महत्वाच्या बातम्या
-
CA Intermediate Result 2022 | सीए इंटरमिजिएटचा निकाल 21 जुलै रोजी जाहीर होणार, निकाल येथे तपासू शकता
सीए इंटरमिजिएटच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे २०२२ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल २१ जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) जाहीर केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना icai.nic.in अधिकृत वेबसाईटवर आपले गुण तपासता येणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
बंडखोर आमदारांना सामान्य जनतेचं समर्थन असं सांगत, लोकांची भूमिका सुद्धा शिंदेंनी स्वतःच जाहीर केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दोऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती दिली. “सर्व 12 खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र दिलं. शिवसेना लोकसभा गट तयार करुन १२ लोकांचं पत्र दिलेलं आहे. दिल्लीत येण्याचं हे एक कारण होतं. तर दुसरं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्याच सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो होतो. हे दोन विषय महत्त्वाचे असल्यामुळे मी दिल्लीत आलो होतो. मी सर्व बारा खासदारांचं मनापासून स्वागत करतो”, असं एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
पीडितेने Video शेअर केला | बलात्काराचे आरोप झालेल्या खा. शेवाळेंना लोकसभेत शिवसेना पक्षाच्या नेतेपदी नेमण्याचा शिंदेंचा घाट
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्कार, लैंगिक शोषण आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यासंदर्भातले ट्विट्स या महिलेने पोस्ट केले आहेत. तसंच माझी तक्रार पोलीस नोंदवून घेत नाहीयेत त्यामुळे मला आता धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रमाणे न्याय मिळवून द्यावा असं म्हणत या पीडितेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
कदमांचा राजकीय विनोद? | म्हणाले भुजबळ, राणे, राज ठाकरेंनी सेना सोडल्यावर मी शिवसेना वाचवली | पण फडणवीसांचा हा व्हिडिओ पहा
रामदास कदम यांची शिवसेनेच्या कार्यकारिणीमधून हकालपट्टी करण्यात आली. तसं पत्रच त्यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत रामदास कदम यांनी आपली भूमिका मांडली. मी स्वतःहून नेते पदाचा राजीनामा दिला आहे. माझी हकालपट्टी कशी काय करता? हे काय गणित आहे मला कळलं नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. तसंच शरद पवारांनी शिवसेनेला सुरूंग लावला असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तेल लावलेला पैलवान शिवसेनेचं भलं करणार आहे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
सामान्य जनतेला मूर्ख बनवायला सामान्यांचं शिंदे सरकार आलं का? | पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त करून वीजबिलात 20% वाढ
महागाईने आधीच महिन्याचे बजेट कोलमडलेल्या सर्वसामान्यांना चहूबाजूंनी कोसळणाऱ्या महागाईची आणखी किती संकटे झेलावी लागणार, याची कल्पनाच करवत नाही. राज्यातील ‘महावितरण’च्या सुमारे पावणेतीन कोटी ग्राहकांना आणखी पाच महिने ही वाढ सोसावी लागेल, असे कंपन्यांनी सध्या म्हटले असले, तरी एकदा वाढलेले दर कमी होण्याच्या घटना दुर्मीळच असल्याने ती निमूटपणे सोसण्याशिवाय नागरिकांपुढे पर्याय नाही.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंची प्रतिशिवसेना | स्वतः झाले मुख्य नेते आणि मूळ शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेची जुनी कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख पदाला त्यांनी हात लावलेला नाही. मात्र शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचीच निवड करण्यात आली आहे. तर आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. एवढंच नाही तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tulsi Leaves with Milk | दुधात तुळशीची पाने उकळल्याने हे मोठे फायदे होतात | कसे ते जाणून घ्या
तुळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला फायदाच होतो. तसे, आपल्याला रोगामध्ये तुळशीची पाने कशी वापरायची हे माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय, तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्यायल्यास या मोठ्या आजारांपासून सहज मुक्तता मिळते. पाहा कसे ते?
3 वर्षांपूर्वी -
10th Schedule | बंडखोर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार | आमदारकी, सत्ता आणि पक्ष सर्वच हातून जाणार? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत घटनेचे 10 वे शेड्यूल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत लोकसभेचे माजी सचिव पीडीटी आचार्य यांनी व्यक्त केले आहे. या दहाव्या शेड्युलच्या दुसऱ्या परिच्छेदानुसार जोपर्यंत पक्षातून फुटून बाहेर पडलेले आमदार यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नसेल, तोपर्यंत ते निवडून आलेल्या पक्षाचेच सदस्य राहतात. एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणात या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा व्हीप त्यांना बंधनकारक ठरतो. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Lemon Cutting | लिंबू कापताना आडवाच का कापायचा? | जाणून घ्या कारण
‘लिंबू’ हे एक असे फळ आहे, ज्याच्याशी आपण सारेच परिचित आहोत. अगदी लिंबू सरबत पासून ते विविध अन्न पदार्थांची चव वाढविण्यासाठी वापरला जाणारा लिंबू आकाराने लहान असला तरीही त्याचे अनेको गुणधर्म आरोग्यदायी असतात. लिंबू आपल्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी तसेच तहान शमविण्यासाठीसुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. शिवाय थकवा दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठीदेखील लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. देशात लिंबू उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो.
3 वर्षांपूर्वी -
हम करे सो कायदा? | राज्यात चाललंय काय? | घटनेतील कलम 164 (1A) दुर्लक्षित करत शिंदे-फडणवीसांची कॅबिनेट बैठक?
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने २९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. ३० जूनला झालेल्या या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
3 वर्षांपूर्वी -
सरपंच जनतेतून आणि स्वतः बंडखोर आमदारांच्या समर्थनातून मुख्यमंत्री झालेल्या शिंदेचा सर्व वेळ गट विस्तारात, जनता अधांतरी
महाविकास आघाडी सरकारनं रद्द केलेला सरपंच निवडीचा निर्णय पुन्हा लागू करण्याची घोषणा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं केली आहे. त्यामुळे आता थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. यापूर्वी जनतेनं निवडून दिलेले सदस्य सरपंच किंवा नगराध्यक्षांची निवड करत होते. पण, आता निर्णय बदलला जाणार आहे. हास्यास्पद म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री हे मात्र जनतेतून नव्हे तर चक्क बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. आजच्या घडीला लोकांना मुख्यमंत्री निवडून देण्याची संधी दिल्यास एकनाथ शिंदे शर्यतीत सुद्धा दिसणार नाहीत असं वास्तविक चित्रं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Basil Seeds Benefits | सब्जा खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर, अधिक माहितीसाठी वाचा
घराघरांत पूजनीय असणारी तुळस अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते. त्यामुळे आयुर्वेदातही तुळशीचे एक वेगळे स्थान आहे. तुळशीमुळे आपले आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. इतकेच काय तर तुळशीच्या पानांइतकेच तुळशीच्या बियांचे देखील अनेको लाभ होतात. आता तुम्ही म्हणाल तुळशीचं बी? ते काय असतं? तर तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आणि तो शरीरासाठी अतिशय गुणकारी असतो. मुख्य म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचे सेवन केल्याने शरीरातील दाह कमी होतो.
3 वर्षांपूर्वी -
CM Eknath Shinde | शिंदेंच्या गावात शालेय विद्यार्थ्यांना प्रवासाला धड रस्ता नाही, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड - हायकोर्टाकडून दखल
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृहजिल्हा असलेल्या सातारा येथील शालेय मुलींना ये-जा करताना येणाऱ्या अडचणींची मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. कोर्टाने गुरुवारी सुओ मोटू याचिकेवर सुनावणी करताना मुख्यमंत्र्यांच्या गावावर भाष्य करताना शाळा नाही, रस्ता नाही पण दोन हेलिपॅड आहेत, असे सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार पाडण्यासाठी गुजरातमार्गे पळ काढला | आता गुजरातच्या फायद्याच्या बुलेट ट्रेनला शिंदे सरकारची मंजुरी
महाराष्ट्रातल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यात पेट्रोल तसंच डिझेलच्या दरांवरचा व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर ५ रूपये तर डिझेल प्रति लिटर ३ रूपये स्वस्त झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. या कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर १० हजार कोटींचा बोजा पडणार आहे असंही त्यांनी सांगितलं.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंचं बंड भाजपने का घडवलं? | ही आकडेवारी सर्व स्पष्ट करते | म्हणून भाजपने शिंदेंना राष्ट्रवादीविरोधात स्क्रिप्ट दिली
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ठपका ठेवत शिवसेना आमदारांनी बंड केलं. त्यामुळे यापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतच पुन्हा एकदा शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल भूमिका मांडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Indian Population | पुढील वर्षापर्यंत चीनला मागे टाकून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल - यूएन रिपोर्ट
भारत लवकरच आपला शेजारी चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अहवालात याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. “2023 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
अस्तित्वात नसलेल्या फेक गुजरात मॉडेलची पावसाने पोलखोल | रस्त्यापासून घरापर्यंत लोकं कमरेभर पाण्यात | 63 जणांना मृत्यू
देशातील हवामानाचे पॅटर्न बदलले आहेत. सोमवारी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि इतर अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला. गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत पाऊस आणि पुरामुळे 63 जणांना आपला जीव गमवावा लागला. पावसामुळे नुकसान झालेल्या 10 हजारहून अधिक लोकांना सरकारने सुरक्षित स्थळी हलवलं आहे. 8 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Pitta Dosha | पित्ताच्या त्रासावर ‘हे’ घरगुती उपाय 100 टक्के परिणामकारक | नक्की वाचा
अनेकदा कामाचा व्याप आणि वाढता ताण यामुळे आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत असतो. यात प्रामुख्याने अपुरी झोप, अवेळी फास्ट फूड खाणे अशा अनेक सवयींमुळे शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. परिणामी डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थता, करपट ढेकर, मळमळणे, हातापायावर आणि पोटावर लालसर पुरळ येणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. कधी कधी पित्ताचा त्रास इतका जास्त होतो कि चक्कर येण्याची देखील शक्यता असते. पित्ताच्या त्रासामुळे जेवण जेवू वाटत नाही. तोंड कडवट होते. यामुळे पचनक्रिया देखील बिघडते. मग पित्तावर घरच्या घरी उपाय करायचा असेल तर काय उपचार करावा? आणि केलेला उपचार फायद्याचा ठरेल का? असे प्रश्न अनेकांना पडतात.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिंदेंच्या बंडामागील पत्रकार दीपक शर्मा यांनी सांगितलेलं वास्तव जनतेने वाचू नये, तर लक्ष देऊन ऐकावं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात अस्तित्वात आलंय. नवं सरकार आलं असलं, तरी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटातील संघर्ष थांबलेला नाही. शिवनेतील बंडखोरीत भाजपचाही सहभाग होता, यावरून बरंच रणकंदन सुरू झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
आनंदराव अडसूळ यांचा पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा | शिंदे गटात गेल्यास राणा दाम्पत्याची राजकीय अडचण होणार?
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा हा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे. आनंदराव अडसूळ हे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL