5 November 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

VIDEO | ३ मार्च २०२१'ची निवडणूक मुलाखत | प्रशांत किशोर यांचं जवानांवरील हल्ल्याबाबत भाकीत आणि काल..

Pulawama Attacked, Chhattisgarh Naxal attack

कोलकत्ता, ५ एप्रिल: संरक्षण दलांची पथके आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या जंगलात झालेल्या चकमकीत आतापर्यंत २२ जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी घडवलेले हे अलीकडच्या काळातील मोठे हत्याकांड ठरलं आहे. याच हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह हे घटनास्थळाला भेट देणार आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची पहाणी शाह करणार आहेत. आज दुपारी शाह या ठिकाणाला भेट देणार आहेत.

सध्या देशात ५ राज्यात विधानसभा निवडणुका सुरु आहेत. या निवडणुका २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. मात्र तत्पूर्वी एक धक्कादायक योगायोग समोर आला आहे. पश्चिम बंगला हे राज्य भाजपासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि तिथे ममता बॅनर्जींचे सरकार पुन्हा येणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र ३ मार्च २०२१ रोजी इंडिया टुडेने प्रशांत किशोर यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी देखील टीएमसीच्या निकालाडब्बल आत्मविश्वास दाखवला होता. मात्र त्यांना करण्यात आलेल्या जर तर च्या प्रश्नावेळी त्यांनी म्हटलं की जर निवडणुकीच्या वेळी पॅरा मिलिटरी म्हणजे जवानांवर कोणताही मोठा हल्ला झाल्यास भाजपाला फायदा होऊ शकतो.

धक्कादायक म्हणजे असेच आरोप २०१९ मधील पुलवामा हल्लाबद्दल देखील अनेकांनी केले होते, कारण त्यावेळी लोकसभा २-३ महिन्यांवर येऊन ठेपल्या होत्या. आता प्रशांत किशोर यांनी असं भाकीत ३ मार्च २०२१ रोजी केलं होतं आणि काल छत्तीसगडमध्ये जवानांवर झालेल्या नक्सली हल्ल्यात तब्बल २२ जवान शहीद झाले आहेत. उद्या महत्वाच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर आज दुपारी अमित शाह या ठिकाणाला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे भाजपचे प्रवक्ते आता पश्चिम बंगालमध्ये मोदी लाट येणार असल्याचं खात्रीने ट्विट करू लागले आहेत.

 

News English Summary: However, on March 3, 2021, India Today had interviewed Prashant Kishor. He also showed great confidence in TMC’s results. However, when asked, he said that the BJP could benefit from any major attack on the paramilitary personnel during the elections.

News English Title: Prashant Kishor statement about para military attack during assembly election news updates.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x