26 December 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या
x

उपसभापतींच्या गांधीगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

PM Narendra Modi, Deputy Speaker Harivansh, Marathi news ABP Maza

नवी दिल्ली, २२ सप्टेंबर : राज्यसभेतील निलंबित आठ खासदारांकडून संसद परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या खासदारांनी काल रात्रभर हे आंदोलन सुरूच ठेवल्यानंतर आज सकाळी उपसभापती हरिवंश यांनी स्वतः या खासदरांना चहा दिला. उपसभापतींच्या कृतीबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे.

कालची संपूर्ण रात्र संसद भवनाच्या आवारात आंदोलन करणाऱ्या या खासदारांची भेट घेण्यासाठी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे चहापाणी घेऊन आज सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले आहे. हरिवंश यांनी आंदोलनकर्त्या खासदारांना चहा पाजून स्वत: उपोषणास सुरुवात केली आहे. दरम्यान, उपसभापती हरिवंश याांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून आपण एका दिवसाचे उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.

रविवारी राज्यसभेत दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली तेव्हा सभागृहाची सूत्रे उपसभापती हरिवंश नारायण यांच्याकडे होती. त्यांनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येत गोंधळ घातला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर उपसभापती हरिवंश नारायण यांच्यासमोरील नियमपुस्तिका फाडली, तसेच माईकही उखाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आठ खासदारांना निलंबित केले होते. तत्पूर्वी विरोधकांनी उपसभापतींविरोधात अविश्वास ठरावही मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यंकय्या नायडू यांनी हे नियमाविरोधात असल्याचे सांगत ही मागणी फेटाळून लावली.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi today praised Harivansh Singh, the deputy chairperson of the Rajya Sabha after he went to meet the protesting MPs from the opposition parties and offered them tea.

News English Title: PM Modi Praises Deputy Speaker Harivansh For Giving Tea To Agitating MPS Said marathi news LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x