20 April 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

अस्वच्छतेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘भारत छोडो’चा नारा

PM Narendra Modi, Inaugurating, Rashtriya Swachhata Kendra

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राममंदिराचा शिलान्यास केल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच शनिवारी मोदींनी आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे, जी देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.

मोदींनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्र यांच आज उद्घाटन केलं. त्यांनी हे सेंटर महात्मा गांधी यांना समर्पित केलं आहे. पीएम मोदींनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची (आरएसके) सर्वात पहिली घोषणा 10 एप्रिल 2017 रोजी गांधीच्या चंपारण्य ‘सत्याग्रहा’ला 100 वर्षे पुर्ण झाल्याच्या दिवशी केली होती. या केंद्रात भावी पिढीला स्वच्छ भारत मिशनच्या प्रवासाबाबत माहिती दिली. गंगा नदीप्रमाणे देशातील इतर नद्याही प्रदूषणमुक्त करायच्या आहेत, असं मोदींनी सांगितले. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधींच्या कामाचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं. स्वच्छता हे गांधींच्या आंदोलनाचं मोठं माध्यम होतं, असंही ते यावेळी म्हणाले.

“भारत छोडोचे हे सर्व संकल्प स्वराज्यपासून सुराज्याच्या भावनेला अनुरुपच आहेत. याच अनुशगांने आज आपल्या सर्वांना ‘गंदगी भारत छोड़ो’ चा संकल्प देखील पुन्हा करायचा आहे. या आजपासून १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे स्वतंत्रता दिवसापर्यंत देशात एक आठवडा मोठे अभियान राबवूयात.” असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘भारत छोडो’चा यावेळी नारा दिला.

 

News English Summary: PM Narendra Modi today inaugurated the National Sanitation Center (RSK). The first announcement of a National Sanitation Center dedicated to Mahatma Gandhi was made by Prime Minister Modi on April 10, 2017 on the occasion of the 100th anniversary of Gandhiji’s Champaranya Satyagraha.

News English Title: Prime Minister Narendra Modi Inaugurating The Rashtriya Swachhata Kendra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या