22 February 2025 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपाचा दृष्टीकोन – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar, Hathras Case, RSS, BJP Party

मुंबई, ५ ऑक्टोबर : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे दलित समाजातील एका तरुणीवर काही नराधमांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपावर देखील निशाणा साधला आहे. महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपाचा दृष्टीकोन असल्याचं प्रकाश आंबेडकर पुण्यात म्हणाले आहेत.

“उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे. सर्व स्तरातून हा निषेध नोंदवला गेला ही चांगली गोष्टं असं मी मानतो. तरूण पिढी आता महिलांवरील अत्याचारांकडे एका वेगळ्या नजरेतून पाहताना दिसत आहे. आरएसएस-भाजपा हे महिला उपोभगण्याची वस्तू आहेत, असा प्रचार आणि प्रसार करतात. ती महिला आहे, तिला जगण्याचा अधिकार आहे आणि तिचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत. तिला जसं जगायचं आहे, तसं तिला जगता आलं पाहिजे. तिच्यावर कुणी अत्याचार करू नये, अशा पद्धतीने असलेली माणसिकता नव्या पिढीकडे आहे. ही नवी पिढी मला देशभरात रस्त्यावर उतरलेली दिसत आहे.” असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवलं.

दुसरीकडे उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी सकाळी जळगाव राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दोरखंडात जखडलेली प्रतिकात्मक संत मीराबाई यांची मूर्ती स्पीड पोष्टाद्वारे पाठविण्यात आली. सध्या देशातील महिलांची अशीच अवस्था झाली असून त्यांचे दोरखंड सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी यावेळी केली.

 

News English Summary: In Hathras, Uttar Pradesh, a Dalit girl was gang-raped by some men. He then tried to kill her. After the incident, the victim died while undergoing treatment at the hospital. Against this backdrop, today the leader of the deprived Bahujan Alliance, Prakash Ambedkar, has also targeted the Rashtriya Swayamsevak Sangh and the BJP.

News English Title: Prakash Ambedkar Criticized Of Sangh And BJP Over Hathras Case Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x