29 December 2024 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, अशी संधी सोडू नका - NSE: KPIGREEN Vodafone Idea 5G | VI ची 5G सर्विस भारतात लॉन्च; तुमच्या शहराचे नाव 'या' यादीमध्ये आहे की नाही चेक करा LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल UPI New Rule | 1 जानेवारीपासून UPI चा नवा नियम लागू; आधीपेक्षा जास्त पैसे होतील ट्रान्सफर, किती लिमिट वाढवली आहे पहा Business Idea | गृहिणींनो इकडे लक्ष द्या; आता घरबसल्या स्वावलंबी व्हा, कमी पैशांत सुरू होणारे जबरदस्त व्यवसाय Lava Yuva 2 5G | नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री, 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत, या स्मार्टफोनचे फीचर्स आहेत कमालीचे SIP Mutual Fund | पगारदारांनो, म्युच्युअल फंडचा श्रीमंत करणारा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कमी गुंतवणुकीतून मिळेल 6.32 कोटी परतावा
x

पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी? | त्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Prashant Kishor

मुंबई, १४ जुलै | निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी तीनदा एकमेकांच्या भेटी घेतल्या. यानंतर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर माध्यमांत चर्चांना ऊत आले आहे. काहींनी तर शरद पवारांना राष्ट्रपती करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. पण, शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदासाठी तयारी असल्याच्या वृत्तावर अधिकृत काहीही समोर आलेले नाही. यामध्ये दोन शक्यतांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

2024 मध्ये भाजपला आव्हान देण्याची तयारी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तीन वेळा भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले हे अजुनही स्पष्टपणे समोर आलेले नाही. या भेटी-गाठीनंतर आता मात्र प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2017 नंतर राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची ही पहिलीच भेट होती. या बैठकीत प्रियांका गांधी वाड्रा देखील उपस्थित होत्या. एवढेच नव्हे, तर विविध विरोधी पक्ष आणि भाजप विरोधी नेत्यांनी यात सहभाग नोंदवला. एकंदरीत 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान कसे देणार हा मूळ मुद्दा होता. परंतु, त्यात राष्ट्रपती पदावर सुद्धा चर्चा झाल्याचे माध्यमांनी सांगितले आहे.

2022 मध्ये संपणार राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचा कार्यकाळ:
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. यानंतर पुढील राष्ट्रपती कोण होणार याचे गणित सध्या लावले जात आहे. राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव प्रशांत किशोर यांच्याकडून प्रोजेक्ट केले जात आहे असे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इतर पक्षांसह बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांना सोबत घेणे आवश्यक असल्याचे मत किशोर यांनी मांडले. त्यानुसार, किशोर यांनी पटनायक यांच्यासह एम. के. स्टॅलिन यांचीही भेट घेतली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Prashant Kishor and Rahul Gandhi meeting over presidential election news updates.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x