22 November 2024 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

काँग्रेस व सुशिक्षित अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत: नरेंद्र मोदी

Protest against CAB 2019, PM Narendra Modi

नवी दिल्ली: देशातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी एकदा सुधारित नागरिकत्व कायदा वाचावा आणि समजून घ्यावा. राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत शिकले सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून पसरवण्यात आलेली डिटेन्शन कॅम्पची अफवा खोटी आहे. बदनामी करणारी आहे. देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

काही राज्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्यांना राज्यांना मोदींनी सुनावलं. मोदी म्हणाले, “काही राज्यांनी आता एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यास विरोध केला आहे. मात्र, त्यांनी बोलण्याआधी समजून घ्यायला हवं. त्यांनी हा कायदा राज्यातल्या अधिकारातील आहे की नाही याविषयीराज्यांच्या कायदेसल्लागारांशी चर्चा करावी. म्हणजे तोंडावर पडणार नाहीत,” असा उपरोधिक टोला मोदी यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. हे विरोधक आपल्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. खोटी विधाने, फेक व्हिडिओ आणि चिथावणीखोर भाषणे यांनी दिली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये भ्रम निर्माण करून स्फोटक वातावरण तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

दिल्ली विधानसभेच्या अनुषंगानं बोलताना मोदी म्हणाले, “कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणं काम केलं नाही. आम्ही काम करत होतो, तर त्यात आडकाठी आणण्याचं काम ते करत होते. पण, त्यांच्याकडून काहीही साध्य झालं नाही. कारण, समस्या तशाच ठेवणं, हे आमच्या संस्कारात नाही. दिल्लीतील २००० व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्ट्य आहे,” असेही मोदी म्हणाले.

 

Web Title:  PM Narendra Modi slams Congress Party over Protest against CAB 2019.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x