | आपण हातपंपातून पाणी बाहेर पडताना पाहिले असेल, आता त्यात नवीन काय आहे याचा विचार कराल कारण पाणी नसेल तर हातपंपातून काय बाहेर येईल. असंच वाटत असेल तर पाहा आजचा हा व्हिडिओ ज्यात हातपंपातून पाणी तसंच आगही बाहेर पडत आहे. त्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे, पण ते खरं आहे. हातपंपातून आधी पाणी बाहेर आले, नंतर आग आटोक्यात आली आणि मग पाणी आणि आग दोन्ही मिळून बाहेर येऊ लागले.
3 वर्षांपूर्वी -
मराठा क्रांती मोर्चाबाबत संभाजीराजेंच्या 'राजकीय' भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित, संभाजीराजेंविरोधात मराठा समन्वयक आक्रमक
Maratha Kranti Morcha | राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितले. यादरम्यान मराठा आरक्षणासाठी लढा देणारे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे आभार मानले आहेत. आपल्या लढ्याला यश आल्याचेही राजेंनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | आधुनिक युपीचा फिल्मी विकास, शासकीय रुग्णालयाच्या मजल्यावर म्हशीचा मुक्त संचार, रुग्णांची पळापळ, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | यूपीच्या संभलमधल्या सरकारी हॉस्पिटलच्या इमारतीत ती शिरली तेव्हा रुग्णांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत पळापळ झाली. म्हशीची धावपळ सुरू झाली, तेव्हा रुग्णांसोबत डॉक्टरही धावताना दिसले. गोंधळ घालणारी म्हैस हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. तासनतास मेहनत करून लोकांनी कशीबशी म्हशीला दोरीने बांधून खाली उतरवून हॉस्पिटलबाहेर काढले. म्हशीने इमारतीत प्रवेश केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
केंद्रात अत्यंत ‘दुष्ट’ सरकार बसलंय, ही लोकं सत्तेतून गेल्यावरच देशाचं आणि राज्याचं भलं होईल | मुख्यमंत्री केसीआर गरजले
Telangana CM KCR | तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) हे सतत भाजप आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवत असतात. या प्रकरणी त्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केसीआर यांनी आपल्या सभेत केंद्र सरकार फक्त फोडाफोडीचं राजकारण खेळत असल्याचा आणि देशभरातील बिगर-भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर केंद्रातील सत्ताधाऱ्यांना त्यांनी ‘दुष्ट’ म्हटले आणि या लोकांच्या जाण्यानंतरच देशाला व राज्याचं भलं होईल, असे सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
Supreme Court on Pegasus | पेगाससच्या चौकशीत केंद्र सरकारने सहकार्य केलं नाही, सुप्रीम कोर्टाची धक्कादायक टिपणी
इस्राईल कंपनीचे स्पाय सॉफ्टवेअर पेगासस भारतात वापरल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या तांत्रिक समितीला केंद्र सरकारने सहकार्य केले नाही. पेगासस स्नूपिंग प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात सरन्यायाधीश (सीजेआय) एन.व्ही.रमणा यांनी मोदी सरकारच्या भूमिकेवर हे गंभीर भाष्य केले आहे. विरोधी पक्षनेते, पत्रकार आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या मोबाइल फोनमध्ये गुप्तचर पद्धतीने पेगॅसस हेरगिरीचे सॉफ्टवेअर टाकल्याच्या आरोपाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | बिहारमध्ये दिसला हा विचित्र प्राणी, वनविभागाचे अधिकारीही आश्चर्यचकित, व्हिडिओ प्रचंड व्हायरल
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक अजब प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील भगवानपूर चौकाजवळील एका दुकानात एक विचित्र प्राणी आढळून आला आहे. हा प्राणी आज पूर्वी इथे कोणी पाहिला नव्हता. बुधवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर दिवसाढवळ्या आढळून आलेल्या या प्राण्याने मंगळवारी रात्री उशिरा एका दुकानात प्रवेश केला. या प्राण्याविषयीच्या चर्चा परिसरात तीव्र आहेत. अफवा आणि शंकाही पसरत आहेत. या प्राण्याला पाहण्यासाठी परिसरात गर्दी होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील निवडणुकीपूर्वी इन्कमटॅक्स विभाग कामाला लागला? | सुरतेहून परत येणाऱ्या शिवसेना आमदाराच्या नातेवाईकांच्या घरी धाडी
Income Tax Raided | गुरुवारी पहाटेपासून सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि साखर कारखानदारांच्या व्यवसायावर इनकम टॅक्स विभागाच्या धाडी सुरु आहेत.पंढरपूर मधील साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या उस्मानाबाद येथील साखर करण्यासह पंढरपूर येथील ऑफिस व घरी इन्कम टॅक्स पुणे विभागाचे अधिकारी दाखल झाले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. पहाटेपासून ही कारवाई सुरु आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | ती पिस्तूल दाखवून स्टंट व्हिडिओ बनवत होती, डोक्याजवळ बुलेट फायर झाली, हादरवून टाकणारा व्हिडिओ व्हायरल
Viral Video | आजच्या तरुणाईमध्ये लाइक्स मिळवण्याची इतकी क्रेझ आहे की, त्यासाठी ते जोवघेणे प्रकार करतात. सोशल मीडियावर कूल ड्यूड बनण्यासाठी लोक काहीही करत असतात. मात्र, अशा लोकांच्या डोक्यात इतकी जास्त हवा जाते की कधी कधी ते स्वतःच स्वतःच्या जीवाशी खेळून जातात. आणि असा भीषण प्रकार घडतो की त्याची कल्पनाही करता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका खतरनाक आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर स्तब्ध व्हाल.
3 वर्षांपूर्वी -
एनआयएच्या अटकेतील वाझे आणि प्रदीप शर्मा जुने मित्र | प्रदीप शर्माच्या सेनेतील प्रवेशात शिंदेंचा पुढाकार, शिंदे समर्थकांचे अज्ञान?
आज सत्ताधाऱ्यांकडूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या 50 खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना सचिन ओझेचे खोक मातोश्री ओके अशी टीका करत अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणी ठाकरे घराण्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जे पोस्टर धरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती, त्या पोस्टरवर आदित्य ठाकरेंचा फोटो लावल्याने आदित्य ठाकरेंनाही डिवचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देण्यात असलेल्या घोषणेबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
32 वर्षीय आदित्य ठाकरेंना जनतेचा राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळतोय | शिंदे गटातील सर्व 40 आमदार लक्ष करण्यासाठी एकवटले
Aaditya Thackeray | शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावरूनच पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदार त्यांच्याविरुद्ध ५० खोके एकदम ओके, ताट-वाटी चलो गुवाहाटी, ५० खोके खाऊन खाऊन माजलेत बोके, अशी घोषणाबाजी केली जातेय. त्यातूनच बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा झाला.
3 वर्षांपूर्वी -
आम्ही लोकसभेच्या 40 पैकी 40 जागा जिंकणार, त्यामुळेच भाजपचे 3 जावई CBI, ED आणि IT धावून आले - तेजस्वी यादव
केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जेव्हा भाजपला राज्यात भीती वाटते किंवा तोटा होतो, तेव्हा ते सीबीआय, ईडी आणि आयटी या तीन जावयांना पुढे करतात. मी परदेशात गेल्यावर भाजप माझ्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करते. नीरव मोदीसारखे फसवेगिरी करणारे पळून जातात, तेव्हा ते काहीच करत नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
तेजस्वी यादव यांची धडाकेबाज प्रतिक्रिया | त्यांना जे करायचे आहे ते करू दे, लवकरच सौ सुनार की एक लोहार की
Bihar Political Crisis | बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेत्यांच्या घरांवर सुरू असलेल्या सीबीआयच्या छाप्यांवर मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेतून बाहेर आल्यानंतर बुधवारी ते म्हणाले की, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, थोडा धीर धरा. आम्ही सुद्धा सौ सुनार का एक लोहार की! लवकरच करू. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारची बुधवारी दुपारी विधानसभेत फ्लोर टेस्ट होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
एकीकडे शेतकरी, मराठा तरुणांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न | दुसरीकडे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे समर्थकांनी भाईगिरी
महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचे विषय बोलायचे सोडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांविरोधात भिडल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र विषय भरकटवण्याचा हा सत्ताधाऱ्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केली आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Work From Home | वर्क फ्रॉम होमसाठी सरकारने लागू केले नवे नियम, कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा जाणून घ्या
कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होमची संस्कृती सुरू झाली. भारतातही सरकारी आणि खासगी संस्थांतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ घरूनच काम केले. आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने वर्क फ्रॉम होमचे नवे नियम लागू केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत सिद्ध करण्यासाठी आज बिहार विधानसभेचं विशेष अधिवेशन | सर्व आमदार निवांत आणि ईडी, सीबीआय आक्रमक
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आज म्हणजे बुधवारी, २४ ऑगस्टला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या आपल्या सरकारचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीतून आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आज विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत महाआघाडीला 164 आमदारांचा पाठिंबा आहे.
3 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये भाजपाची सत्ता जाताच ईडी, सीबीआयचा पारा चढला? | निमलष्करी दल घेऊन विरोधक आमदार, खासदारांच्या घरी धाडसत्र
बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारच्या फ्लोअर टेस्टपूर्वी सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे खासदार अशफाक करीम आणि एमएलसी सुनील सिंह यांच्या घरावर छापे टाकले आहेत. बुधवारी सकाळी सीबीआयचं पथक अशफाक करीम आणि सुनील सिंग यांच्या घरांवर छापा टाकण्यासाठी पटना इथं दाखल झालं. कथित लँड फॉर जॉब घोटाळ्यात हा छापा टाकण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. सुनील सिंह हे राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आहेत. जाणून घेऊयात नितीश सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या कृपेमुळे रॉयल 'मर्सिडीज' लाईफ जगणाऱ्या पिता-पुत्राची राजकीय स्वार्थाने आदित्य ठाकरेंवर मर्सिडीज वरून टीका
MP Shrikant Shinde | आमदारांच्या बंडानंतर पक्ष मजबुतीकरणासाठी आमदार आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, विरोधकांकडून त्यांच्यावर खोचक टीका केली जात आहे. आता तर खासदार तथा एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर आदित्य ठाकरेंच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्ष वाढवण्यासाठी रिक्षावाले, पान टपरीवालेच लागतात मर्सिडीज मधून पक्ष वाढत नाही असा टोला त्यांनी ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर लगावला आहे. आतापर्यंत श्रीकांत शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेले नव्हते. पण आता दोन्ही गटातील अंतर वाढत असून आरोप-प्रत्यारोप हे वाढत आहेत. पक्ष संघटनेसाठी आदित्य ठाकरे यांचे प्रयत्न निष्फळ असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिंदे गटाच्या सरकारचं काय चाललंय?, मंत्रालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तर मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता सुद्धा त्याच प्रयत्नात
VIDEO | शिंदे-फडणवीस सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशन सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मंत्रालयाच्या छतावर चढले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या छतावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. युवराज चौहान असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.
3 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय | बेनामी संपत्ती प्रकरणात दोषी ठरल्यावर सुद्धा तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही
बेनामी कायदा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेनामी व्यवहार (प्रतिबंध) दुरुस्ती कायद्यातील कलम ३ (२) घटनाबाह्य ठरवले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता बेनामी संपत्ती प्रकरणात दोषी ठरल्यास 3 वर्षांची शिक्षा होणार नाही. म्हणजेच आता शिक्षा होऊनही तुरुंगात जाणार नाही. मात्र ही दुरुस्ती १ नोव्हेंबर २०१६ पासून जुन्या प्रकरणांत लागू होणार नाही.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM