26 December 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा
x

VIDEO | मोदींना अखेर वाराणसी आठवली आणि अश्रू अनावर? लाखो लोकं मरत असताना निवडणुकीत होते मग्न

India corona pandemic

वाराणसी, २१ मे | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काशी म्हणजे वाराणसीतील डॉक्टर्स आणि फ्रॉन्टलाईन वर्कर्ससोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीला काशीतील डॉक्टर्स आणि फ्रॉन्टलाईन वर्कर्स यांनी उपस्थिती लावली होती आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं.

सदर मार्गदर्शन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा झाल्याचे पाहायला मिळतंय. ज्या गंगेच्या साक्षीने मोदींनी राजकारण केलं त्या गंगेतच मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रेतं पाण्यावर तरंगताना देशाने आणि जगाने पहिली आहेत. धक्कादायक म्हणजे गंगा घाटावर सुद्धा हजारो कोरोना प्रेतं पुरल्याचं पाहायला मिळाल्याने मोदींविरोधात मोठ्या चीड निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.

विशेष म्हणजे जेव्हा देशात आणि काशीत हजारो लोकं कोरोनाने मृत्युमुखी पडत होते तेव्हा पंतप्रधान मोदी हे ५ राज्यांच्या निवडणुकीत हसत भाषणं ठोकताना देशाने पाहिले. परिणामी देशातून आणि जगभरातून टीका झाल्यावर मोदींनी पुन्हा त्यांचं ‘अश्रू’ नावाचं भावनिक अस्त्र काढल्याने समाज माध्यमांवर त्यांच्यावर पुन्हा जोरदार टीका सुरु झाली आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi held a virtual meeting with doctors and frontline workers in Kashi, Varanasi on the backdrop of the Corona epidemic in the country. The meeting was attended by doctors and frontline workers from Kashi and was guided by Prime Minister Narendra Modi.

News English Title: PM Modi Reviewing COVID 19 situation in Kashi with doctors and frontline workers working there news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x