पुडुचेरी आणि महाराष्ट्रात फरक आहे | मात्र जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवा - शिवसेना
मुंबई, २३ फेब्रुवारी: पुडुचेरीत काँग्रेस सरकार कोसळल्यावर त्याचा संदर्भ महाराष्ट्रात देखील जोडण्यास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, पुडुचेरीसारखे छोटे राज्यसुद्धा भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडून खेचून घेतलं, आता मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी जाहीर केलंय, महाराष्ट्र आणि पुडुचेरीमध्ये फरक आहे, याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, येथे शिवसेना घटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असं त्यांनी बजावलं आहे.
दरम्यान, शरद पवार संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत, अशी कुठलीही माहिती माझ्याजवळ नाही. अशा चर्चा माध्यमांमध्ये होत असतात, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले.
पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. तर संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर मुख्यमंत्री आणि शरद पवार नाराज आहेत का, याबाबत बोलण्यास राऊत यांनी नकार दिला.
News English Summary: After the fall of the Congress government in Puducherry, BJP leaders have started adding its reference to Maharashtra as well. On this, Shiv Sena MP Sanjay Raut said that even small states like Puducherry were pulled out by the BJP, now the BJP leaders have announced that they will launch Operation Lotus in Maharashtra in March-April, there is a difference between Maharashtra and Puducherry, here is Chief Minister Uddhav Thackeray He has warned that Mahavikas Aghadi is running the government, Shiv Sena is in Maharashtra, so we should not just rise up, we should be aware that only Peral will grow.
News English Title: Political structure is difference in Puducherry and Maharashtra said MP Sanjay Raut news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH