मोदी यांनीच बालाकोट एअर स्ट्राइकची माहिती अर्णब गोस्वामीला आधीच दिली होती - राहुल गांधी
तामिळनाडू, २५ जानेवारी: भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे.
या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली याची चर्चा अजून रंगली आहे. दरम्यान तामिळनाडूच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
तामिळनाडू दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतिशय गंभीर आरोप केला ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ती व्यक्ती आहे ज्यांच्या माध्यमातून बालाकोट एअर स्ट्राइकच्या आधी या कारवाईची माहिती रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांना मिळाली आहे. मात्र राहुल गांधी यांनी या संदर्भात कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयाकडूनही या दाव्याबाबत काही उत्तर आलेले नाही.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, बालाकोट एअर स्ट्राइकबाबत केवळ पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री आणि हवाई दल प्रमुख यांना माहिती होती. या लोकांशिवाय अन्य कुणालाही एअर स्ट्राइकच्या आधी याची माहिती नव्हती. आता बालाकोट एअर स्ट्राइकच्या आधी ही माहिती एका पत्रकाराला कुणी दिली. माहिती असलेल्यांपैकीच कुणीतरी हवाईदलासोबत विश्वासघात केला असावा, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
News English Summary: Rahul Gandhi, who is on a tour of Tamil Nadu, has leveled serious allegations against Prime Minister Narendra Modi over Arnab Goswami’s WhatsApp chat. However, Rahul Gandhi has not submitted any evidence in this regard. On the other hand, the Prime Minister’s Office has not responded to this claim.
News English Title: PM Narendra Modi gave Balakot strike information to Arnab Goswami said Rahul Gandhi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS