20 April 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

गडकरी महामार्गांच्या दर्जावर बोलतात; पण इथे अपघातग्रस्तच खड्डे बुजवत आहेत

Parents filling potholes, High ways, Roads, son death, New Delhi Faridabad

नवी दिल्ली: केंद्रीय दळणवळ मंत्री नितीन गडकरी अनेक ठिकाणी लाख करोड रुपयांच्या पायाभूत सुविधांवर बोलताना पाहिलं असेल. मात्र भारत सरकार रस्ते विकासावर करत असलेल्या करोडो रुपयातून नेमकी कोणती गुणवत्ता साध्य होते ते माहित नसलं तरी त्या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे सामान्य लोकं मात्र स्वतःचे कुटुंबीय आणि जिवलग अपघातात गमावत आहेत.

मोदी सरकारमध्ये मेरिट वर असलेले मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या शैलीतून कंत्राटदारांना धारेवर धरत असतात, परंतु त्यात हेतू मात्र जनहिताचा असतो म्हणून कि काय त्यांच्या विधानांना कोणी विरोध करत नसावेत. एकदा बेतुलमधील एका जनसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ठेकेदारांना इशारा वजा धमकीच देऊन टाकली होती.

नितीन गडकरी यांनी कत्रांटदारांना दिलेल्या धमकीमुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. ‘काम योग्य नाही झालं तर बुलडोझर खाली मातीच्या जागी तुम्हाला चिरडून टाकीन’, अशी इशारा वजा धमकीच त्यांनी कंत्राटदारांना देऊन टाकली होती. अर्थात त्या मागे त्यांचा हेतू जनहिताचाच होता असे म्हणायला हरकत नाही. पण त्यांच्या या विधानामुळे खरंच काही सध्या होतं आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र सरकारने उभारलेल्या हलक्या दर्जाच्या रस्त्यांमुळे दिल्लीतील महामार्गांवर देखील अनेक पण अपघातात स्वतःचे प्राण गमावत आहेत. सरकार सोडा पण त्यांनी नेमलेलय कंत्राडदारांची जवाबदारी देखील अपघातग्रस्तांचे कुटुंबीय पार पाडत आहेत आणि ते देखील स्वतःच्या खर्चातून हे विशेष म्हणावे लागेल.

नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय राजमार्गावर बाटा चौकजवळच्या रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे सहा वर्षांपूर्वी १० फेब्रुवारी २०१४ला मनोज वाधवा यांनी आपल्या तीन वर्षांचा मुलगा पवित्रला गमावलं. या अपघातप्रकरणी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दोषी धरलेलं असून, त्यांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत. सोमवरी मनोज आणि त्यांची पत्नी टीना त्याच बाटा चौक या ठिकाणी पोहोचले जिथे त्यांनी आपल्या मुलाला गमावलं होतं. मनोज आणि त्यांची पत्नी रस्त्यांच्या कडेवरचे खड्डे भरताना दिसत आहेत.

मनोज वाधवा हे १० फेब्रुवारी २०१४ला पत्नी टीना आणि ३ वर्षांचा मुलगा पवित्रबरोबर स्कूटरवरून बाटा रस्त्यावर आले असता त्याचदरम्यान पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात त्यांची स्कूटर गेली आणि त्यांचा स्कूटरवरील ताबा सुटला. या दुर्घटनेत मुलगा पवित्रला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावर पडलेल्या टीना यांच्या पायावरूनही एक अज्ञात वाहन गेलं. तसेच या अपघातात मुलगा पवित्रचा मृत्यू झाला. तसेच पत्नी टीना हिचे आतापर्यंत २३ ऑपरेशन झाले आहेत. मनोज वाधवा यांनी सांगितलं की, रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांना महापालिका, राजमार्ग प्राधिकरण (हायवे विकास), हरियाणा शहर विकास प्राधिकरणाच्या अधिकारी जबाबदार आहेत.

 

Web Title: Parents filling potholes of High ways and other roads after son death in New Delhi Faridabad.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या