27 December 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

मोदींची मन की बात तरुणांच्या मनात न जाता 'डोक्यात' जातेय? | डिसलाईक्सचा पाऊस

PM Narendra Modi, Maan Ki Baat, Dislikes

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या व्हिडिओला युट्यूबवर मोठ्या प्रमाणात डिसलाईक्स दिसल्यानंतर भाजपने आयटी सेलला त्यामागे काॅंग्रेसचा हात असल्याचा कांगावा केला होता. भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी यामागे परदेशातील ट्रोल्सचा वाटा अधिक असल्याचे हास्यास्पद विधान केले होते.

`मन की बात`ला मोठ्या प्रमाणात डिसलाईक्स मिळाल्यानंतर भाजपमध्येही खळबळ उडाली होती. त्यात देशाच्या जीडीपीचे आकडे सायंकाळनंतर जाहीर झाले. त्यामुळे `मन की बात`बद्दलची नाराजी आणखी वाढली. भाजपच्या यू ट्यूब चॅनेलवर शेअर झालेल्या या कार्यक्रमाच्या व्हिडीओला मंगळवारपर्यंत सुमारे साडेनऊ लाख डिसलाईक्स आणि अडीच लाख लाईक्स मिळाले होते. त्यावरून मालवीय यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०२० रविवारी, ३० ऑगस्टलाआपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेला संबोधित केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” या कार्यक्रमाचा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाने युट्यूबवर पोस्ट केला. पण व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया आल्या व मोठ्या प्रमाणात व्हिडिओ ‘डिसलाइक’ केला गेला. त्यामुळे हा विषय बराच चर्चेत आला. मंगळवारी दुपारपर्यंत हा व्हिडिओ 45 लाख युजर्सनी बघितला पण त्यातील केवळ दोन लाख 10 हजार हजार लाइक्स होते. तर, तब्बल नऊ लाख 43 हजार जणांनी व्हिडिओ डिसलाइक केला. या व्हिडीओचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

मात्र कालही तोच प्रकार घडल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’वर पुन्हा एकदा डिसलाईक्सचा पाऊस पडला आहे. काल दसऱ्याच्या निमित्तानं मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोनाचं संकट असल्यानं सणासुदीच्या काळात काळजी घ्या. सीमेवर देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांसाठी दिवाळीत एक दिवा लावा, स्थानिक उत्पादनं खरेदी करा, लोकलसाठी व्होकल व्हा, असं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं. मात्र मोदींच्या संबोधनावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनल पाहिल्यास याची प्रचिती येते.

काल सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. आज सकाळी १० पर्यंत पीएमओ इंडियाच्या यूट्यूबवर ४६ हजारांहून अधिक जणांनी मोदींचा व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओला आतापर्यंत साडे तीन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर डिसलाईक्सची संख्या चार हजारांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे व्हिडीओ लाईक/डिसलाईक्स करण्यामागची कारणं समजू शकलेली नाहीत.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi’s ‘Mann Ki Baat’ has once again received a shower of dislikes. Yesterday, on the occasion of Dussehra, Modi interacted with the people of the country. Be careful during the festive season as the corona is in crisis. He appealed to the people to light a lamp on Diwali, buy local products and be vocal for the locals. However, netizens have expressed displeasure over Modi’s address. This is evident from watching the official YouTube channels of the BJP and the Prime Minister’s Office.

News English Title: PM Narendra Modi Maan Ki Baat gets more dislikes than likes on BJP Youtube channel News updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x