19 November 2024 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

सुधरा रे! रेल्वे इंजिनची डिझेल टाकी लिकेज असल्याचं कळताच भांडी घेऊन भरायला जमले

Indian Railway

बंगळुरू: आपल्या देशात लोकं कुठे शहाणपणा दाखविण्या ऐवजी बेजवाबदारीने वागतात हेच वेळोवेळी समोर आलं आहे. तसाच प्रकार कर्नाटकात घडला आहे तो देखील प्रत्यक्ष रेल्वेच्या बाबतीत हे भीषण म्हणावं लागेल. बंगळुरू ट्रेन इंजिनच्या डिझेलची टाकी लिकेज असल्यामुळे संबंधित रेल्वे याल्वीगी रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली होती.

मात्र आपत्कालीन परिस्थितीत थांबविण्यात आलेल्या रेल्वेच्या इंजिनची डिझेलची टाकी लिकेज असल्याची बातमी आसपासच्या परिसरात पसरताच स्थानिक अक्षरशः नळाला पाणी भरायला लाईन लावतात तसे घरातील खाली भांडी घेऊन पोहोचले. एखाद्या रेल्वेचं भरलेलं इंधन खाली केल्यास त्यामुळे प्रवासात काय परिस्थिती उद्भवू शकते याचं देखील लोकांना भान नसल्याचं दिसून आलं.

भारतीय लोकांची हीच वृत्ती अनेकदा मोठमोठ्या दुर्घटनांना कारणीभूत ठरली आहे. मात्र अशा घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत, उलट त्यात अधिक वाढ होताना दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार पुन्हा कर्नाटकात घडला असून, लोकांच्या अशा बेजवाबदारपणापुढे प्रशासन देखील अनेकदा हतबल होतं असल्याचं पाहायला मिळालं आहे.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x