6 January 2025 4:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा असं आवाहन करून पंतप्रधान स्वतः निवडणूक सभेला पोहोचले

Acharya Mahamandleshwar

नवी दिल्ली, १७ एप्रिल: हरिद्वार कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, येणाऱ्या काळात कुंभमेळ्यामुळे देशातील परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी मोदींनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली.

मोदी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. “आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवरून संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत. याबद्दल मी संतांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि करोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल,” असं आवाहन मोदींनी केलं आहे.

एकाबाजूला असं आवाहन केलं असलं तरी दुसऱ्या बाजूला मात्र स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सने ते शक्य होतं कारण पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारामुळे कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे. मात्र मोदींनी तसं सामाजिक पाऊल न उचलता थेट संभेला पोहोचल्याने ‘लोका सांगे ब्राम्हज्ञान’ असा प्रकार घडल्याची टीका समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

 

News English Summary: Corona has been included in the Haridwar Kumbh Mela, which is likely to worsen the situation in the country in the near future, experts are warning. Against this backdrop, Prime Minister Narendra Modi had a telephone conversation with Acharya Mahamandleshwar Swami Awadheshanand Giri. At this time, Modi requested to hold the Kumbh Mela in a symbolic manner.

News English Title: PM Narendra telephone conversation with Acharya Mahamandleshwar Swami Awadheshanand Giri news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x