23 December 2024 12:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

पंतप्रधान मोदींनी CBSE च्या परीक्षा रद्द केल्या, यावर आशिष शेलार यांचे मत काय? - सचिन सावंत

Sachin Sawant

मुंबई, ०२ जून | मागील काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने सरकारने घेतला होता. तसेच दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी भाजपचे आमदार आशिष शेलार पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका करत होते. मात्र आता मोदींनी CBSE च्या परीक्षा रद्द केल्यानंतर भाजपचे नेते शांत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यालाच अनुसरून सचिन सावंत यांनी आशिष शेलार यांना प्रश्न उपस्थित केले आहेत.

सचिन सावंत यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “विरोधाला विरोध करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना जनता गांभीर्याने घेत नाहीत. राज्य सरकारने सर्व संबंधित घटकांशी चर्चा केली. असं असताना सरकारचे काही स्वतः:चे मत आहे का? हा मविआला विचारलेला प्रश्न मोदींना विचारा ज्यांनीही सर्वांशी चर्चा केली असे म्हटले आहे.

 

News English Summary: Last year, the government had decided not to conduct the final year exams in the state. Also, BJP MLA Ashish Shelar was holding a press conference and criticizing the state government for postponing the dates of Class XII examinations. But now that Modi has canceled the CBSE exams, BJP leaders seem to be calm. Following that, Sachin Sawant has posed questions to Ashish Shelar.

News English Title: PM Modi has canceled the CBSE exams now what MLA Ashish Shelar will say question raised by Sachin Sawant news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x