22 November 2024 1:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

चलनात २५ पैशांचं नाणंच नाही, मग मोदींच्या आई आजही त्यांना सव्वा रुपया देतात कुठून?

Akshay Kumar, Narendra Modi, BJP, Loksabha Election 2019

अहमदाबाद : नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमारने अराजकीय मुलाखत घेतली खरी, मात्र ती मुलाखत फिल्मी असल्याचं आता समोर येतं आहे आणि त्याला तास ठोस पुरवा देखील मिळत आहे आणि तो देखील मोदींच्याच तोंडून असं म्हणावं लागेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षय कुमारने घेतलेली मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय. अनेकांनी या मुलाखतीवर टीका केली तर अनेक जण मोदींची स्तुती करण्यात व्यस्त आहेत. या मुलाखतीत मोदींच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबी समोर आल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आपल्या आईविषयी देखील अनेक गोष्टी या मुलाखतीत सांगितल्या आहेत.

आपल्या आईसोबत का राहत नाही याचा देखील खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला आहे. या मुलाखतीदरम्यान विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना मोदींनी सांगितले कि ते जेव्हा आजही आईकडे जातात तेव्हा आई त्यांना सव्वा रुपया(१ रुपया २५ पैसे) देते. अक्षय कुमारने विचारले कि तुम्ही तुमच्या महिन्याच्या पगारातून आईला किती रुपये देतात? त्यावर मोदींनी उत्तर देताना सांगितले कि, ‘आईच मला पैसे देते. जेव्हा जेव्हा मी आईला भेटायला जातो तेव्हा मला आई सव्वा रुपया देते. ती आमच्याकडून कधी अपेक्षा नाही करत. तिला गरजही नाहीये.’

पण मोदींनी दिलेलं हे उत्तर भावनेच्या भरात दिलं असल्याचं बोललं जात आहे. मोदींनी सांगितले कि त्यांची आई त्यांना सव्वा रुपया देते. या गोष्टीमध्ये दोन अडचणी आहेत. एक म्हणजे २५ पैसे सध्या चलनात नाहीयेत. कदाचित ते जुनी गोष्ट सांगत असतील. पण त्यांनी सांगितले कि अजूनही त्यांना आई सव्वा रुपया देते.

दुसरी अडचण हि आहे कि मोदी जेव्हा आपल्या आईला भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या आईने त्यांना पाचशे रुपये दिले होते. तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान मोदी गुजरातमध्ये गेले होते. त्यावेळी २३ एप्रिलला त्यांनी अहमदाबाद मध्ये मत टाकलं. त्याअगोदर ते आईला भेटले होते. १० मिनिटं ते आईसोबत होते. यावेळी आईने त्यांना ५०० रुपये दिले होते. त्यावेळी त्यांना आईने पेढा देखील भरवला होता. व्हिडीओमध्ये दिसत आहे कि मोदींच्या हातात नारळ आणि पाचशेची नोट दिसत आहे. मोदी पाचशे रुपयालाच सव्वा रुपया तर म्हणत नाहीयेत ना. किंवा आईने सव्वा रुपये अजून दिले असतील? ज्यामध्ये चलनात नसलेले २५ पैसे पण होते. आता यामध्ये खरं काय ते मोदींनाच माहिती.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x