18 January 2025 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

कोरोनावरील सर्वात प्रभावी लस बनविणाऱ्या फायझरचा भारत सरकारकडे परवानगीसाठी अर्ज

Pfizer company, seeks emergency apparoval, Covid19 vaccine, India

नवी दिल्ली, ६ डिसेंबर: युनायटेड किंगडमने (Great Britain Government) त्यांच्या देशात अमेरीकन औषध निर्माती कंपनी फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला (Pfizer Biontech CoronA vaccine) नुकतीच मंजुरी दिली आहे. कोरोना लसीला मान्यता देणारा यूके हा पहिलाच पाश्चिमात्य देश ठरला आहे. त्यामुळे UK मध्ये पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी (Medicine and Healthcare Products Regulatory Authority) अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. तसेच बाहरीन देशानेदेखील फायझरच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान युकेमध्ये लसीला मंजुरी मिळाल्यानंतर फायझर कंपनीने त्यांच्या कोरोना लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

लसीची आयात करण्याची, त्याचबरोबर देशभरात लसीची विक्री आणि वितरण करण्याची परवानगी फायझरने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे केलेल्या अर्जात मागितली आहे. नवीन औषधी व क्लिनिकल चाचणी नियम २०१९ नियमांतंर्गत (Under the new drug and clinical trial rules 2019) सध्या सुरू असलेल्या चाचण्यामधून सूट देऊन अशा प्रकारची परवानगी देण्याची विशेष तरतूद असल्याची माहिती प्रसार माध्यमांच्या सूत्रांनी दिली.

फायझर इंडियाने ४ डिसेंबर रोजी भारतात अर्ज दाखल केला आहे (Pfizer India has filed its application in India on December 4). या लसीचा भारतात आपातकालीन स्थितीत वापर करण्याची परवानगी देण्याची अधिकृत मागणी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे फायझरने केल्याचे वृत्त आहे.

 

News English Summary: Pfizer has sought permission to import the vaccine, as well as to sell and distribute the vaccine across the country, in an application to the Central Drug Standards Control Agency. Under the new Drug and Clinical Trial Rules 2019 (Under the new drug and clinical trial rules 2019), there is a special provision to allow such exemptions from the ongoing tests, media sources said. Pfizer India has filed its application in India on December 4

News English Title: Pfizer company seeks emergency use authorization for covid19 vaccine in India News updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x