१८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण | प्रशांत किशोर यांचं भाकीत खरं ठरलं | केंद्राच्या भोंगळ कारभाराची किंमत देशातील राज्यं भोगणार
नवी दिल्ली, १२ मे | देशात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून एकट्या महाराष्ट्रात सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरवण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.
सध्या महाराष्ट्रात कोव्हॅक्सिन लसींचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या (कोव्हॅक्सिन) प्रतीक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नसून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोव्हॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाखावर डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. कोविशील्डचा देखील दुसरा डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचा आहे.
राज्य सरकारांनी खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने केंद्राची तयारी आणि भोंगळ कारभार समोर आला आहे. केंद्र स्वतः तत्पर आणि तयार नसताना नकोत्या घोषणा करून मार्केटिंग करत बसल्याचं देखील सिद्ध झाले आहे. वर्तमान आणि भविष्याचा वस्तुस्थितीला धरून कोणताही विचार केंद्राने न केल्याने राज्यांना त्यांच्या योजना बदलाव्या लागत आहेत.
केंद्र सरकारने लस किती प्रमाणात उपलब्ध आणि त्याच्या निर्मितीवर अभ्यास न करता १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची घोषणा करताना त्याचा संपूर्ण खर्च करण्याची राज्यांवर टाकला. मात्र आता केंद्राच्या ४५ ते अधिक वयाच्या लसीकरणासाठी राज्यांना त्यांच्या मोहीम थांबवाव्या लागत आहेत आणि पैसे देखील केंद्राच्या मोहोमेवर वर्ग करावे लागत असल्याचं पाहायला मिळतंय. तत्पूर्वी, प्रशांत किशोर यांनी एप्रिल महिन्यात ट्विट करून याची आधीच भविष्यवाणी केली होती आणि ती पूर्णपणे खरी ठरली आहे. यासंदर्भात ट्विट करताना प्रशांत किशोर यांनी म्हटलं होतं, “वस्तुस्थिती: १८ ते ४४ वयोगातील लोकांचं लसीकरण विसरा…. इथे ४५ वयोगटावरील ३५ कोटी लोकांसाठी लस पुरेसी नाही….. अगदी ऑगस्ट पर्यंत नाही.
#Vaccines की व्यवस्था के बिना 18-44 साल के ~58Cr लोगों के लिए “टीकाकरण अभियान” जैसा #MasterStroke सिर्फ़ #ModiSarkar के ही बस की बात है!
Fact: Forget about vaccines for people age 18-44 years, there is not enough vaccines for ~35Cr people above 45 years, not till Aug #CoWin
— Prashant Kishor (@PrashantKishor) April 28, 2021
News English Summary: The Fact is, Forget about vaccines for people age 18 to 44 years, there is not enough vaccines for 35 Crore people above 45 years and not till Aug CoWin said Prashant Kishor news updates.
News English Title: Prashant Kishor prediction about vaccines for people age 18 to 44 years gone true news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो