25 November 2024 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News
x

भारतमाता की जय म्हणणाऱ्यांनाच देशात स्थान: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

Union Minister Dharmendra Pradhan, Bharatmata Ki Jai

नवी दिल्ली: ‘भारताला आपण धर्मशाळा करणार आहोत का, जो येईल तो येथे राहणार का, याचा विचार करून हे आव्हान आपल्याला स्वीकारावेच लागेल. भारतात ‘भारतमाता की जय’ म्हणावेच लागेल, भारत माता की जय म्हणणारेच देशात राहतील,’ अशा शब्दात पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शनिवारी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या वादाबाबत वक्तव्य केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शहीद भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्या महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांच्या बलिदान असे विसरून चालणार नाही. त्यामुळे या सर्वांना आठवून आपल्याला एक निर्णय घेतला पाहिजे की, देशात राहणाऱ्या व्यक्तीला ‘भारत माता की जय’ म्हणावेच लागेल. असेही यावेळी धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

यावेळी बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी एनआरसी, सीएए आणि लोकसंख्या सूची वरून विरोधकांना खडेबोल सुनावले. “देशाचे तुकडे करण्याची योजना आखलेल्यांचे अनुयायी आजही विरोध करत असल्याचा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला.

“चीनमध्ये सरकारच्या विरोधात कोण घोषणाबाजी करु शकतो का, देशात लोकशाही असून मतभिन्नता असू शकते वाद-विवाद होऊ शकतो. मात्र देशात सध्या नागरिकत्व कायदा तसेच लोकसंख्या सूची होऊ की नाही यावरुन वाद-विवाद होत आहे. जगात असा कोणता देश आहे. ज्या देशामध्ये तिथे राहणाऱ्या नागरिकांचा हिशोब ठेवला जात नाही”, असा सवाल प्रधान यांनी केला.

 

Web Title:  Place in the India called Bharatmata Ki Jai says by Union Minister Dharmendra Pradhan.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x